MB NEWS-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परळीत होणार परिचारिका व आशावर्कर्स यांचा साडीचोळी देवून गौरव* *राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचाही होणार गौरव*

 *राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परळीत होणार परिचारिका व आशावर्कर्स यांचा साडीचोळी देवून गौरव*



*राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचाही होणार गौरव*


परळी (दि. 09) ---- : गुरुवारी दि. 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 वर्धापन दिनाचे औचित्य साधून परळी मतदारसंघात ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत कोविड काळात आपले प्राण पणाला लावून सेवा दिलेल्या सर्व परिचारिका तसेच आशावर्कर्स यांचा साडी-चोळी भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे. 


त्याचबरोबर पक्षाच्या स्थापनेपासून 'संस्थापनातील सदस्य' असलेल्या ज्येष्ठ नेत्यांचाही गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी दिली आहे.


परळीत सेवाधर्म उपक्रमांतर्गत धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोलाचे योगदान देण्यात आले आहे. कोरोना बाधित कुटुंबातील विवाहांना अर्थसहाय्य, खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांना औषधी, इंजेक्शन, जेवणाचे डबे, कोरोना वारीअर्सला टिफीन बॉक्स, कोरोना सुरक्षा किट, फ्रंट लाईन वर्कर्सला विमा पॉलिसी असे अनेक उपयोगी उपक्रम यांतर्गत राबविण्यात आले आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आता परिचारिका, आशा वर्कर्स तसेच पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्या आगळ्या वेगळ्या सन्मान कार्यक्रमाचेही उद्या आयोजन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार