युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळीत चोरट्यांना अनलाॅक: विद्यानगरमधिल घरासमोर लावलेली कार गेली चोरीला

 परळीत चोरट्यांना अनलाॅक: विद्यानगरमधिल घरासमोर लावलेली कार गेली चोरीला



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    गेल्या आठवड्याभरापासुन विविध चोरीच्या घटनांची साखळी सुरूच आहे. विविध घटनांनंतर आता सुरक्षित विभाग म्हणून ओळख असलेल्या विद्यानगरमधिल घरासमोर लावलेली कार चोरीला गेली असल्याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

                 याबाबतीत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभय गहिनीनाथ रोडगे रा.विद्यानगर यांची घरासमोर लावलेली वापरती कार चोरीला गेली आहे.आल्टो कार क्र. एम एच 23 ई 1214 ही मारुती कार अज्ञात चोरांनी दि.१४ ते १५ च्या मध्यरात्री चोरुन नेली आहे.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.हे. शिंदे हे करीत आहेत.विविध ठिकाणी अशा चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांना धडकी भरत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे पोलीसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.परळीत गुन्हेगारी करणारांना मोकळे रान मिळाले आहे.कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातूनच जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे त्यामुळे संधी दिसताच डल्ला मारण्यासाठी चोरटे आसुसलेले आहेत. रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड, बाजारात मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकलीही चोरीला गेल्याचे समोर आले आहे. परळी बसस्थानक येथुन कंडक्टर जवळील तिकीटाची मशिनच चोरट्याने चोरुन नेली असल्याचे पुढे आले. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

                 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या