MB NEWS-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त परळीत अनोखा सेवाधर्म; परिचारिका, आशावर्कर्सचा साडी चोळी देऊन सन्मान!* *आणखी 11 कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी वितरित* *परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांचा गौरव*

 *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त परळीत अनोखा सेवाधर्म; परिचारिका, आशावर्कर्सचा साडी चोळी देऊन सन्मान!*



*आणखी 11 कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी वितरित* 


*परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांचा गौरव*



परळी (दि. 10) ---- : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त परळीत ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अनोखा सेवाधर्म उपक्रम राबविण्यात आला आहे. कोविड प्रादुर्भावात आपला जीव धोक्यात घालून सातत्याने जबाबदारीने कार्यरत असणाऱ्या परिचारिका, आशा वर्कर्स यांचा साडी चोळी देवून सन्मान करण्यात आला आहे.


सेवाधर्म उपक्रमांतर्गत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणखी 11 गरजू कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी प्रत्येकी 10000 रूपयांचे 11 धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.


यावेळी नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख,शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,ज्येष्ठ नेते एस.ए.समद,नगरसेवक अय्युबभाई पठाण,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथराव सोलंके,शहर सरचिटणीस अनंत इंगळे,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे,युवक शहराध्यक्ष सयद सिराज भाई,महिला आघाडीच्या अध्यक्ष अर्चनाताई रोडे,आशाताई सुरवसे,ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष के.डी. उपाडे,सामाजिक न्याय आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ सावन्त,वकील सेल चे अध्यक्ष मनजीत सुगरे,अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष नाझेरभाई हुसैन,बालाजी वाघ,युवकनेते शंकर कापसे,बळीराम नागरगोजे,प्रा.शाम दासूद सर,रवि मुळे,सामाजिक न्याय आघडीचे युवक अध्यक्ष अमर रोडे,अभिजीत धाकपाडे,अमित केंद्रे,जितेंद्र नव्हाडे,धम्मा आवचारे,सचिन आरसुळे,शरद कावरे,अतुल फड,पप्पु काळे,गणेश सुरवसे,उमेश सुरवसे,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते!


*राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ सदस्यांचा सन्मान*


राष्ट्रवादी पक्षाच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त परळीतील राष्ट्रवादीच्या प्रातिनिधिक स्वरूपातील ज्येष्ठ व संस्थापन काळातील नेत्यांच्या गौरव करण्यात आला. यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख, ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. सुरेशचंद्रजी चौधरी, माजी नगरसेवक समद साहेब, माजी नगरसेवक भालचंद्रजी तांदळे, अड.जीवनराव देशमुख, ज्येष्ठ नेते प्रभाकरराव देशमुख, महिला आघडीच्या ज्येष्ठनेत्या आशाताई सुरवसे, विद्यमान भाजप नेते तात्कालिन राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी नगरसेवक ओमप्रकाश सारडा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य यांचा सत्कार करण्यात आला; यावेळी नगरध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे यांच्यासह विविध आघडीचे पदाधिकारी उपस्थित होते!


*तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोरे व टीमचा गौरव*


कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सतत अविश्रांत परिश्रम घेऊन नागरिकांना उपचार व दिलासा देण्यासाठी फ्रंट लाईनला लढणारे परळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ.विष्णू मुंडे व त्यांच्या टीमचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशेष सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी समस्त परळीकरांच्या वतीने डॉ.मोरे व त्यांच्या टीमचे पदाधिकाऱ्यांनी आभार मानले!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार