MB NEWS- *मोहा येथील दृष्टीहीन अक्षय कोकाटेला अन्नपूर्णा चॅरिटेबलचा मदतीचा हात* *_नायब तहसीलदार बी.एल.रूपनर यांनी घेतला पुढाकार_*

 *मोहा येथील दृष्टीहीन अक्षय कोकाटेला अन्नपूर्णा चॅरिटेबलचा मदतीचा हात*



*_नायब तहसीलदार बी.एल.रूपनर यांनी घेतला पुढाकार_*

परळी । प्रतिनिधी

माणसाला पाच ज्ञानेंद्रीय नैसर्गिकरित्या असतात. याद्वारे जन्माला आल्यानंतर तो प्रत्येक गोष्ट एक एक करून शिकत असतो. परंतू त्यापैकी कोणताही एक अवयव निकामी असेल तर? तर मात्र त्याचे ते अपंगत्व त्याच्यावर ओझे होऊन बसते. परंतू काही माणसं मात्र आलेल्या कोणत्याही संकटांवर मात करण्याचा गुण जन्मत:च घेवून आलेली असतात की काय? असे वाटायला कारणीभूत आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणे असतात. परळी तालुक्यातील मोहा येथे जन्मलेल्या अक्षय प्रल्हाद कोकाटे हा मुलगा असाच इतरांसाठी मूर्तीमंत उदाहरण ठरतोय. जन्मापासून त्याला दृष्टी नाही. सृष्टी म्हणजे काय असते हे अजूनही त्याने पाहीले नाही, परंतू तो यंदा आपल्या जिद्दीवर ईयत्ता दहावीची परिक्षा देतोय. परिस्थिती हालाखीची असल्याने त्याने यासाठी मदत मागीतली आणि त्याच्या मदतीला परळीची अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट धावून आली.



तालुक्यातील मौजे मोहा येथील अक्षय प्रल्हाद कोकाटे हा विद्यार्थी जन्मत:च अंध आहे. काही दिवसांपूर्वी त्याने तहसिलदार यांच्याकडे शिक्षणासाठी पुस्तके हवी आहेत अशा स्वरूपाची मदत मागितली. परळीचे नायब तहसिलदार बी.एल.रूपनर यांनी सामाजिक संस्थांना या विद्यार्थ्याला मदत करावी असे आवाहन केले. आवाहन केल्याबरोबर काहीच मिनिटांत अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टकडून प्रतिसाद मिळाला आणि त्या मुलाला हवी असलेली ईयत्ता दहावीची ब्रेल बाराखडीतील क्रमिक पुस्तके बाहेरून मागवून देण्यात आली. ही पुस्तके अत्यंत महागडी आणि आसपास न मिळणारी आहेत. अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टने मागवलेली ही ब्रेल बाराखडीतील महागडी पुस्तके आज मोहा येथे अक्षय कोकाटे याच्या घरी जावून त्याला भेट देण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार बी.एल.रूपनर, अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अनिल लाहोटी, संजय स्वामी, उमेश टाले, संतोष पंचाक्षरी, तलाठी विठ्ठल पंडीत, पं.स.माजी सभापती विष्णूपंत देशमुख, सरपंच पती पांडीरंग शेप, पत्रकार दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे आदी उपस्थित होते.

अक्षय प्रल्हाद कोकाटे हा अतिशय सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेला डोळ्याने अपंग मुलगा आहे. त्याच्या वडीलांना फक्त दोन एकर कोरडवाहू जमिन असल्याने आई मिरा आणि वडील प्रल्हाद कोकाटे हे दोघेही शेतमजूरी करतात. अक्षयला एक बहीण आकांक्षा आहे जी ईयत्ता १२ वीत शिक्षण घेते, तर छोटा भाऊ अजित हा गावातच ५ वीत शिक्षण घेतो. अक्षय यानेसुध्दा प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. त्यानंतर तो पुण्याच्या भोसरी येथील पताशुबाई रतनचंद मानवसेवा ट्रस्टच्या अंध शाळेत शिक्षण घेण्यासाठी गेला. या शाळेत त्याने ईयत्ता ९ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि आता तो ईयत्ता १० वीच्या प्रवेशासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमीत म्हणजेच कोल्हापूरला जाणार आहे. शाळा आणखी सुरू नाहीयेत, परंतू प्रवेशापूर्वीच तो अभ्यासाच्या तयारीला लागला आहे. या अभ्यासासाठी त्याला हवी असलेली ब्रेल बाराखडीतील पुस्तके उपलब्ध होत नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून बेचैन होता. त्याने यासाठी मदत करावी अशी मागणी नायब तहसिलदार बी.एल.रूपनर यांच्याकडे केली. त्यानंतर त्याला आज शनिवारी अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टने मदत उपलब्ध करून दिली आणि त्याच्या घरी नेऊन ती पुस्तकेही त्याच्या स्वाधीन केली. एक मात्र निश्चित आहे की, अक्षय याला दृष्टी नसली तरी त्याच्यातील जिद्द मात्र कमालीची प्रंचड आहे. भविष्यात तो शासकीय नोकरीत जावून आई-वडीलांची गरिबी हटवण्यासाठी कंबर कसतोय असेही त्याने यावेळी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !