इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-शिवसेना सामाजिक हित जोपासणारे संघटना-अभयकुमार ठक्कर* *55 वृक्ष भेट; 55 आरोग्य सेवकांचा सन्मान; 5555 बीज वाटप* *परळीत शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा*

 *शिवसेना सामाजिक हित जोपासणारे संघटना-अभयकुमार ठक्कर*



*55 वृक्ष भेट; 55 आरोग्य सेवकांचा सन्मान; 5555 बीज वाटप*

*परळीत शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा*


*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)*


हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व विद्यार्थी सेना/युवासेना प्रमुख ना.आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सामाजिक हित जोपासणारे व लोकसेवेचे व्रत हाती घेतलेले संघटना आहे असे मनोगत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त नंदागौळ रोडवरील वनराईला 55 वृक्षांची भेट देण्यात आली असून 55 आरोग्य सेवकांचा सन्मान व 5555 बीज वाटप करण्यात आले.


परळी प्रभू वैद्यनाथांच्या भूमित शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 त्या नंतर परळी- नंदागौळ येथील वन विभागाच्या वनराईत 55 झाडे लावून वृक्षारोपनाने करत वनरक्षक श्री.राठोड यांना विविध वृक्षाचे (5555)पाच हजार पाचशे पंचावन्न बीज वृक्ष लागवडी साठी देण्यात आले. त्याच बरोबर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षेत कार्य करणार्‍या 55 कोविड सेवकांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,बीड जिल्हा रुग्णालयाचे आर.एम.ओ.डॉ.ढाकणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख अर्षद,पत्रकार संतोष जुजगर,शहर संघटक संजय कुकडे,मा.उप शहर प्रमुख सतिष जगताप, कवी अनंत मुंडे यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

या वेळी भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा उपप्रमुख मोहन परदेशी, तालुका समन्वयक अमित कचरे, शिवसेना विभाग प्रमुख संजय सोमाणे, उपशहर प्रमुख किशन बुंदेले, भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख गजानन कोकीळ,माऊली मुंडे, वैभव जगताप, लक्ष्मण मुंडे,प्रकाश देवकर,योगेश जाधव,सिद्धार्थ गायकवाड,अशोक चव्हाण,देवानंद गोरे, रावसाहेब चव्हाण आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!