MB NEWS-शिक्षकाला जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी: सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध

 शिक्षकाला जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी: सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

          येथील एका शाळेतील साध्या अंतर्गत कामावरुन लिपिक आणि सहशिक्षकात जीवे मारण्याच्या धमकी पर्यंत प्रकरण आले असुन हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले आहे. लिपीक असलेल्या व्यक्तीची बायको याच शाळेत असुन बायकोच्या वर्गाची हजरी फिर्यादी शिक्षकाने लिहून पूर्ण करुन दिली नाही म्हणून फोनवर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लिपीका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने आज पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असुन निषेध करण्यात आला आहे.

      याबाबतीत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सतीष बळीराम जाधव रा. तुळजानगर,नरहरी महाराज मंदिर परिसर हे नाथ रोडवरील महर्षी कणाद विद्यालय येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दि.१६ रोजी ते शाळेतुन घरी जात असताना त्यांना एक फोन आला व त्या फोनवर धमकी मिळाली . याबाबतीत काॅल रेकाॅर्डिंग घेऊन त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन शाळेच्या व्यवस्थापनाशी संबंधित व लिपिक पदावर कार्यरत असलेल्या केशव निवृत्ती भांगे यांनी आपल्याला फोनवरून आईमाईवर शिव्या दिल्या,जातीवाचक शिव्या घालत आपमाणित केले,तंगडे तोडतो, शाळेच्या गेटवरच खून करतो, गावाकडे गेला तरी तिथं येऊन मुडदा पाडतो अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे आपल्या जीवितास व नोकरीस धोका असल्याच्या आशयाची फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादी वरुन संबंधिता विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास हे.काॅ.गोविंद बडे हे करीत आहेत.

      दरम्यान अतिशय अर्वाच भाषेत जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करुन कडक कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने आज पोलीस ठाण्यात निवेदन सादर करुन करण्यात आली आहे.यावेळी मोठ्या संख्येने मराठा युवक, समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार