पोस्ट्स

MB NEWS-ओबीसी आरक्षणात राज्य सरकारचा वेळकाढूपणा ; २६ जूनला रस्त्यावर उतरून जाब विचारणारच* *पंकजाताई मुंडे यांची पुण्यात पत्रकार परिषद*

इमेज
 * ओबीसी आरक्षणात राज्य सरकारचा वेळकाढूपणा ; २६ जूनला रस्त्यावर उतरून जाब विचारणारच*  *पंकजाताई मुंडे यांची पुण्यात पत्रकार परिषद* *आरक्षणासाठी प्रत्येक जिल्हयात टास्क फोर्स नेमून कालबध्द कार्यक्रम राबविण्याची केली मागणी* पुणे । दिनांक २०। ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा आणि वेळकाढूपणाचे धोरणच कारणीभूत आहे, यामुळे  ओबीसी समाजात संतापाची लाट आहे, येत्या २६ जून रोजी रस्त्यावर उतरून याचा जाब आम्ही विचारणार आहोत असे सांगत ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम राज्य सरकारचेच आहे, त्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे असल्याचे  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पंकजाताई मुंडे बोलत होत्या. महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप नेते योगेश टिळेकर, शहर जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक यावेळी उपस्थित होते. पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मी ग्रामविका

MB NEWS-शिवसेना सामाजिक हित जोपासणारे संघटना-अभयकुमार ठक्कर* *55 वृक्ष भेट; 55 आरोग्य सेवकांचा सन्मान; 5555 बीज वाटप* *परळीत शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा*

इमेज
 * शिवसेना सामाजिक हित जोपासणारे संघटना-अभयकुमार ठक्कर* *55 वृक्ष भेट; 55 आरोग्य सेवकांचा सन्मान; 5555 बीज वाटप* *परळीत शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा* *परळी वैजनाथ (प्रतिनिधी)* हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व विद्यार्थी सेना/युवासेना प्रमुख ना.आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सामाजिक हित जोपासणारे व लोकसेवेचे व्रत हाती घेतलेले संघटना आहे असे मनोगत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त नंदागौळ रोडवरील वनराईला 55 वृक्षांची भेट देण्यात आली असून 55 आरोग्य सेवकांचा सन्मान व 5555 बीज वाटप करण्यात आले. परळी प्रभू वैद्यनाथांच्या भूमित शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण

MB NEWS- *बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटन व परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन च्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी* ⬛ _रक्ततपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद_ ⬛

इमेज
 *बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटन व परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन च्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी* ⬛ _रक्ततपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद_ ⬛  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटन व परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन च्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. सोशल डिस्टंसिंगचे योग्य पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.तसेच महेश नवमी निमित्ताने आयोजित रक्त तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.     महेश नवमी निमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवान महेश पुजन केले. तसेच पालक क्लिनिक लॅब येथे आयोजित रक्त तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे शिबीर एक आठवडा चालणार आहे.या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. महेश नवमी निमित्त कार्यक्रमास माहेश्वरी युवा संघटन चे बीड जिल्हाध्यक्ष पंकज तापडिया, सचिव तपण मदानी, परळी तालुका माहेश्वरी युवा अध्यक्ष आशिष काबरा,सचिव अक्षय भंडारी,प्रोजेक्ट चेअरमन श्रीनिवास लाहोटी, सुरेश पोरवाल, आनंद तोष्णीवाल, पुरुषोत्तम मानधने, शिवाभाऊ मानधने, पंकज भन्साळी, आकाश कलंत्री, शिवजी भंडारी, प्रशांत उपाध्य

MB NEWS-हुंडा घेतला एकीकडून लग्न केले दुसरीसोबत ; वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रताप

इमेज
  हुंडा घेतला एकीकडून लग्न केले दुसरीसोबत ; वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रताप परळी वैजनाथ - तुमच्या मुलीबरोबर लग्न करतो मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी 7 लाख रुपये द्या असे म्हणून एका वैद्यकीय अधिकाऱ्याने परळीतील मुलीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे मागणी घातली.साखरपुडाही झाला, मात्र हुंडा घेतल्यानंतर त्याने परस्पर दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याच्या आरोपावरून त्या अधिकाऱ्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील साकोळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. संदीप वसंतराव मंत्रे (रा. सोमेश्वरनगर, परळी) असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, गतवर्षी 18 सप्टेंबर रोजी संदीप त्यांच्या घरी आला. मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, मी तुमच्या मुलीशी लग्न करतो अशी त्याने मागणी घातली. मुलगा डॉक्टर आहे, स्वतः मागणी घालत असल्याने स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले.  23 सप्टेंबर रोजी दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या

MB NEWS-महिला महाविद्यालयात प्राध्यापक गुणगौरव सोहळा संपन्न*

इमेज
 * महिला महाविद्यालयात प्राध्यापक गुणगौरव सोहळा संपन्न* परळी वैजनाथ दि.१८ (प्रतिनिधी)               लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात प्राध्यापक गुणगौरव सोहळा संपन्न झाला . कोविड 19 प्रसंगाने करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सदुपयोग करून ज्या प्राध्यापकांनी ग्रंथसंपदा निर्माण केली , पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली तसेच ज्या प्राध्यापकांना पीएच.डी. चे मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली अशा सर्व प्राध्यापकांचा गुणगौरव शुक्रवारी (दि.१८) संस्थेच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी ज्यांच्या विचारातून ही संकल्पना अभिव्यक्त झाली असे संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख हे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभले .संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक गिरीश चौधरी व हेमंत कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै . लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. शामरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या स्वागत समारंभानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व सर्वोत्कृष्

MB NEWS-श्री पार्डिकर महाविद्यालयात वाचन दिनानिमित्त वेबिणार

इमेज
  श्री पार्डिकर महाविद्यालयात वाचन दिनानिमित्त वेबिणार  सिरसाळा:- श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.-१९ जून २०२१ शनिवार रोजी "स्वर्गीय पी एन पाणिक्कर यांच्या स्मरणार्थ " वाचन दिनानिमित्य एक दिवसीय वेबिनार आयोजन करण्यात आले. या वेबिनारला प्रमुख पाहुणे म्हणून प्रो डॉ साहेबराव सोनसळे तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच पी कदम उपस्थित होते.   "व्यक्तिमत्व विकासात वाचन संस्कृतीची आवश्यकता" या विषयावर मार्गदर्शन करताना प्रो. डॉ. साहेबराव सोनसळे (मराठी विभाग, कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ) यांनी व्यक्तीमत्व विकास व वाचन यांचे व्यक्तीच्या जीवनातील महत्त्व विशद केले. मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या प्रमाणे अन्नाची गरज आहे, त्याच प्रमाणे ज्ञान आत्मसात करण्यासाठी वाचन संस्कृती जोपासने आवश्यक आहे. माणसाची उंची ही त्याची बुद्धी, आचरण व व्यक्तिमत्त्वावर अवलंबून आसते, असे परखड विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ एच पी कदम यांनी केला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक (ग्रंथपाल) डॉ. डी.बी.

MB NEWS-ओबीसीच्या विविध न्याय मागण्यांसाठी गुरुवारी परळी तहसील कार्यालयावर निदर्शने*

इमेज
 * ओबीसीच्या विविध न्याय मागण्यांसाठी गुरुवारी परळी तहसील कार्यालयावर निदर्शने* *ओबीसी जनमोर्चा च्या वतीने महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर निदर्शने* *ओबीसी संघटना ,ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने निदर्शनात सहभागी होण्याचे केले आवाहन* परळी वैजनाथ/प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द झाले तसेच कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव संमत करून शासकीय पदोन्नतीतील आरक्षण सरकारने जाणीवपूर्वक व त्यांच्या हलगर्जीपणामुळे रद्द केले याच्या निषेधार्थ महाराष्ट्र ओबीसी जनमोर्चा च्या वतीने ओबीसींच्या विविध संवैधानिक न्याय मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर भव्य निदर्शने दिनांक 24 जून रोजी करण्यात येणार आहेत . ओबीसी जनमोर्चा चे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावस्कर उपाध्यक्ष प्रा. टी.पी. मुंडे (सर ) यांच्या आदेशानुसार हे निदर्शने होणार आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना आणि ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी जनमोर्चा च्या वतीने करण्यात

MB NEWS- *..रस्त्यावर उतरू, न्यायालयात दाद मागू पण ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही - पंकजाताई मुंडे* _*२६ जून रोजी राज्यभर करणार 'चक्का जाम' आंदोलन*_

इमेज
 *..रस्त्यावर उतरू, न्यायालयात दाद मागू पण ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही - पंकजाताई मुंडे* _*२६ जून रोजी राज्यभर करणार 'चक्का जाम' आंदोलन*_ मुंबई । दिनांक १८। राज्य सरकार ओबीसींची बाजू नीटपणे मांडू शकले नाही, त्यामुळेच राजकीय आरक्षण गेलं. यासाठी आता आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे येत्या २६ जून रोजी राज्यभर 'चक्का जाम' आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना सांगितले.   ओबीसी आरक्षण प्रश्नांवर भाजप नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. चंद्रशेखर बावनकुळे, आ. मनिषा चौधरी, योगेश टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते.  पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या," आरक्षण हा सर्वच पक्षातील ओबीसी नेत्यांचा हा विषय आहे. आम्ही ओबीसींच्या हितासाठी काहीही करायला तयार आहोत. आज पक्षानं घेतलेल्या बैठकीत असा निर्णय झाला आहे की, २६ जून रोजी आम्ही चक्का जाम करणार आहोत. त्यामुळे ओबीसी नेत्यांच्या बैठकीबद्दल चर्चा करण

MB NEWS-वैद्यनाथ बॅंकेचे कर्मचारी हभप सदाशिव महाराज फड मरळवाडीकर यांचे निधन

इमेज
  वैद्यनाथ बॅंकेचे कर्मचारी हभप सदाशिव महाराज फड मरळवाडीकर यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         परळी पंचक्रोशीत सर्व परिचित वैद्यनाथ बॅंकेचे कर्मचारी हभप सदाशिव महाराज फड मरळवाडीकर यांचे निधन झाले आहे. तालुक्यातील वारकरी कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.         मरळवाडी येथील मुळ रहिवासी असलेले हभप सदाशिव महाराज फड (वय ५० वर्षे) हे वैद्यनाथ अर्बन को.आॅप.बॅंकेत नौकरीला होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन भाऊ,एक बहीण असा परिवार आहे. वैद्यनाथ बॅंकेची नोकरी सांभाळून त्यांचा विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग होता.महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार तथा वारकरी शिक्षण संस्था आळंदी चे माजी अध्यक्ष हभप केशव महाराज उखळीकर यांचे शिष्य म्हणून ते परिचित होते.किर्तन, प्रवचनकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात शोकभावना व्यक्त होत आहेत.त्यांच्या निधनाने फड कुटुंबावर कोसळलेल्या या दु: खात एम बी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज ११ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १५६

इमेज
  आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज ११ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १५६ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        गेल्या अनेक दिवसापासून आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात  बीड जिल्ह्याच्या दैनंदिन covid-19 अहवालात परळी तालुक्यातील संख्या कमी झालेली दिसत होती.  मात्र आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या वाढली आहे.  या अहवालात परळी तालुक्याची संख्या ११आहे.                  आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या१५६ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत होती. मात्र आज  परळी तालुक्याची संख्या ११ आहे.  कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-शिक्षकाला जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी: सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध

इमेज
  शिक्षकाला जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी: सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           येथील एका शाळेतील साध्या अंतर्गत कामावरुन लिपिक आणि सहशिक्षकात जीवे मारण्याच्या धमकी पर्यंत प्रकरण आले असुन हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले आहे. लिपीक असलेल्या व्यक्तीची बायको याच शाळेत असुन बायकोच्या वर्गाची हजरी फिर्यादी शिक्षकाने लिहून पूर्ण करुन दिली नाही म्हणून फोनवर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लिपीका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने आज पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असुन निषेध करण्यात आला आहे.       याबाबतीत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सतीष बळीराम जाधव रा. तुळजानगर,नरहरी महाराज मंदिर परिसर हे नाथ रोडवरील महर्षी कणाद विद्यालय येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दि.१६ रोजी ते शाळेतुन घरी जात असताना त्यांना एक फोन आला व त्या फोनवर धमकी मिळाली . याबाबतीत काॅल रेकाॅर्डिंग घेऊन त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन शाळेच्या व्यवस्थापनाशी संबंधित व लिपिक पदावर कार्यर

MB NEWS-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बीड मध्ये जिल्ह्यस्तरीय कोविड १९ व खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी आगमन,* *समवेत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आहेत*(video)

इमेज
 * उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बीड मध्ये जिल्ह्यस्तरीय कोविड १९ व खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी आगमन,* *समवेत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आहेत* ---------- Video----------+

MB NEWS-पालकमंत्री ना धनंजय मुंडे तीन दिवस बीड जिल्हा दौ-यावर तर आरोग्य मंत्री राजेश टोपे उद्या बीडमध्ये

इमेज
  पालकमंत्री ना धनंजय मुंडे तीन दिवस बीड जिल्हा दौ-यावर तर आरोग्य मंत्री राजेश टोपे उद्या बीडमध्ये बीड, प्रतिनिधी...        राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या बीड जिल्हा दौ-यावर येत आहेत.जालना,बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांचा दौरा असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे हे उद्या दि.१८ रोजी बीड जिल्हा दौ-यावर येत आहेत.               बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थिती चा संपूर्ण आढावा घेणार आहेत.तसेच खरीप हंगामाबाबतचा आढावा घेणार आहेत. शुक्रवार दि.१८ रोजी सकाळी १० वा.ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. दरम्यान बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे हे उद्या दि.१८ पासुन तीन दिवस जिल्ह्यात असणार आहेत.

MB NEWS-मोठी उपलब्धता: परळी तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी दोन शासकीय वसतिगृह होणार ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित

इमेज
  मोठी उपलब्धता: परळी तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी दोन शासकीय वसतिगृह होणार  ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित माझ्या आयुष्यातील महत्त्वाकांक्षी योजनेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलल्याचा मनस्वी आनंद - धनंजय मुंडे मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय 15 दिवसात उतरवला प्रत्यक्षात! मुंबई (दि. 17) ---- : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवडक 10 तालुक्यात 20 वसतिगृह उभारणे (प्रत्येकी 100 क्षमतेचे मुलांसाठी एक व मुलींसाठी एक), आवश्यक पदभरती, इमारत उपलब्धी आदी बाबींना मंजुरी देणारा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत आज निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिली आहे.  दि. 02 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 15 दिवसांच्या आत या योजनेला कार्यान्वित करण्याचा शासन निर्णय निर्गमित कर

MB NEWS-बीड जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचे निर्देश

इमेज
  बीड जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचे निर्देश *ना. जयंत पाटील, ना. धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जलसंपदा विभागातील प्रलंबित विषयासंदर्भात बैठक संपन्न* *वाण धरणाची उंची वाढवणे, माजलगाव उजवा कालवा अस्तरीकरण, वाण, कुंडलिका धरणाचे पिडीएन, खुंटेफळ तलाव, बिंदुसरा निम्न बंधारा आदी विषय लागणार मार्गी* मुंबई (दि. 17) ---- : बीड जिल्ह्यातील मर्यादित सिंचनाच्या सोयी पाहता जिल्ह्यातील जलसंपदा सक्षम करण्यासाठी विविध साठवण तलाव निर्माण करणे, मध्यम व लघु प्रकल्पांची उंची वाढवणे, विविध उपसा सिंचन योजना राबविणे, यांसह जिल्ह्यातील आमच्या सहकारी लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत जलसंपदा विभागाशी संबंधित दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे बीड जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील विविध प्रलंबित माग

MB NEWS-परळीत गावठी पिस्टल व दोन जीवंत काडतुसासह एकास अटक

इमेज
  परळीत गावठी पिस्टल व दोन जीवंत काडतुसासह एकास अटक  परळी (प्रतिनिधी) ः- शहरातील नाथ रोडवर एकाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती परळी शहर डी बी पथकाचे भास्कर केंद्रे यांना मिळताच त्यांनी सापळा रचुन एकास अटक केली.गावठी पिस्टल, दोन जीवंत काडतुस व मँग्जीन जप्त केले आहे.  याबाबत पोलिस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, दिनांक 17/06/2021 रोजी बातमी मिळाली की,अंदाजे दुपारी 3.00 च्या दरम्यान परळी येथील नाथ टॉकिज समोर एक ईसम थांबला आहे त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे अशी खात्रीलाईक बातमी मिळाल्याने माहीती दिलेल्या वर्णणावरुन त्या इसमास ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव अशोक मधुकर मुंडे वय 34 राहणार पांगरी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड असे सांगीतले. अंगझडती घेतली असता कमरेला आतुन ठेवलेला एक गावठी पिस्टल मॅगझीन व दोन जींवत काडतुस मिळुन आले. कब्जात असलेल्या गावठी पिस्टलचे लायसन्स विचारले असता त्यांनी त्यांचेकडे शस्ञ बाळगण्याचे कोणतेही परवाना नसल्याचे सांगीतले. त्यांच्या विरुद्ध तुकाराम मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस स्टेशन गुर.नं 93/2021कलम

MB NEWS-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या बीड जिल्हा दौ-यावर

इमेज
  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या बीड जिल्हा दौ-यावर बीड, प्रतिनिधी...        राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या बीड जिल्हा दौ-यावर येत आहेत.जालना,बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांचा दौरा असणार आहे.        बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ते बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थिती चा संपूर्ण आढावा घेणार आहेत. शुक्रवार दि.१८ रोजी सकाळी १० वा.ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.

MB NEWS- *१२५ वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये;गहिनीनाथ गडाच्या पंढरपूर वारीचा मार्ग सरकारने मोकळा करावा* *पंकजाताई मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

इमेज
 *१२५ वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये;गहिनीनाथ गडाच्या पंढरपूर वारीचा मार्ग सरकारने मोकळा करावा* *पंकजाताई मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*  बीड । दिनांक १७ । श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला सरकारने परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. वारीच्या १२५ वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे. बीड जिल्हयातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड (ता. पाटोदा) हे वारकरी संप्रदायाचे मुळ उगमस्थान आहे. नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथ यांची संजीवन समाधी याठिकाणी आहे, त्यांचेपासूनच वारकरी संप्रदायाचा आरंभ होतो. दरवर्षी या गडावरून वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरला जात असते. सद्गुरू संत वामनभाऊ महाराज यांनी १२५ वर्षापूर्वी या दिंडीची सुरवात केली होती, ही परंपरा आजही सध्याचे महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे सुरू आहे. सध्या कोरोना महामारीमुळे सरकारने या दिंडीला परवानगी दिली नाही, त्यामुळे भाविक भक्तांमध्ये खूप अस्वस्थता निर्म

MB NEWS-परळीत चोरट्यांना अनलाॅक: विद्यानगरमधिल घरासमोर लावलेली कार गेली चोरीला

इमेज
  परळीत चोरट्यांना अनलाॅक: विद्यानगरमधिल घरासमोर लावलेली कार गेली चोरीला परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     गेल्या आठवड्याभरापासुन विविध चोरीच्या घटनांची साखळी सुरूच आहे. विविध घटनांनंतर आता सुरक्षित विभाग म्हणून ओळख असलेल्या विद्यानगरमधिल घरासमोर लावलेली कार चोरीला गेली असल्याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.                  याबाबतीत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभय गहिनीनाथ रोडगे रा.विद्यानगर यांची घरासमोर लावलेली वापरती कार चोरीला गेली आहे.आल्टो कार क्र. एम एच 23 ई 1214 ही मारुती कार अज्ञात चोरांनी दि.१४ ते १५ च्या मध्यरात्री चोरुन नेली आहे.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.हे. शिंदे हे करीत आहेत.विविध ठिकाणी अशा चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांना धडकी भरत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे पोलीसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.परळीत गुन्हेगारी करणारांना मोकळे रान मिळाले आहे.कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातूनच जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे

MB NEWS-⭕स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू*

इमेज
------------------------------------------  *⭕स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू* ------------------------------------------ परळी वैजनाथ, प्रतिनिधी कोरोनाची  पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेमुळे तब्बल 15 महिन्यांपासून शाळांना कुलूपच आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कमी होऊ लागली असून अनेकांकडे ऑनलाईनची  साधनेही उपलब्ध नाहीत. या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन 15 ऑगस्टपासून तीन टप्प्यात  ऑफलाइन शाळा सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केल्याचे विश्‍वसनिय सूत्रांनी सांगितले.  पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा मार्च 2020 पासून सुरूच झाली नाही. तर सहावी ते आठवीचे वर्ग मागच्या वर्षी काही दिवसांसाठीच सुरू झाले. त्यामुळे शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. शाळांमधील गर्दी पाहून मुले भेदरतील, वर्षभर मुले घरीच असल्याने त्यांच्यातील अभ्यासाची सवय मोडत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेकांना डोळ्याचा त्रास सुरू झाल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे. ऑनलाइन शिक्षणापासून 26 टक्‍क्

MB NEWS-*महिला महाविद्यालयाचे प्रा.अरुण चव्हाण यांना पीएच.डी. प्रदान .*

इमेज
  *महिला महाविद्यालयाचे प्रा.अरुण चव्हाण यांना पीएच.डी. प्रदान .*  परळी वैजनाथ दि.१५ (प्रतिनिधी)        येथील  कै .लक्ष्मीबाई देशमुख  महिला महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख  प्रा.डॉ. अरुण चव्हाण यांना नांदेड येथील  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने  शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च असलेली विद्यावाचस्पती अर्थात् पीएच .डी. ही पदवी  प्रदान केली .            यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणाऱ्या व प्रतिवर्षी प्रत्येक क्षेत्रात घवघवीत यश संपादन करणाऱ्या कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला  महाविद्यालयात संस्कृत विभागप्रमुख म्हणून प्रा.  अरुण माधवराव चव्हाण कार्यरत आहेत. त्यांनी  " *काव्यतीर्थ प्राचार्य हरिश्चंद्र रेणापूरकर यांच्या साहित्यकृतींचे चिकित्सक अध्ययन"* या विषयाचा अभ्यासपूर्ण प्रबंध , ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा .डॉ . गणंजय कहाळेकर , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड . यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केला . या  अभ्यासपूर्ण प्रबंधाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच मान्यता देऊन सरांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) या पदवीने गौरवान्वित केले . या त्यांच्या यशामु

MB NEWS-काशिनाथ कातकडे यांना मातृशोक* *शेषामाय कातकडे यांचे वृध्दपकाळाने निधन*

इमेज
 * काशिनाथ कातकडे यांना मातृशोक* *शेषामाय कातकडे यांचे वृध्दपकाळाने निधन* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी येथील शेषामाय पंढरीनाथ कातकडे यांचे दि.15 जून रोजी राहत्या घरी वृध्दपकाळाने निधन झाले. त्या 90 वर्ष वयाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर दि.16 जून रोजी सकाळी 9 वाजता पिंपरी ता.अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कशिनाथ पंढरीनाथ कातकडे यांच्या मातोश्री होत.            पिंपरी येथील शेषामाय पंढरीनाथ कातकडे यांचे आज मंगळवार, दि.15 जून रोजी सायंकाळी 5 वाजता वृध्दपकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या गावातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्या नेहमीच सहभागी होत. धार्मीक, पारंपारिक कार्यक्रमातही त्या सहभागी होत. अत्यंत मिनमिळावू व सुस्वभावी असल्याने त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. जय हनुमान विश्वस्त मंडळ पिंपरी अध्यक्ष व अंबाजोगाई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पंढरीनाथ कातकडे यांच्या मातोश्री व अभिनव विद्यालयाचे शिक्षक सुर्यकांत काशीनाथ कातकडे यांच्या आजी होत.     

MB NEWS-ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेणे पोलीस शिपाई हरगावकर यांची खातेनिहाय चौकशी करा ; परळी तालुका व शहर पत्रकार संघाची मागणी

इमेज
  ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेणे पोलीस शिपाई हरगावकर यांची खातेनिहाय  चौकशी करा ; परळी तालुका व शहर पत्रकार संघाची मागणी परळी वैजनाथ दि १५ ( प्रतिनिधी ) :- येथील गेली ३५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नवनाथ हरगावकर यांच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी एकमुखी मागणी परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्यासह राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना धनंजय मुंडे, बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे, विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंबाजोगाई, उपजिल्हाधिकारी, परळी वैजनाथ तथा पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन परळी आदिंना पाठवलेल्या निवेदनाद्वारे वरील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.       निवेदनात म्हटले आहे की, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्

MB NEWS-चि.पार्थ कराडचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश

इमेज
  चि.पार्थ कराडचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश  परळी l प्रतिनिधी नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत पोदार स्कुलचा विध्यार्थी चि. पार्थ बालासाहेब कराड याने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांचा अंगभूत सामाजिक विकास व्हावा यासाठी दरवर्षी ही परीक्षा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येते. या परीक्षेची मुलांच्या मनाने काठिण्य पातळी जास्त असल्याने त्यात यश संपादन करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. कराड हॉस्पिटलचे संचालक डॉ.शालिनीताई व डॉ.बालासाहेब कराड यांचा मुलगा चि. पार्थ हा परळीच्या पोदार स्कुलमध्ये शिक्षण घेतो. अभ्यासाबरोबरच त्याला क्रीडा आणि इतरही उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची आवड आहे. नुकतीच त्याने राष्ट्रीय पातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो पहिल्या क्रमांकाच्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. याअगोदर त्याने एम्स दिल्ली मेडिकल इन्ट्रन्स परीक्षेतही यश संपादन केले असून, शालेय स्तरावरील राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतही पदक पटकावले आहे. कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या य

MB NEWS-आजचा कोविड अहवालात परळी तालुक्याचा आकडा वाढला ;आज १४ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १५७

इमेज
  आजचा कोविड अहवालात परळी तालुक्याचा आकडा वाढला ;आज १४ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १५७ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        गेल्या अनेक दिवसापासून आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात बीड जिल्ह्याच्या दैनंदिन covid-19 अहवालात परळी तालुक्यातील संख्या कमी झालेली दिसत होती. मात्र आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या वाढली आहे. या अहवालात परळी तालुक्याची संख्या १४आहे.                  आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या१५७ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत होती. मात्र आज परळी तालुक्याची संख्या १४ आहे. कोरोना संसर्गाची साखळी संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.