MB NEWS-परळी : वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.10 मध्ये विशेष लसीकरण मोहीम, दुपारपर्यंत 750 हून अधिक नागरिकांचे लसीकरण संपन्न*

 *परळी : वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.10 मध्ये विशेष लसीकरण मोहीम, दुपारपर्यंत 750 हून अधिक नागरिकांचे लसीकरण संपन्न*



*उर्वरित नागरिकांना शनिवारी मिळणार लस*


परळी (प्रतिनिधी) -: जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून शहरातील प्रभाग क्र. 10 मधील 45 वर्षांवरील नागरिकांसाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून विवेक वर्धिनी विद्यालय, शारदा नगर येथे विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. 



या मोहिमेंतर्गत प्रभागातील 750 पेक्षा जास्त नागरिकांचे दुपारपर्यंत पहिल्या डोसचे लसीकरण संपन्न झाले आहे. तसेच आज लस न मिळू शकलेल्या प्रभागातील नागरिकांचे येत्या शनिवारी दुसऱ्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे.


यावेळी रा.कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेविका सौ. प्रियांका महादेव रोडे, महादेव रोडे, अनंत इंगळे, सुरेश गित्ते, आबासाहेब मुंडे, समाधान जोगदंड, माऊली कराड, गिरीश भोसले, रामदास कराड, आरोग्य कर्मचारी विष्णू मुंडे, तसेच परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार