युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-चि.पार्थ कराडचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश

 चि.पार्थ कराडचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश 



परळी l प्रतिनिधी

नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत पोदार स्कुलचा विध्यार्थी चि. पार्थ बालासाहेब कराड याने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांचा अंगभूत सामाजिक विकास व्हावा यासाठी दरवर्षी ही परीक्षा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येते. या परीक्षेची मुलांच्या मनाने काठिण्य पातळी जास्त असल्याने त्यात यश संपादन करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते.

कराड हॉस्पिटलचे संचालक डॉ.शालिनीताई व डॉ.बालासाहेब कराड यांचा मुलगा चि. पार्थ हा परळीच्या पोदार स्कुलमध्ये शिक्षण घेतो. अभ्यासाबरोबरच त्याला क्रीडा आणि इतरही उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची आवड आहे. नुकतीच त्याने राष्ट्रीय पातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो पहिल्या क्रमांकाच्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. याअगोदर त्याने एम्स दिल्ली मेडिकल इन्ट्रन्स परीक्षेतही यश संपादन केले असून, शालेय स्तरावरील राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतही पदक पटकावले आहे. कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव आणि अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या