युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळीत गावठी पिस्टल व दोन जीवंत काडतुसासह एकास अटक

 परळीत गावठी पिस्टल व दोन जीवंत काडतुसासह एकास अटक 



परळी (प्रतिनिधी) ः- शहरातील नाथ रोडवर एकाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती परळी शहर डी बी पथकाचे भास्कर केंद्रे यांना मिळताच त्यांनी सापळा रचुन एकास अटक केली.गावठी पिस्टल, दोन जीवंत काडतुस व मँग्जीन जप्त केले आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, दिनांक 17/06/2021 रोजी बातमी मिळाली की,अंदाजे दुपारी 3.00 च्या दरम्यान परळी येथील नाथ टॉकिज समोर एक ईसम थांबला आहे त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे अशी खात्रीलाईक बातमी मिळाल्याने माहीती दिलेल्या वर्णणावरुन त्या इसमास ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव अशोक मधुकर मुंडे वय 34 राहणार पांगरी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड असे सांगीतले. अंगझडती घेतली असता कमरेला आतुन ठेवलेला एक गावठी पिस्टल मॅगझीन व दोन जींवत काडतुस मिळुन आले. कब्जात असलेल्या गावठी पिस्टलचे लायसन्स विचारले असता त्यांनी त्यांचेकडे शस्ञ बाळगण्याचे कोणतेही परवाना नसल्याचे सांगीतले. त्यांच्या विरुद्ध तुकाराम मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस स्टेशन गुर.नं 93/2021कलम 3/25 भारतीय हत्यार कायदया प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.ही कार्यवाही परळी शहरचे पोलीस निरिक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, तुकाराम मुरकुटे, सचिन सानप यांनी केली. पुढील तपास पोलीस जमादार दिगांबर चट्टे हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या