पोस्ट्स

MB NEWS-गाढे पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे*

इमेज
 * गाढे पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे* परळी वैजनाथ दि.१२ (प्रतिनिधी)           तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे यांची निवड करण्यात आली असून सोसायटीचे चेअरमन पांडुरंग गंगणे व प्रमुख मार्गदर्शक युवानेते शरद राडकर यांनी अभिनंदन केले आहे.                       गाढे पिंपळगाव येथील सेलू, सफदाराबाद व गाढे पिंपळगाव या तीन गावची मिळून सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षापूर्वी सोसायटीच्या निवडणूका झाल्या असून निवडणुकीत ठरल्या प्रमाणे श्री.आरसुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी बाळासाहेब आरसुळे यांचा शरद राडकर, चेअरमन पांडुरंग गंगणे, शितलदास आरसुळे यांनी सत्कार केला. या नियुक्ती बदल सोसायटीचे मार्गदर्शक युवानेते शरद राडकर, चेअरमन पांडूरंग गंगणे, संचालक प्रशांत थोंटे, गणेश फुटके, जालिंदर राडकर, शितलदास आरसुळे, सुंदर नवले यांच्यासह सर्व संचालक, सभासदांनी अभिनंदन केले आहे.

MB NEWS-वीज बंद काळातील कृषी विजपंप बिल माफ करण्याची मागणी* *राज्य किसान सभेच्या पदाधिकारी यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली मागणी*

इमेज
 , * वीज बंद काळातील कृषी विजपंप बिल माफ करण्याची मागणी* *राज्य किसान सभेच्या पदाधिकारी यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली मागणी* *परळी वै : दि 11 प्रतिनिधी* परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण प्रकल्पावर अवलंबुन असलेल्या कृषी पंप धारकांना सण 2015 ते 20 या सहा वर्षाचे नाहक वीज बिल शेतकऱ्यांना देण्यात आले असून या काळात ह्या धरणातील पाणी साठा हा फक्त पिण्यासाठी आरक्षीत केला असतानाही कृषी पंपाचा वापर न करता शेतकऱ्यांना या सहा वर्षाच्या वीज वापराचे बिल देण्यात आल्याने हे कृषी वीज देयक माफ करावे अशी मागणी जिल्हा किसान सभेच्या वतीने राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भेट घेऊन निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित शिष्टमंडळाशी चर्चा करून याबाबतीत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागास उर्जामंत्र्यांनी दिले आहेत. सण 2015 मध्ये वान प्रकल्प ता. परळी येथील प्रकल्पातील पाणी तत्कालीन जिल्हाधिकारी केंद्रेकर साहेब यांच्या आदेशाने पिण्यासाठी पाणी सन २०१५ मध्ये आरक्षित करण्यात आले होते. तेव्हापासून ते डिसेम्बर २०२० पर्यंत प्रकल्पात पाणी उपलब्ध नसल्याने प्रकल्पावरील विजेचे सर्व ट्रान्सफ

MB NEWS- *मोहा येथील दृष्टीहीन अक्षय कोकाटेला अन्नपूर्णा चॅरिटेबलचा मदतीचा हात* *_नायब तहसीलदार बी.एल.रूपनर यांनी घेतला पुढाकार_*

इमेज
 *मोहा येथील दृष्टीहीन अक्षय कोकाटेला अन्नपूर्णा चॅरिटेबलचा मदतीचा हात* *_नायब तहसीलदार बी.एल.रूपनर यांनी घेतला पुढाकार_* परळी । प्रतिनिधी माणसाला पाच ज्ञानेंद्रीय नैसर्गिकरित्या असतात. याद्वारे जन्माला आल्यानंतर तो प्रत्येक गोष्ट एक एक करून शिकत असतो. परंतू त्यापैकी कोणताही एक अवयव निकामी असेल तर? तर मात्र त्याचे ते अपंगत्व त्याच्यावर ओझे होऊन बसते. परंतू काही माणसं मात्र आलेल्या कोणत्याही संकटांवर मात करण्याचा गुण जन्मत:च घेवून आलेली असतात की काय? असे वाटायला कारणीभूत आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणे असतात. परळी तालुक्यातील मोहा येथे जन्मलेल्या अक्षय प्रल्हाद कोकाटे हा मुलगा असाच इतरांसाठी मूर्तीमंत उदाहरण ठरतोय. जन्मापासून त्याला दृष्टी नाही. सृष्टी म्हणजे काय असते हे अजूनही त्याने पाहीले नाही, परंतू तो यंदा आपल्या जिद्दीवर ईयत्ता दहावीची परिक्षा देतोय. परिस्थिती हालाखीची असल्याने त्याने यासाठी मदत मागीतली आणि त्याच्या मदतीला परळीची अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट धावून आली. तालुक्यातील मौजे मोहा येथील अक्षय प्रल्हाद कोकाटे हा विद्यार्थी जन्मत:च अंध आहे. काही दिवसांपूर्वी त्याने तहसिलदार या

MB NEWS-वॉर्ड क्रमांक १३ मधील कामासाठी सदैव तत्पर राहणार - गणेश वाळके

इमेज
  वॉर्ड क्रमांक १३ मधील कामासाठी सदैव तत्पर राहणार - गणेश वाळके परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वॉर्ड क्रमांक १३ मधील बाजीप्रभू नगर ( पंचवटी नगर ) मधील चेंबर चे काम चालू असल्यामुळे रोड वर जमा झालेल्या मातीमुळे पावसात चिखल झाला आहे, या चिखला मुळे  नागरिकांना  चिखलाच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.  येथील नागरीक खूप त्रासले असून त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाळके यांना  कळविले व यावर काही तरी तोडगा काढण्यास सांगितले त्यावेळेस गणेश वाळके यांनी तात्पुपूर्ता मुरूम टाकून घेऊ असा शब्द दिला व ते काम पूर्ण केले त्यांच्या या कामाने बाजीप्रभू नगर व ( पंचवटी नगर ) नव्हे तर संपूर्ण वॉर्ड त्यांच्या या कामाचे कौतुक करत आहेत. आपल्या वॉर्ड मधील कामासाठी मी सदैव तत्पर राहणार असे यावेळी बोलताना गणेश वाळके म्हणाले

MB NEWS- *ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे परळीत रा.काॅं.च्या वतीने ह्रदय स्वागत*

इमेज
 ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे परळीत रा.काॅं.च्या वतीने ह्रदय स्वागत परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     राज्याचे उर्जा मंत्री ना.नितिन राउत हे  बीड जिल्हा दौ-यावर आलेले असताना परळीमध्ये त्यांचे विविध संघटना, संस्था, कार्यकर्ते यांनी स्वागत केले.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिच्या वतीने ही त्यांचा सत्कार करुन स्वागत करण्यात आले.         राज्याचे उर्जा मंत्री ना.नितिन राउत  हे परळीमध्ये आले असताना त्यांचे  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संजय दौण्ड, नगर परिषद गटनेते वाल्मीक कराड, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, सरचिटणीस अनंत इंगळे,ज्येष्ठनेते माधव ताटे,भीमराव डावरे, प्रा.शाम दासूद,रवि मुळे, सुभाष वाघमारे,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

MB NEWS-पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळी वैजनाथच्या संचालक पदी बालासाहेब पोरे

इमेज
पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळी वैजनाथच्या संचालक पदी बालासाहेब पोरे  परळी वैजनाथ, प्रतिनिधी परळी शहरातील अल्पावधीत नावरुपास आलेल्या पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळी वैजनाथच्या संचालक पदी परळी शहरातील सर्व सामान्य माणसाच्या कामात सतत मदत करणारे मा.श्री.बालासाहेब पोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत ,उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे, सचिव गोविंद भरबडे, संचालक बालासाहेब घवले, जेष्ठ पत्रकार पदमाकर भंडारे आदी उपस्थित होते.

MB NEWS-छत्रपती शाहू महाराज वसतिगृह कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष किसन देव नागरगोजे यांच्या वतीने कोरोनाने मयत कुटुंबाना आर्थिक मदत

इमेज
 * छत्रपती शाहू महाराज वसतिगृह कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष किसन देव नागरगोजे यांच्या वतीने कोरोनाने मयत कुटुंबाना आर्थिक मदत  परळी वैजनाथ ------  छत्रपती शाहू महाराज वसतिगृह कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष किसन देव नागरगोजे यांनी स्वनिधी म्हणुन कोरोनाने मयत नालंदा विद्यार्थी वसतिगृह परळी चे अधिक्षक प्रमोद जगतकर यांच्या कुटुंबीयांना 5000/- पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन कुटुंबीयांना सर्वोतपरी मदत करण्याचें जाहीर केले. जगतकर कुटुंबात आज आर्थिक मदत देताना जिल्हा अध्यक्ष श्रीराम सारुक, जिल्हा सचिव उत्त्तम साबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन रणखांबे,केज/धारुर ता अध्यक्ष जुबेर इनामदार,ता.सचिव अभिजित लांडगे.महिला जिल्हा अध्यक्ष वनमाला जगतकर, वडवणी ता अध्यक्ष दिनकर बडे,क्रांती लांडगे आदि वसतिगृह कर्मचारी उपस्थित होते.या प्रसंगी किसन देव नागरगोजे यांनी महाराष्ट्रातील जे वसतिगृह कर्मचारी कोरोनाने मयत झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांनाही प्रत्येकी 5000/-रू स्वनिधी आर्थिक मदत म्हणुन देणार असल्याचे सांगितले.व सामाजिक न्याय खात्याच्या अखत्यारीत असलेल्या निधीतून कोरोनाने मयत झालेल्या कर्मचार्यांच

MB NEWS-विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांचा १५ जुनपासुन बेमुदत संप;बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी*

इमेज
 * विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांचा १५ जुनपासुन बेमुदत संप;बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी * परळी वैजनाथ, प्रतिनिधी..,            करोना संकटात जीव धोक्यात घालून काम करतानाही सुरक्षितता आणि मानधनवाढीवर सरकार निर्णय घेत नसल्याने राज्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी १५ जुनपासुन बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या संपात बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी होणार असुन या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनियन च्या वतीने करण्यात आले आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना केवळ आणि केवळ आशांनी केलेल्या कामामुळे यशस्वी होऊ शकली, याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आहे. आता करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ‘आशां’नी करोना गाव मुक्तीसाठी काम करावे, असे आवाहन केले आहे.‘आशां’ना किमान १३ हजार रुपये मानधन द्यावे, तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधा आणि विमा संरक्षण द्यावे अशी मागणी ‘महाराष्ट्र राज्य आशा— गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती’ ने केली आहे..१५ जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास त्याच दिवसापासून बेमुदत सं

MB NEWS-यंदाच्या आषाढी वारीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय

इमेज
यंदाच्या आषाढी वारीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 राज्यातील आषाढी वारी संदर्भांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची घोषणा केली आहे.  कोरोनाचे वाढते संकट, रोज सापडणारे नवनवीन स्ट्रेन, तिसऱ्या लाटेचा दिलेला इशारा अशा परिस्थितीत आषाढी पायी वारीला यंदाही परवानगी देण्यात आली नाही. केवळ मानाच्या दहा महत्वाच्या पालख्या आहेत त्यांना बसने परवानगी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पालखी सोहळ्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या पालख्यांसाठी २० बस देण्यात येणार आहेत. तसेच पालखी सोबत असणाऱ्या प्रत्येकाही वैद्यकीय तपासणी देखील करण्यात येणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. यंदा पालखीच्या प्रस्ठानासाठी देऊ आणि अळंदीमध्ये 100 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. उरलेल्या 8 पालख्यांना प्रत्येकी 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी द

MB NEWS-प्रभाग क्र.४ मध्ये नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या प्रयत्नातून लसीकरण मोहीम ; मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ*

इमेज
 * प्रभाग क्र.४ मध्ये नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या प्रयत्नातून लसीकरण मोहीम ; मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      प्रभाग क्रमांक ४ येथील नागरिकांचे लसीकरण माजी नगराध्यक्ष तथा या प्रभागाचे नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या प्रयत्नातून वैद्यनाथ विद्यालय, धोकटे गल्ली येथे लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या संपन्न झाले.या मोहिमेत 800 नागरिक बंधू भगिनींनी कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस घेतला.राज्याचे सामजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड,आरोग्य प्रशासन,आशा वर्कर्स व प्रभागातील सर्व स्वयंसेवक यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.            प्रभाग क्रमांक ४ येथील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेचा प्रभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाला. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा बीड जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी बाळासाहेब देशमुख,शरदराव कुलकर्णी,राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधकारी, जिल्हा नियोजन मंडळचे सदस्य वैजनाथ सोलंके,ज्येष्ठ नेते डॉ

MB NEWS-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त परळीत अनोखा सेवाधर्म; परिचारिका, आशावर्कर्सचा साडी चोळी देऊन सन्मान!* *आणखी 11 कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी वितरित* *परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांचा गौरव*

इमेज
 * राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त परळीत अनोखा सेवाधर्म; परिचारिका, आशावर्कर्सचा साडी चोळी देऊन सन्मान!* *आणखी 11 कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी वितरित*  *परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांचा गौरव* परळी (दि. 10) ---- : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त परळीत ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अनोखा सेवाधर्म उपक्रम राबविण्यात आला आहे. कोविड प्रादुर्भावात आपला जीव धोक्यात घालून सातत्याने जबाबदारीने कार्यरत असणाऱ्या परिचारिका, आशा वर्कर्स यांचा साडी चोळी देवून सन्मान करण्यात आला आहे. सेवाधर्म उपक्रमांतर्गत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणखी 11 गरजू कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी प्रत्येकी 10000 रूपयांचे 11 धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख,शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,ज्येष्ठ नेते एस.ए.समद,नगरसेवक अय्युबभाई पठाण,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथराव सोलंके,शहर सरचिटणीस अनंत इंगळे,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संतोष श

MB NEWS-शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या* *अजित पवारांच्या घोषणेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब*

इमेज
* शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या* *अजित पवारांच्या घोषणेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब*   मुंबई, दि. १० :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचं पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे. ०००००

MB NEWS-धनंजय मुंडेंची परळी मतदारसंघात आणखी एक मोठी वचनपूर्ती!* *परळीच्या (सिरसाळा) एमआयडीसीला उद्योग विभागाची मान्यता!*

इमेज
 * धनंजय मुंडेंची परळी मतदारसंघात आणखी एक मोठी वचनपूर्ती!* *परळीच्या (सिरसाळा) एमआयडीसीला उद्योग विभागाची मान्यता!* मुंबई (दि. 09) ---- : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी या त्यांच्या मतदारसंघात दिलेल्या एका वचनाच्या पुर्तीच्या दिशेने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील जमिनीवर एम आय डी सी उभारण्याच्या प्रस्तावास उद्योग विभागाने मान्यता दिली आहे. उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांचे खाजगी सचिव उमेश वाघ यांनी ना. मुंडेंच्या कार्यालयास पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथील अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीवर औद्योगीक क्षेत्र - 2 अंतर्गत एम आय डी सी उभारण्याची मागणी ना. धनंजय मुंडे यांनी उद्योग विभागाला केली होती. विधानसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या अधिवेशनादरम्यान यासंदर्भात ना. देसाई यांच्याशी चर्चा करून एम आय डी सी प्रस्तावित करण्यात आली होती.  त्यानुसार यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीची उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करून राज्य शासनाला याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता व

MB NEWS-अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ _सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

इमेज
  अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ _सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती    सामाजिक न्याय विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणार्‍या अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अधीक्षकांना आता 9200 ऐवजी दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. एक जुलैपासून ही वाढ लागू होणार आहे. स्वयंपाकी पदासाठी 6900 ऐवजी 8500 रुपये तर मदतनीस व चौकीदार पदांसाठी 5750 ऐवजी 7500 मानधन मिळणार आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम विभागाचे सचिव श्याम तागडे वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती व संबंधित अधिकारी उपस्थित होते या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील 2388 अधीक्षक, 2868 स्वयंपाकी , 470 मदतनीस, 2388 चौकीदार यांना लाभ

MB NEWS-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परळीत होणार परिचारिका व आशावर्कर्स यांचा साडीचोळी देवून गौरव* *राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचाही होणार गौरव*

इमेज
 * राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परळीत होणार परिचारिका व आशावर्कर्स यांचा साडीचोळी देवून गौरव* *राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचाही होणार गौरव* परळी (दि. 09) ---- : गुरुवारी दि. 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 वर्धापन दिनाचे औचित्य साधून परळी मतदारसंघात ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत कोविड काळात आपले प्राण पणाला लावून सेवा दिलेल्या सर्व परिचारिका तसेच आशावर्कर्स यांचा साडी-चोळी भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर पक्षाच्या स्थापनेपासून 'संस्थापनातील सदस्य' असलेल्या ज्येष्ठ नेत्यांचाही गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी दिली आहे. परळीत सेवाधर्म उपक्रमांतर्गत धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोलाचे योगदान देण्यात आले आहे. कोरोना बाधित कुटुंबातील विवाहांना अर्थसहाय्य, खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांना औषधी, इंजेक्शन, जेवणाचे डब

MB NEWS-सुर्यकर कुटुंबीयांचे राजेश देशमुख यांच्याकडून सांत्वन*

इमेज
  सुर्यकर कुटुंबीयांचे राजेश देशमुख यांच्याकडून सांत्वन* परळी,(प्रतिनिधी):-    दै.दिव्यआग्निचे संपादक प्रकाश सुर्यकर यांचे वडील जेष्ठ नागरिक  स्व.पंढरीनाथ हनुमंतराव (माळी) सूर्यकर अल्पशा आजाराने निधन झाले.या निमित्त सुर्यकर कुटुंबियांचे निवास्थांनी जाऊन दि. 8 जुन 2021 रोजी *श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थांनचे सेक्रेटरी,भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजेश देशमुख,जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुराडे, दैं.लोकमंतचे पत्रकार संजय खाकरे यांनी सांत्वन केले.*

MB NEWS-खते, बी-बियाणांची वाढीव दराने विक्री ; शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा* *पंकजाताई मुंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*

इमेज
 * खते, बी-बियाणांची वाढीव दराने विक्री ; शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा* *पंकजाताई मुंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी* परळी । दिनांक ०७। बीड जिल्हयातील कृषी दुकानांमधून खते व बी-बियाणे यांची वाढीव  दराने होत विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या असून ही लूट त्वरित थांबविण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.   सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून खते व बी-बियाणेची मागणी वाढत आहे. कोरोनामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशातच कृषी दुकाने याची चढ्या भावाने विक्री करून सर्व सामान्य शेतकऱ्यांची  पिळवणूक करत आहेत,  शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी  यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी असे पंकजाताई मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे. ••••

MB NEWS-परळी : वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.10 मध्ये विशेष लसीकरण मोहीम, दुपारपर्यंत 750 हून अधिक नागरिकांचे लसीकरण संपन्न*

इमेज
 * परळी : वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.10 मध्ये विशेष लसीकरण मोहीम, दुपारपर्यंत 750 हून अधिक नागरिकांचे लसीकरण संपन्न* *उर्वरित नागरिकांना शनिवारी मिळणार लस* परळी (प्रतिनिधी) -: जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून शहरातील प्रभाग क्र. 10 मधील 45 वर्षांवरील नागरिकांसाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून विवेक वर्धिनी विद्यालय, शारदा नगर येथे विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे.  या मोहिमेंतर्गत प्रभागातील 750 पेक्षा जास्त नागरिकांचे दुपारपर्यंत पहिल्या डोसचे लसीकरण संपन्न झाले आहे. तसेच आज लस न मिळू शकलेल्या प्रभागातील नागरिकांचे येत्या शनिवारी दुसऱ्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. यावेळी रा.कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेविका सौ. प्रियांका महादेव रोडे, महादेव रोडे, अनंत इंगळे, सुरेश गित्ते, आबासाहेब मुंडे, समाधान जोगदंड, माऊली कराड, गिरीश भोसले, रामदास कराड, आरोग्य कर्मचारी विष्णू मुंडे, तसेच परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

MB NEWS- *टोकवाडीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षलागवड* 🕳️ _जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केले टोकवाडी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक_🕳️

इमेज
 *टोकवाडीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षलागवड* 🕳️ _जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केले टोकवाडी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक_🕳️ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टोकवाडी येथे वृक्ष लागवड कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित कुंभार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. टोकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत घनवृक्षलागवड तसेच ग्रामपंचायतीच्या कामांची पहाणी करण्यात आली. यावेळी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी  टोकवाडी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले.        जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टोकवाडी येथे वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित कुंभार यांच्यासह उपकार्यकारी  अधिकारी श्री. गिरी, उप जिल्हाधिकारी नम्रता चाटे,तहसीलदार श्री शेजुळ, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, गटविकास अधिकारी श्री. संजय केंद्रे, नायब तहसीलदार रूपनर, वनीकरण अधिकारी बी.एस. गीते, हिवरे,वनरक्षक व्ही.

MB NEWS-अनलॉक प्रक्रिया सुरू झाली परंतु कोरोना अद्याप गेलेली नाही...............(कथा)

इमेज
  अनलॉक प्रक्रिया सुरू झाली परंतु कोरोना अद्याप गेलेली नाही............... या संदर्भात एक कथा  ...... एक माणूस मोठ्या ् वृक्षावर चढतो ... फळं काढतो. फळं काढल्यानंतर खाली उतरण्यास सुरवात होते. झाडाजवळ एक साधु बसला होता. जेव्हा झाडावरुन खाली उतरलेला माणूस जमिनीपासून ८ फूट अंतरावर राहतो, तेव्हा साधु मोठ्याने ओरडतो आणि त्याला पुन्हा पुन्हा चेतावणी देतो की "बघ, भाऊ, सांभळून खाली जा". "बघ भाऊ, जमीन अजूनही 7 फूट खाली आहे." "हार मानू नका." "जर आपण पडलात तर आपल्याला दुखापत होईल, हात पाय तुटतील." तो माणूस झाडावरुन खाली उतरतो आणि त्या साधुला म्हणतो की "व्वा बाबाजी, मी खूप उंच होता तेव्हा मी झाडाच्या माथ्यावर होतो, तेव्हा तुम्ही कधीही सावध रहायला सांगितले नाही आणि मी इतके खाली आलो की जमिनीवर पूर्णपणे होतो तेव्हा तू जवळ होतास तेव्हा तू मला पुन्हा पुन्हा ओरडत आहेस, का ??साधु  म्हणाला की "बेटा, याकडे लक्ष देण्याची गोष्ट आहे. जेव्हा आपण धोका जास्त होता तेव्हा आपण स्वत: ला खूप सावधगिरी बाळगता, परंतु हे खाली येण्यास सुरवात होताच, आपण निष्काळजी झालात, आपण

MB NEWS-दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत शुभारंभ* *बीड जिल्ह्याचा 'स्पेशल डे' पॅटर्न राज्यभरात राबविण्याचा मानस - ना. मुंडे*

इमेज
 * दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत शुभारंभ* *बीड जिल्ह्याचा 'स्पेशल डे' पॅटर्न राज्यभरात राबविण्याचा मानस - ना. मुंडे* परळी (दि. 05) ---- : सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर एक दिवस राखीव ठेवत दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली असून, या मोहिमेचा परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.  दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ये-जा करणे, यासह अन्य अडचणींचा विचार करून सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केला होत्या. त्यानुसार एक दिवस फक्त दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणा साठी राखीव ठेऊन प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्याच्या या विशेष मोहिमेची बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याचा आपला मानस आहे, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी न.प. गटनेते वाल्मिक अण्णा

MB NEWS-पंकजाताई मुंडे, डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केला डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान* *सेवा यज्ञातील योगदानाबद्दल कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!* _महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन केला सत्कार_

इमेज
 * पंकजाताई मुंडे, डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केला डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान* *सेवा यज्ञातील योगदानाबद्दल कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!* _महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन केला सत्कार_ परळी । दिनांक ०४।  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या सेवा यज्ञात शहरातील डाॅक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव खूपच मोलाचा ठरला, त्यांच्यामुळेच अनेक रूग्ण कोरोनामुक्त होऊ शकले, त्यांचे ऋण कदापि विसरू शकणार नाही अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यां बरोबरच सेवा यज्ञासाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवरही त्यांनी कौतुकाची थाप देत ॠण व्यक्त केले.    गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सुक्ष्म लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांसाठी अक्षता मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या सेवा यज्ञाचा समारोप बुधवारी झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, भाजपचे  ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे, राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँक

MB NEWS-लोकनेत्याच्या सामाजिक कार्याचा भारतीय डाक विभाग करणार गौरव* *गोपीनाथराव मुंडे यांच्या पोस्टल इन्व्हलपचे ३ जून रोजी लोकार्पण* *दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी होणार ऑनलाईन कार्यक्रम*

इमेज
 * लोकनेत्याच्या सामाजिक कार्याचा भारतीय डाक विभाग करणार गौरव* *गोपीनाथराव मुंडे यांच्या पोस्टल इन्व्हलपचे ३ जून रोजी लोकार्पण*  *दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी होणार ऑनलाईन कार्यक्रम*  परळी । दिनांक ०१।  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ काढलेल्या पोस्टल इन्व्हलपचे (लिफाफा) लोकार्पण मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीला म्हणजेच ३ जून रोजी होत आहे. दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी समाजातील वंचित, पिडित व उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ३ जून हा त्यांचा पुण्यस्मरण दिन दरवर्षी 'सामाजिक उत्थान' दिवस म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जातो, यानिमित्त विविध सामाजिक सेवा उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत असते. यंदा मात्र कोविड महामारीची गंभीर परिस्थिती व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन गोपीनाथ गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम न करण्याचे प्रतिष्ठानने ठरवले आहे. *पोस्टल इन्व्हलपचे लोकार्प

MB NEWS-महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती

इमेज
  महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी)                 शहरातील राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्ती बदल सर्वत्र अभिनंदन होत आहे.                येथील लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. जे.परळीकर यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाल्याने प्राचार्य पद रिक्त झाले होते. या जागी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बदल संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख यांच्यासह सर्व संचालक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. या नियुक्ती बदल बोलताना प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांनी सांगितले की, महाविद्यालयाची गेल्या २४ वर्षांची गुणवत्तेची परंपरा कायम ठेवून स्वर्गीय प्

MB NEWS- *पो.नि.शिवलाल पुरभे सेवानिवृत्त ; ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्र.पो.नि.म्हणुन मुंडे यांनी स्विकारला पदभार*

इमेज
 *पो.नि.शिवलाल पुरभे सेवानिवृत्त ; ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्र.पो.नि.म्हणुन मुंडे यांनी स्विकारला पदभार* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे हे पोलिस दलातील प्रदीर्घ सेवेतुन सेवानिवृत्त झाले तसेच सप्तनिक त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात कर्मचार्यांच्या वतिने निरोप समारंभाद्वारे निरोप देण्यात आला.तर प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणुन मारुती मुंडे यांनी पदभार स्वीकारला.        शिवलाल पुरभे यांनी आतापर्यंत गडचिरोली,औरंगाबाद,नागपूर,बीड व अन्य ठिकाणी पोलिस निरीक्षक म्हणुन सेवा बजावली तर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात ते मागील सोळा महिन्यापासुन रुजु होते.एक कर्तव्यदक्ष व कर्मचार्यांना सोबत घेवुन काम करणारे अधिकारी म्हणुन त्यांची ख्याती होती.ग्रमीण पोलिस ठाण्यात अधिकारी व कर्मचार्यांच्या वतिने छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गित्ते, पोलिस सहाय्यक निरीक्षक विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक मनोज जिरगे, पोलिस नाईक हरिदास गिते, शि