MB NEWS-अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ _सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

 अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ



_सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती


   सामाजिक न्याय विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणार्‍या अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीनंतर दिली.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अधीक्षकांना आता 9200 ऐवजी दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. एक जुलैपासून ही वाढ लागू होणार आहे.

स्वयंपाकी पदासाठी 6900 ऐवजी 8500 रुपये तर मदतनीस व चौकीदार पदांसाठी 5750 ऐवजी 7500 मानधन मिळणार आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम विभागाचे सचिव श्याम तागडे वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती व संबंधित अधिकारी उपस्थित होते या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील 2388 अधीक्षक, 2868 स्वयंपाकी , 470 मदतनीस, 2388 चौकीदार यांना लाभ मिळणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार