नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

MB NEWS-गाढे पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे*

 *गाढे पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे*



परळी वैजनाथ दि.१२ (प्रतिनिधी)

          तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे यांची निवड करण्यात आली असून सोसायटीचे चेअरमन पांडुरंग गंगणे व प्रमुख मार्गदर्शक युवानेते शरद राडकर यांनी अभिनंदन केले आहे.

                      गाढे पिंपळगाव येथील सेलू, सफदाराबाद व गाढे पिंपळगाव या तीन गावची मिळून सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षापूर्वी सोसायटीच्या निवडणूका झाल्या असून निवडणुकीत ठरल्या प्रमाणे श्री.आरसुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी बाळासाहेब आरसुळे यांचा शरद राडकर, चेअरमन पांडुरंग गंगणे, शितलदास आरसुळे यांनी सत्कार केला. या नियुक्ती बदल सोसायटीचे मार्गदर्शक युवानेते शरद राडकर, चेअरमन पांडूरंग गंगणे, संचालक प्रशांत थोंटे, गणेश फुटके, जालिंदर राडकर, शितलदास आरसुळे, सुंदर नवले यांच्यासह सर्व संचालक, सभासदांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या