MB NEWS-खते, बी-बियाणांची वाढीव दराने विक्री ; शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा* *पंकजाताई मुंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*

 *खते, बी-बियाणांची वाढीव दराने विक्री ; शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा*



*पंकजाताई मुंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*


परळी । दिनांक ०७।

बीड जिल्हयातील कृषी दुकानांमधून खते व बी-बियाणे यांची वाढीव  दराने होत विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या असून ही लूट त्वरित थांबविण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.


  सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून खते व बी-बियाणेची मागणी वाढत आहे. कोरोनामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशातच कृषी दुकाने याची चढ्या भावाने विक्री करून सर्व सामान्य शेतकऱ्यांची  पिळवणूक करत आहेत,  शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी  यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी असे पंकजाताई मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार