MB NEWS-वैद्यनाथ बॅंकेचे कर्मचारी हभप सदाशिव महाराज फड मरळवाडीकर यांचे निधन

 वैद्यनाथ बॅंकेचे कर्मचारी हभप सदाशिव महाराज फड मरळवाडीकर यांचे निधन




परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

        परळी पंचक्रोशीत सर्व परिचित वैद्यनाथ बॅंकेचे कर्मचारी हभप सदाशिव महाराज फड मरळवाडीकर यांचे निधन झाले आहे. तालुक्यातील वारकरी कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.

        मरळवाडी येथील मुळ रहिवासी असलेले हभप सदाशिव महाराज फड (वय ५० वर्षे) हे वैद्यनाथ अर्बन को.आॅप.बॅंकेत नौकरीला होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन भाऊ,एक बहीण असा परिवार आहे. वैद्यनाथ बॅंकेची नोकरी सांभाळून त्यांचा विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग होता.महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार तथा वारकरी शिक्षण संस्था आळंदी चे माजी अध्यक्ष हभप केशव महाराज उखळीकर यांचे शिष्य म्हणून ते परिचित होते.किर्तन, प्रवचनकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात शोकभावना व्यक्त होत आहेत.त्यांच्या निधनाने फड कुटुंबावर कोसळलेल्या या दु: खात एम बी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

  1. अत्यंत दुखःद घटना...
    आमचे मित्र तथा वारकरी संप्रदायाचे निष्ठावान साधक श्री हभप सदाशिव महाराज फड मरळवाडीकर परळी वै यांच दुःखद निधन... स्वप्नांत हि वाटलं नव्हतं मित्रा भावपूर्ण श्रद्धांजली ची पोस्ट करावीं लागेल.... निशब्द..
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !