MB NEWS-महिला महाविद्यालयात प्राध्यापक गुणगौरव सोहळा संपन्न*

 *महिला महाविद्यालयात प्राध्यापक गुणगौरव सोहळा संपन्न*



परळी वैजनाथ दि.१८ (प्रतिनिधी)

              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात प्राध्यापक गुणगौरव सोहळा संपन्न झाला . कोविड 19 प्रसंगाने करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सदुपयोग करून ज्या प्राध्यापकांनी ग्रंथसंपदा निर्माण केली , पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली तसेच ज्या प्राध्यापकांना पीएच.डी. चे मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली अशा सर्व प्राध्यापकांचा गुणगौरव शुक्रवारी (दि.१८) संस्थेच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी ज्यांच्या विचारातून ही संकल्पना अभिव्यक्त झाली असे संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख हे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभले .संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक गिरीश चौधरी व हेमंत कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै . लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. शामरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या स्वागत समारंभानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्राप्त डॉ. एल एस मुंडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. प्राध्यापक गुणगौरव सोहळ्यात प्रा .डॉ. विद्या गुळभिले- डॉ . बा. आं.म.विद्यापीठ व स्वा . रा . तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या दोन विद्यापीठात पीएचडी मार्गदर्शक व "ए बुक ऑफ मल्टीपल चॉईस क्वेशनस् ऑफ इनव्हरटेबेट झुलॉजी" या पुस्तकाची निर्मिती व प्रकाशन. प्रा .डॉ . रागिणी पाध्ये यांचा मूलभूत वास्तुशास्त्र हे पुस्तक लेखन , प्रकाशन व पीएच.डी मार्गदर्शक . प्रा .डॉ . कवडे पीएच.डी. मार्गदर्शक . प्रा . डॉ . यल्लावाड पीएच.डी मार्गदर्शक . प्रा .डॉ .सौ .विद्या देशपांडे - मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स भाग एक आणि दोन अशी दोन पुस्तकांची निर्मिती व प्रकाशन. प्रा . डॉ .विलास देशपांडे - थाया अॅजा हेट्रोसायकिल्स अँड सलेक्टेड ट्रान्झिशन मेटल्स इंटरॅक्शन - पुस्तक निर्मिती व प्रकाशन . प्रा .डॉ .वर्षा मुंडे - प्लांट फिजिओलॉजी - पुस्तक निर्मिती व प्रकाशन . प्रा . डॉ .संगीता कचरे - १ . टॅक्सानोमी ऑफ एन्जीओग्राम २ . फोक मेडिसिन्स ऑफ महाराष्ट्र. ३ जिम्नोस्पर्म अंड युटिलायझेशन प्लान्ट्स् हे तीन पुस्तके निर्मिती व प्रकाशन . प्रा . क्षितिजा देशपांडे - आहारातील औषधे पुस्तक निर्मिती व प्रकाशन . प्रा . डॉ . शिवनारायण वाघमारे व प्रा . डॉ . अरूण चव्हाण यांचा पीएच.डी पदवी प्राप्त . व प्रा .डॉ .. जगतकर यांचा- आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांचे योगदान हा ग्रंथ निर्मितीबद्दल सत्कार करण्यात आला . अशाप्रकारे एकूण दहा पुस्तकांचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ .एल.एस. मुंडे यांनी केले . त्यात त्यांनी - घार हिंडे आकाशी I

 


परि चित्त पिलापाशी . 

 या वचनाने वरिष्ठांचे या महाविद्यालयाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध प्रगट केले . तसेच महाविद्यालयाच्या यशाचा आलेख विस्तृत रूपात मांडला . नंतर संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांचे अध्यक्षीय समारोपपर भाषण हे हृदयाचा ठाव घेणारे होते . त्यात त्यांनी सर्वप्रथम महाविद्यालयाच्या दिवंगत प्राचार्या डॉ .आर. जे . परळीकर आणि प्रा डॉ सुनील खिल्लारे यांच्याविषयी संवेदना प्रकट करून डॉ . परळीकर मॅडमच्या जाण्याने महाविद्यालयाची फार मोठी हानी झाली आहे तरीही महाविद्यालयाला पुन्हा उभारणी घेण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील असे वक्तव्य केले . या कार्याचा प्रारंभ आम्ही गुरुजनांच्या सत्काराने करीत आहोत . ही विद्वत्तेची पूजा आहे . विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाताहत होऊ नये म्हणून स्व . काकांनी लावलेलं महाविद्यालयाचे बीज , त्याला ज्येष्ठ मार्गदर्शक मा . अनिलराव देशमुख यांचे लाभत असलेले मोलाचे मार्गदर्शन आणि आज त्याचा झालेला वटवृक्ष यासाठी श्रम घेतलेल्या महाविद्यालय परिवारातील सर्वांच्या कार्याबद्दल कौतुकाची थाप देऊन सर्वांना भावी कार्यासाठी आपल्या अमोघपूर्ण वाणीने उत्साहित व प्रेरित केले. प्रातिनिधिक सत्काराला उत्तर म्हणून डॉ . विनोद जगतकर यांनी मनोगत मांडून शेवटी मान्यवरांचे आभारही मानले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा . प्रवीण फुटके यांनी केले . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी बंधू भगिनी सामाजिक अंतर इत्यादी कोविड१९ च्या नियमांचे पालन करुन मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !