MB NEWS-प्रभाग क्र.४ मध्ये नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या प्रयत्नातून लसीकरण मोहीम ; मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ*

 *प्रभाग क्र.४ मध्ये नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या प्रयत्नातून लसीकरण मोहीम ; मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     प्रभाग क्रमांक ४ येथील नागरिकांचे लसीकरण माजी नगराध्यक्ष तथा या प्रभागाचे नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या प्रयत्नातून वैद्यनाथ विद्यालय, धोकटे गल्ली येथे लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या संपन्न झाले.या मोहिमेत 800 नागरिक बंधू भगिनींनी कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस घेतला.राज्याचे सामजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड,आरोग्य प्रशासन,आशा वर्कर्स व प्रभागातील सर्व स्वयंसेवक यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

      

    प्रभाग क्रमांक ४ येथील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेचा प्रभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाला. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा बीड जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी बाळासाहेब देशमुख,शरदराव कुलकर्णी,राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधकारी, जिल्हा नियोजन मंडळचे सदस्य वैजनाथ सोलंके,ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश चौधरी,अॅड..जीवन देशमुख, श्रीकांत मांडे, वैजनाथ बागवाले,अनंत इंगळे, नगरसेवक अनिल आष्टेकर, गोविंद कुकर,ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख माजी नगरसेवक भालचन्द्र तांदळे,डॉ.गुरुप्रसाद देशपांडे, डॉ.आनंद टिम्बे,अॅड.अतुल तांदळे,भाजपा युवा नेते अश्विन मोगरकर,शिवसेना नेते रमेश चौण्डे आदींच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शरद कावरे,श्रीपाद पाठक,अभिजीत तांदळे,चारुदत्त करमाळकर,वैजनाथ जोशी,मोहन सावजी,नीलेश जयराम,अतुल नरवाडकर,राहुल ताटे,केदार कुलकर्णी,प्रशांत नाइक,मिलिंद पाटिल,अतुल ताटे,रामेश्वर स्वामी,केशव बडवे,पंकज जोशी,रवि खिस्ते,अनिल घेवारे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार