MB NEWS-यंदाच्या आषाढी वारीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय

यंदाच्या आषाढी वारीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩




राज्यातील आषाढी वारी संदर्भांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची घोषणा केली आहे.  कोरोनाचे वाढते संकट, रोज सापडणारे नवनवीन स्ट्रेन, तिसऱ्या लाटेचा दिलेला इशारा अशा परिस्थितीत आषाढी पायी वारीला यंदाही परवानगी देण्यात आली नाही. केवळ मानाच्या दहा महत्वाच्या पालख्या आहेत त्यांना बसने परवानगी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पालखी सोहळ्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या पालख्यांसाठी २० बस देण्यात येणार आहेत. तसेच पालखी सोबत असणाऱ्या प्रत्येकाही वैद्यकीय तपासणी देखील करण्यात येणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

यंदा पालखीच्या प्रस्ठानासाठी देऊ आणि अळंदीमध्ये 100 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. उरलेल्या 8 पालख्यांना प्रत्येकी 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. प्रत्येकी 2 बसमधून यंदाही मनाच्या पालख्यांना रवाना होणार आहेत. मानाच्या पालख्यांना वाखरीमध्ये पोहोचल्यावर दीड किलोमीटर प्रातिनिधीक पायी वारी करायला परवानगी देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !