MB NEWS-⭕स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू*



------------------------------------------ 

*⭕स्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा? तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू*

------------------------------------------

परळी वैजनाथ, प्रतिनिधी कोरोनाची  पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेमुळे तब्बल 15 महिन्यांपासून शाळांना कुलूपच आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कमी होऊ लागली असून अनेकांकडे ऑनलाईनची  साधनेही उपलब्ध नाहीत. या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन 15 ऑगस्टपासून तीन टप्प्यात  ऑफलाइन शाळा सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केल्याचे विश्‍वसनिय सूत्रांनी सांगितले. 


पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा मार्च 2020 पासून सुरूच झाली नाही. तर सहावी ते आठवीचे वर्ग मागच्या वर्षी काही दिवसांसाठीच सुरू झाले. त्यामुळे शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. शाळांमधील गर्दी पाहून मुले भेदरतील, वर्षभर मुले घरीच असल्याने त्यांच्यातील अभ्यासाची सवय मोडत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेकांना डोळ्याचा त्रास सुरू झाल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.


ऑनलाइन शिक्षणापासून 26 टक्‍क्‍यांहून अधिक मुले वंचितच आहेत. या पार्श्‍वभूमीवर ऑफलाइन शाळा सुरू करण्याची गरज असल्याचे मत शिक्षणसंचालकांनी व्यक्‍त केले. त्याशिवाय शैक्षणिक गुणवत्ता टिकणार तथा वाढणार नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता 15 ऑगस्टनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने सुरू केले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी तर दुसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवी आणि तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांचे वर्ग सुरू होतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

------------------------------------------ 

📣ऑनलाइन शाळा मंगळवार पासून (ता. 15) सुरू झाल्या असून काही महिन्यांत स्थानिक परिस्थिती पाहून ऑफलाइन शाळा सुरू करण्याचे नियोजन शासनस्तरावर आहे. दरम्यान, दहावी व बारावीच्या वर्गातील सर्वच शिक्षकांची शाळांमध्ये उपस्थिती बंधनकारक असून पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना 50 टक्‍क्‍यांच्या प्रमाणात उपस्थिती बंधनकारक असेल.


*- डॉ. दत्तात्रय जगताप, शिक्षण संचालक, पुणे*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !