युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-*महिला महाविद्यालयाचे प्रा.अरुण चव्हाण यांना पीएच.डी. प्रदान .*

 *महिला महाविद्यालयाचे प्रा.अरुण चव्हाण यांना पीएच.डी. प्रदान .* 



परळी वैजनाथ दि.१५ (प्रतिनिधी)

       येथील  कै .लक्ष्मीबाई देशमुख  महिला महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख  प्रा.डॉ. अरुण चव्हाण यांना नांदेड येथील  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने  शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च असलेली विद्यावाचस्पती अर्थात् पीएच .डी. ही पदवी  प्रदान केली .

           यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणाऱ्या व प्रतिवर्षी प्रत्येक क्षेत्रात घवघवीत यश संपादन करणाऱ्या कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला  महाविद्यालयात संस्कृत विभागप्रमुख म्हणून प्रा.  अरुण माधवराव चव्हाण कार्यरत आहेत. त्यांनी 

" *काव्यतीर्थ प्राचार्य हरिश्चंद्र रेणापूरकर यांच्या साहित्यकृतींचे चिकित्सक अध्ययन"* या विषयाचा अभ्यासपूर्ण प्रबंध , ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा .डॉ . गणंजय कहाळेकर , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड . यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केला . या  अभ्यासपूर्ण प्रबंधाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच मान्यता देऊन सरांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) या पदवीने गौरवान्वित केले .

या त्यांच्या यशामुळे कै .  लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक  अनिलरावजी देशमुख , संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख , संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख तथा संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले .

     आपल्या सहकाऱ्याच्या यशामुळे आनंदित होऊन संस्थेच्या संचालिका  छायाताई देशमुख व प्रा डॉ . विद्याताई देशमुख यांच्यासमवेत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.  एल. एस. मुंडे , कार्यालयीन अधीक्षक  प्रमोद पत्की तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरांचे खूप खूप अभिनंदन केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या