MB NEWS-वीज बंद काळातील कृषी विजपंप बिल माफ करण्याची मागणी* *राज्य किसान सभेच्या पदाधिकारी यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली मागणी*

 ,

*वीज बंद काळातील कृषी विजपंप बिल माफ करण्याची मागणी*



*राज्य किसान सभेच्या पदाधिकारी यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली मागणी*


*परळी वै : दि 11 प्रतिनिधी*


परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण प्रकल्पावर अवलंबुन असलेल्या कृषी पंप धारकांना सण 2015 ते 20 या सहा वर्षाचे नाहक वीज बिल शेतकऱ्यांना देण्यात आले असून या काळात ह्या धरणातील पाणी साठा हा फक्त पिण्यासाठी आरक्षीत केला असतानाही कृषी पंपाचा वापर न करता शेतकऱ्यांना या सहा वर्षाच्या वीज वापराचे बिल देण्यात आल्याने हे कृषी वीज देयक माफ करावे अशी मागणी जिल्हा किसान सभेच्या वतीने राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भेट घेऊन निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित शिष्टमंडळाशी चर्चा करून याबाबतीत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागास उर्जामंत्र्यांनी दिले आहेत.


सण 2015 मध्ये वान प्रकल्प ता. परळी येथील प्रकल्पातील पाणी तत्कालीन जिल्हाधिकारी केंद्रेकर साहेब यांच्या आदेशाने पिण्यासाठी पाणी सन २०१५ मध्ये आरक्षित करण्यात आले होते. तेव्हापासून ते डिसेम्बर २०२० पर्यंत प्रकल्पात पाणी उपलब्ध नसल्याने प्रकल्पावरील विजेचे सर्व ट्रान्सफर्मर उतरुन नेलेले होते. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने डिसेम्बर 2020 मध्ये आंदोलन केल्या नंतर वीज वितरण ने सर्व ट्रान्सफार्मर बसवून दिले. परंतु २०१५ ते डिसेम्बर २०२० पर्यंत प्रकल्पात पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही पण २०१५ ते २०२० या बंद काळातील वीज बिल शेतकऱ्यांना येत आहे.


याच मागणीचे निवेदन जिल्हयाचे पालक मंत्री धंनजयज मुंडे, जिल्हयाचे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना हि देण्यात आलेले आहेत. या बाबतीत राज्याचे ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत हे परळीच्या दौऱ्यावर आलेले असताना खात्याचे प्रमुख या नात्याने बंद काळातील शेतकर्यांचे वीज बिल माफ करून शेतकऱ्याना सहकार्य करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी ऊर्जा मंत्री ना.राऊत यांनी शिष्ट मंडळाशी चर्चा करून सर्व परिस्थिती जाणून घेऊन यावर तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश संबधित विभागास दिले आहेत.या भेटी वेळी राज्य किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ.अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.अशोक नागरगोजे,महादेव घुगे रावण बाबुराव नागरगोजे, गंगाराम कोंडीबा नागरगोजे,सोपान काजगुडे,मारोती उजगुंडे,अंगद पाळवदे,बंडू सातभाई,मदन केंद्रे,पाडुरंग मुंडे,अंगद सातभाई,विष्णू सातभाई आदी सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार