MB NEWS-काशिनाथ कातकडे यांना मातृशोक* *शेषामाय कातकडे यांचे वृध्दपकाळाने निधन*

 *काशिनाथ कातकडे यांना मातृशोक*



*शेषामाय कातकडे यांचे वृध्दपकाळाने निधन*


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी येथील शेषामाय पंढरीनाथ कातकडे यांचे दि.15 जून रोजी राहत्या घरी वृध्दपकाळाने निधन झाले. त्या 90 वर्ष वयाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर दि.16 जून रोजी सकाळी 9 वाजता पिंपरी ता.अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कशिनाथ पंढरीनाथ कातकडे यांच्या मातोश्री होत. 

          पिंपरी येथील शेषामाय पंढरीनाथ कातकडे यांचे आज मंगळवार, दि.15 जून रोजी सायंकाळी 5 वाजता वृध्दपकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या गावातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्या नेहमीच सहभागी होत. धार्मीक, पारंपारिक कार्यक्रमातही त्या सहभागी होत. अत्यंत मिनमिळावू व सुस्वभावी असल्याने त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. जय हनुमान विश्वस्त मंडळ पिंपरी अध्यक्ष व अंबाजोगाई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पंढरीनाथ कातकडे यांच्या मातोश्री व अभिनव विद्यालयाचे शिक्षक सुर्यकांत काशीनाथ कातकडे यांच्या आजी होत. 

        शेषामाय पंढरीनाथ कातकडे यांच्या पार्थिवावर दि.16 जून रोजी पिंपरी ता.अंबाजोगाई येथे सकाळी 9 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार