इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटन व परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन च्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी* ⬛ _रक्ततपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद_ ⬛

 *बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटन व परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन च्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी*



⬛ _रक्ततपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद_ ⬛ 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटन व परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन च्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. सोशल डिस्टंसिंगचे योग्य पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.तसेच महेश नवमी निमित्ताने आयोजित रक्त तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



    महेश नवमी निमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवान महेश पुजन केले. तसेच पालक क्लिनिक लॅब येथे आयोजित रक्त तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे शिबीर एक आठवडा चालणार आहे.या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. महेश नवमी निमित्त कार्यक्रमास माहेश्वरी युवा संघटन चे बीड जिल्हाध्यक्ष पंकज तापडिया, सचिव तपण मदानी, परळी तालुका माहेश्वरी युवा अध्यक्ष आशिष काबरा,सचिव अक्षय भंडारी,प्रोजेक्ट चेअरमन श्रीनिवास लाहोटी, सुरेश पोरवाल, आनंद तोष्णीवाल, पुरुषोत्तम मानधने, शिवाभाऊ मानधने, पंकज भन्साळी, आकाश कलंत्री, शिवजी भंडारी, प्रशांत उपाध्याय, कृष्णा बंग, संदीप मोदानी, प्रीतम लाहोटी, स्वप्निल नावंदर, सचिन तापडिया,अनुप सारडा, सुमित लाहोटी, प्रवीण पोरवाल, सुरज कोठारी, भूषण लाहोटी, उत्तम शर्मा आदी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!