MB NEWS-विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांचा १५ जुनपासुन बेमुदत संप;बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी*

 *विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांचा १५ जुनपासुन बेमुदत संप;बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..,  

         करोना संकटात जीव धोक्यात घालून काम करतानाही सुरक्षितता आणि मानधनवाढीवर सरकार निर्णय घेत नसल्याने राज्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी १५ जुनपासुन बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या संपात बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी होणार असुन या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनियन च्या वतीने करण्यात आले आहे.


‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना केवळ आणि केवळ आशांनी केलेल्या कामामुळे यशस्वी होऊ शकली, याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आहे. आता करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ‘आशां’नी करोना गाव मुक्तीसाठी काम करावे, असे आवाहन केले आहे.‘आशां’ना किमान १३ हजार रुपये मानधन द्यावे, तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधा आणि विमा संरक्षण द्यावे अशी मागणी ‘महाराष्ट्र राज्य आशा— गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती’ ने केली आहे..१५ जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास त्याच दिवसापासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला.‘आशां’ना प्रतिदिन ३०० रुपये शहरी भागात, तर ग्रामीण भागात हजार रुपये महिना याचा अर्थ ३५ रुपये रोज या दराने काम करण्यास भाग पाडले जाते . त्यांना आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नियमित दिल्या गेल्या नाहीत, असे आशा संघटनांचे म्हणणे आहे.

      या संपात बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी होणार असुन या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनियन च्या वतीने करण्यात आले आहे.या निवेदनावर सिटु चे जिल्हा अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे, बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कुरे, तालुकाध्यक्ष किरण सावजी, सुवर्णा आरसुळ,मायादेवी बनसोडे, प्रियंका घागरमाळे,रेखा वाघमारे,सुरेखा भिसे,सुलताना तांबोळी,खाजाजी शेख,सुषमा साखरे,मंगल गित्ते,संगीता मुंडे, सुनिता पवार, इंदुबाई कुकर, सुमित्रा पवार,हेमा काळे,अनिता गिराम आदींची नावे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार