MB NEWS-श्री पार्डिकर महाविद्यालयात वाचन दिनानिमित्त वेबिणार

 श्री पार्डिकर महाविद्यालयात वाचन दिनानिमित्त वेबिणार 



सिरसाळा:- श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.-१९ जून २०२१ शनिवार रोजी "स्वर्गीय पी एन पाणिक्कर यांच्या स्मरणार्थ " वाचन दिनानिमित्य एक दिवसीय वेबिनार आयोजन करण्यात आले. या वेबिनारला प्रमुख पाहुणे म्हणून प्रो डॉ साहेबराव सोनसळे तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच पी कदम उपस्थित होते.

  "व्यक्तिमत्व विकासात वाचन संस्कृतीची आवश्यकता" या विषयावर मार्गदर्शन करताना प्रो. डॉ. साहेबराव सोनसळे (मराठी विभाग, कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ) यांनी व्यक्तीमत्व विकास व वाचन यांचे व्यक्तीच्या जीवनातील महत्त्व विशद केले.

मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या प्रमाणे अन्नाची गरज आहे, त्याच प्रमाणे ज्ञान आत्मसात करण्यासाठी वाचन संस्कृती जोपासने आवश्यक आहे. माणसाची उंची ही त्याची बुद्धी, आचरण व व्यक्तिमत्त्वावर अवलंबून आसते, असे परखड विचार त्यांनी मांडले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ एच पी कदम यांनी केला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक (ग्रंथपाल) डॉ. डी.बी. मस्के यांनी केले आणि सूत्रसंचालन डॉ जयादिप सोळंके यांनी तर आभार श्री शहाजी कदम यांनी मानले.

या ऑनलाईन वेबीनारसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !