MB NEWS- *टोकवाडीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षलागवड* 🕳️ _जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केले टोकवाडी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक_🕳️

 *टोकवाडीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षलागवड*



🕳️ _जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केले टोकवाडी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक_🕳️



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टोकवाडी येथे वृक्ष लागवड कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित कुंभार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. टोकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत घनवृक्षलागवड तसेच ग्रामपंचायतीच्या कामांची पहाणी करण्यात आली. यावेळी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी  टोकवाडी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले.

       जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टोकवाडी येथे वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित कुंभार यांच्यासह उपकार्यकारी  अधिकारी श्री. गिरी, उप जिल्हाधिकारी नम्रता चाटे,तहसीलदार श्री शेजुळ, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, गटविकास अधिकारी श्री. संजय केंद्रे, नायब तहसीलदार रूपनर, वनीकरण अधिकारी बी.एस. गीते, हिवरे,वनरक्षक व्ही.एम.दौंड, गावच्या सरपंच सौ.गोदावरी राजाराम मुंडे, उपसरपंच सौ.उषाताई रोडे, श्री.वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजाराम मुंडे, पं.स.शेतकी अधिकारी कांदे,तलाठी सतिश भुसेवाड, ग्रा.प.सदस्य तुकाराम काळे, गणेश मुंडे, नामदेव मुंडे,लहुदास मुंडे, बालाजी आघाव, साहेबराव रोडे, सुनील मुंडे,सौ.कल्पना मुंडे, सौ.अलका मुंडे ,ग्रामसेविका आशा क्षीरसागर, अंगणवाडी सीडीपीओ रोडे, अंगणवाडी सुपरवायजर  देशमुख, स्वच्छतागृही, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स, मदतनीस,ग्रामसंघ अध्यक्ष, बचतगटकर्मी, बचतगट वर्धिणी आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच श्री.अजित कुंभार  व इतर मान्यवरांनी झेडपी शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, डेन्स फॉरेस्ट यांची पाहणी केली व ग्रामपंचायत वेबसाईट पूर्ण स्क्रीनवर पाहणी केली. मान्यवरांच्या उपस्थितीत एकूण १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन माऊली मुंडे गुरुजी यांनी केले.कार्यक्रमास गावकरी उपस्थित होते.यावेळी कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार