MB NEWS-ओबीसीच्या विविध न्याय मागण्यांसाठी गुरुवारी परळी तहसील कार्यालयावर निदर्शने*

 *ओबीसीच्या विविध न्याय मागण्यांसाठी गुरुवारी परळी तहसील कार्यालयावर निदर्शने*



*ओबीसी जनमोर्चा च्या वतीने महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर निदर्शने*


*ओबीसी संघटना ,ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने निदर्शनात सहभागी होण्याचे केले आवाहन*

परळी वैजनाथ/प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द झाले तसेच कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव संमत करून शासकीय पदोन्नतीतील आरक्षण सरकारने जाणीवपूर्वक व त्यांच्या हलगर्जीपणामुळे रद्द केले याच्या निषेधार्थ महाराष्ट्र

ओबीसी जनमोर्चा च्या वतीने ओबीसींच्या विविध संवैधानिक न्याय मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर भव्य निदर्शने दिनांक 24 जून रोजी करण्यात येणार आहेत . ओबीसी जनमोर्चा चे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावस्कर उपाध्यक्ष प्रा. टी.पी. मुंडे (सर ) यांच्या आदेशानुसार हे निदर्शने होणार आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना आणि ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी जनमोर्चा च्या वतीने करण्यात आले आहे.याच अनुषंगाने परळी तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात येणार आहेत गुरुवार दिनांक 24 जून 2021 रोजी सकाळी ठीक 11 वाजता तहसील कार्यालय येथे ही निदर्शने होणार आहेत.

    पुढील मागण्यांच्या संदर्भात हे निदर्शने होणार आहेत त्यामध्ये-

१) स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलेलेे आहे ते आरक्षण देण्यात यावे.

२) ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे

३) ओबीसींच्या आरक्षणात इतर समाजाचा समावेश करू नये

४) ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करावी.

५) नॉन क्रिमिलियर मध्ये वाढ करावी.

६) ऑल इंडिया मेडिकल कोट्यात ओबीसींच्या कमी केलेल्या जागा वाढवून द्याव्या.

आदीसह इतर प्रमुख मागण्यांच्या संदर्भात निदर्शने तहसील कार्यालयावर करण्यात येणार आहेत तरी परळी तालुक्यातील ओबीसी संघटना बारा बलुतेदार संघटना व पदाधिकारी तसेच ओबीसी समाज बांधव यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन , मा .विलास ताटे ,प्रा.नरहरी काकडे , सूर्यकांत मुंडे ,प्रा.विजय मुंडे , मा.सुदाम लोखंडे , जि. प.सदस्य प्रदीपभैया मुंडे ,मा.गोपीनाथ लोखंडे, मा.छत्रपती कावळे ,मा.नवनाथ क्षीरसागर ,मा.शाम गडेकर ,मा.राहुल कांदे ,मा.किशोर जाधव आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !