पोस्ट्स

MB NEWS-*ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत शुभारंभ*(VIDEO) 🕳️ _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळा_

इमेज
  *ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत शुभारंभ* 🕳️ _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळा_  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ द्वारा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे.आज दि.२७ रोजी सकाळच्या सत्रात धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे.वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत प्राणप्रतिष्ठापुर्व पुजा संपन्न होत आहेत. सकाळ व दुपार अशा दोन सत्रात चार दिवस हा सोहळा होणार आहे.समारोपदिनी दि.३० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.प.पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.          परळी ब्राह्मण सभेद्वारा श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृह हे काम हाती घेण्यात आले होते. मंदिर व सभागृहाचे काम पूर्ण झाले असून या प

MB NEWS-राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम - पंकजाताई मुंडे

इमेज
  राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम - पंकजाताई मुंडे संत भगवानबाबांच्या विचाराला समर्पक कार्य करण्यासाठी सदैव कार्यरत राहु - खा.डाॅ.प्रितमताई मुंडे   🕳️ जयंतीनिमित्त पंकजाताई व प्रितमताईंनी केलं परळीतील निवासस्थानी अभिवादन 🕳️    परळी वैजनाथ, प्रतिनिधी......            राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम असल्याचे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले.तर राष्ट्रसंतश्रेष्ठ भगवानबाबांच्या विचाराला समर्पक कार्य करण्यासाठी सदैव कार्यरत राहु असा विश्वास खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला आहे.            राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी अभिवादन केले. पंकजाताई मुंडे यांनी ट्विटरवर "महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम असलेले राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन !!" अशा शब

MB NEWS- *ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण !*

इमेज
 ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण ! 🕳️   _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळयाचे आयोजन_  🕳️  *प.पु.सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची राहणार प्रमुख उपस्थिती* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ द्वारा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण होणार आहे.या अनुषंगाने परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३० आॅगस्ट या कालावधीत चार दिवसीय सोहळयाचे आयोजन केले आहे.वेदोक्त पद्धतीने विधिवत मुर्ती प्राणप्रतिष्ठा व समारोपदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.प.पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.           परळी ब्राह्मण सभेद्वारा श्री.विठ्ठल-रुक्मि

MB NEWS- *दोन आरोपींकडून सिरसाळा पोलीसांनी केल्या २४ चोरी गेलेल्या मोटारसायकली जप्त*

इमेज
 *दोन आरोपींकडून सिरसाळा पोलीसांनी केल्या २४ चोरी गेलेल्या मोटार सायकली जप्त* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        गेल्या अनेक दिवसांपासून परळी व तालुक्यातील अनेक ठिकाणी अनेक मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद होत होती.या घटनांचा तपास पोलिस करीत असतांना सिरसाळा पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले व तपासादरम्यान दोन आरोपींकडून तब्बल २४ चोरी गेलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या आरोपींकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.        परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीसांत दाखल करण्यात आलेल्या एका मोटारसायकल चोरी प्रकरणी अधिक तपास करताना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सय्यद अमीर सय्यद नोमान वय ३० वर्षे रा.पेठमोहल्ला, परळी वैजनाथ व अशोक रमेश गायकवाड वय २० रा.सिरसाळा या दोघांना चौकशी साठी ताब्यात घेतले.अधिक तपासात या दोन आरोपींकडून तब्बल २४  मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.ही कामगिरी सपोनि पी.बी.एकशिंगे, पोउपनि. एम.जे.विघ्ने,पोकाॅ.मिसाळ,पोना अंकुश मेंढके,जेटेवाड, सय्यद, देशमुख यांनी केली.

MB NEWS-*⭕Maharashtra Lockdown : ... तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं वक्तव्य*

इमेज
 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 ------------------------------------------  *⭕Maharashtra Lockdown : ... तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं वक्तव्य* ------------------------------------------  मुंबई :  राज्यातील ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी 700 मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown update) लावावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.  मुंबईतील खास बाल कोविड काळजी केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की,  आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झालं आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे.  आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही, तरी आपण तयारी सर्व गोष्टींची ठेवत आहोत, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, त्याच अनुषंगाने लहान मुलांना कोविडची लागण झाली तर त्यांना रुग्णलयाचा भयावह वातावरण न वा

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०१ तर जिल्ह्यात ११५पाॅझिटिव्ह_

इमेज
 * आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०१ तर जिल्ह्यात ११५पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०१ आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या ११५ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री ष. ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सुरू

इमेज
  धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध  मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री ष.  ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सुरू परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        तालुक्यातील धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री श्री ष. ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ यांचे विसावे श्रावणमास तपोनुष्ठान रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021पासून सुरू झाले आहे .या तपोनुष्ठान ची सांगता बुधवार दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.            श्रावणमास तपोनुष्ठाना मध्ये रोज इष्टलिंग, महापूजा व तीर्थप्रसाद सकाळी 9 ते 12 दरम्यान तर दुपारी 12 ते 2 दरम्यान महाप्रसाद व दुपारी 4 ते 6च्या दरम्यान जप ,भजन व अध्यात्म चिंतन होत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून श्रावणमास तपोनुष्ठान सुरू आहे . याचा भाविक, भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळ व श्री नंदिकेश्वर विचारमंच सदस्य यांनी केले आहे . या अनुष्ठान सोहळ्यास श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्

MB NEWS-परळीत काॕग्रेसला गतवैभव मिळवून देऊ - सय्यद हानिफ सय्यद करिम

इमेज
  परळीत काॕग्रेसला गतवैभव मिळवून देऊ - सय्यद हानिफ सय्यद करिम परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी शहर काॕग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी नुकतीच सय्यद हानिफ सय्यद करिम उर्फ बाहदुर भाई यांची निवड झाली आहे.बहादुर भाई यांनी शहराध्यक्ष पदाची जवाबदारी स्विकारताच शहर काॕग्रेस कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेतली.बैठक संपन्न होताच पञकार परिषद घेऊन पञकारांशी बहादुर भाई यांनी संवाद साधला.यावेळी काॕग्रेसचे जेष्ठनेते बाबुराव मुंडे,वसंत मुंडे ,प्रकाश देशमुख,अवस्थी,अॕड संजय रोडे अदी नेतेगन उपस्थित होते. पञकारांशी संवाद साधतांना बहादुर भाई यांनी सांगितले कि,राज्यात आघाडी सरकार मध्ये असलो तरी राज्यात पुढे होऊ घातलेल्या निवडणुका काॕग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापुर्वीच जाहिर केल्याने परळी नगर परिषदेच्या निवडणुका कुढल्याही पक्षाची आघाडी न करता स्वबळावर लढवुन परळी नगर परिषदेवर काॕग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचे सांगितले.शहराच्या विविध नागरी प्रश्नावर लवकरच पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.काॕग्रेस पक्षच भाजपाला सत्तेपासुन दुर करु शकतो.पुन्हा एकदा का

MB NEWS-जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा.

इमेज
  जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा परळी वैजनाथ, प्रतिनिधी... फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेला जागतिक छायाचित्र दिन सर्व फोटोग्राफर एकत्र येवून उत्साहात साजरा केला. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. चंदुलाल बियाणी यांच्या शुभहस्ते श्री वैद्यनाथची प्रतिमा व फोटोग्राफरसाठी प्रकाशाचा एकमेव मार्ग असणारा सूर्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच प्रमुख पाहुणे बाजीरावजी भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आला. प्रसंगी चंदुलाल बियाणी यांनी छायाचित्रकारांसाठी छायाचित्र भवन साठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल व संघटितपणे काम करून परळीचे नावलौकिक करावे अशा शुभेच्छा दिल्या. बाजीराव भैया यांनी मी परळीतील विविध छायाचित्रकारांचे कौतुक करून छायाचित्र भवन व आर्ट गॅलरी उभारण्यासाठी आपण सदैव असोसिएशन च्या पाठीशी राहू व सदैव मदत करत राहूत‌. पण काम करणाऱ्या व्यक्तींना इतरांनी सहकार्य करावे कार्य करणाऱ्यांना खोडा घालू नये "जयचंद" होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.व सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छ

"हमारी छोरियां भी छोरो से कम नही" -पंकजा मुंडे

इमेज
  "हमारी छोरियां भी छोरो से कम नही" -पंकजा मुंडे पाथर्डी च्या आयुषी खेडकरची वायु सेनेत वैमानिकपदी निवड;पंकजा मुंडे यांनी केले अभिनंदन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       पाथर्डी च्या आयुषी खेडकरची वायुसेनेत वैमानिकपदी निवड झाली आहे.या निवडीबद्दल पंकजा मुंडे यांनी खास शब्दांत तिचे अभिनंदन केले आहे."हमारी छोरियां भी छोरो से कम नही" असे म्हणत पंकजा यांनी कौतुक केले आहे.        पाथर्डी चे  डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या कु. आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक (FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE) म्हणून निवड झाली आहे. त्या बद्दल तिचे अभिनंदन करुन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आयुषी तुझा आम्हाला अभिमान आहे. असे म्हणत सोशल मीडियामध्ये पोस्ट केली आहे. 🕳️ अशी आहे पंकजा मुंडे यांची फेसबुक व ट्विटरवर पोस्ट.......           "हमारी छोरियां भी छोरो से कम नही" पाथर्डी चे आमचे डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या कु. आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE म्हणून निवड झाली आहे त्या बद्दल ति

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा नि‌रंक तर जिल्ह्यात १४३ पाॅझिटिव्ह_

इमेज
 * आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा नि‌रंक तर जिल्ह्यात १४३ पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०० आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या १४३ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-परळी नप वर उर्दू भाषेतील बोर्ड लावल्यास उपोषणाचा इशारा ; मराठी भाषिकांचे निवेदन*

इमेज
 * परळी नप वर उर्दू भाषेतील बोर्ड लावल्यास उपोषणाचा इशारा ; मराठी भाषिकांचे निवेदन* परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.१८ - परळी नगरपरिषदेवर मराठी भाषेत फलक असून यासोबत उर्दू भाषेतील नाम फलक लावण्याच्या मागणीला आता विरोध होताना दिसत आहे. आज परळी शहरातील मराठी भाषिकांनी याबाबत परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून हा फलक जर नगर पालिकेने लावला तर आमरण उपोषण करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.  निवेदकांनी निवेदनात म्हटले आहे की नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ही कोण्या धर्माशी संबंधित नाही त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषा ही मातृभाषा असून याच भाषेत सरकारी कार्यालयातील फलकावर नाव असणे अपेक्षित आहे. इतर कोणत्याही भाषेत कार्यालयावर फलक यावण्यात येऊ नये .मात्र परळी नगर परिषदे समोर काही दिवसांपूर्वी नगर पालिकेवर उर्दू भाषेत फलक लावण्याबाबद काही जणांकडून सलग ४ दिवस आमरण उपोषण केले होते तर काल हे उपोषण मागणी पूर्ण करू म्हणून सोडण्यात आले होते. या विरोधात आज मराठी भाषिकांनी जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाला विरोध केला आहे.हे निवेदन देण्यासाठी अनेक युवक नगर परिषदेत गेले अस

MB NEWS-खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान सभेचे धनंजय मुंडे यांना निवेदन

इमेज
  खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान सभेचे धनंजय मुंडे यांना निवेदन परळी वै. ता. १६ प्रतिनिधी* २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळउन देण्यासाठी सरकारकडे आग्रह करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिले. पिक विम्याच्या बाबतीत कृषीमंत्री व विमा कंपनीशी चर्चा करणार असल्याचे ना. मुंडे यांनी शिष्टमंडळाला सांगीतले असल्याची माहीती कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.           अखील भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी (ता.१६) परळी येथील चेमरी रेस्ट हाउस येथे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी चे निवेदन दिले. निवेदनात खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारमध्ये आग्रही भुमिका घ्यावी. विमा कंपनीस महसुल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरूण विमा मंजुर करूण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन पिक विमा मिळावा,पिक विमा योजना कंपनी धार्जीनी न रहाता शेतकऱ्यांच्या हिताची रहावी अशी आग्रही मागणी किसान सभेच्या शिसष्टमंडळाने ना. मुंडे यांच्याक

MB NEWS-मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हार तर ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही* *येणारा काळ निवडणूकांचा ; स्वतःसाठी नाही तर विजयासाठी वज्रमुठ करा*

इमेज
 * मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हार तर ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही* *येणारा काळ निवडणूकांचा ; स्वतःसाठी नाही तर विजयासाठी वज्रमुठ करा* *पंकजाताई मुंडेंनी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत दिला कानमंत्र* बीड । दिनांक १६। मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हार तर ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा ठाम निश्चय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केला.राज्यात भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, येणारा  काळ निवडणुकीचा आहे. स्वतःसाठी नाही तर पक्षासाठी वज्रमुठ करा. मेहनत घ्या,संघटन मजबूत करा व निष्ठा ढळू न देता उत्तम काम करा असा कानमंत्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना दिला.  माँ वैष्णो पॅलेस येथे भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठक आणि समर्थ बूथ अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी खा. डाॅ. प्रितमताई मुंडे,  संघटन मंत्री भाऊराव देशमुख, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, आ.नमिता मुंदडा, आर. टी. देशमुख, रमेश

MB NEWS-*शहरातील अंगणवाड्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू- ना.धनंजय मुंडे* *स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टचा वजनकाटे भेट उपक्रम*

इमेज
  *शहरातील अंगणवाड्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू- ना.धनंजय मुंडे*    *स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टचा वजनकाटे भेट उपक्रम* *परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       परळी शहरातील क्षेत्रात अधिकाधिक काम उभे करून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हाच आपला प्रयत्न आहे शहरातील अंगणवाड्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देऊ असे आश्वासन देत स्वर्गीय माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टने अंगणवाड्यांसाठी टाकलेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शहरातील 64 अंगणवाड्यांना वजन काटे भेट देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.        परळी शहराच्या विविध क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शहरातील अंगणवाड्यांसाठी उपयोगी पडणारे वजनकाटे भेट देण्यात आले.या ट्रस्टच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांसाठी उपयुक्त असा उपक

MB NEWS-ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शहरातील अंगणवाड्यांना आज वजनकाटे भेट देण्यात येणार....!* *स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम*

इमेज
 * ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शहरातील अंगणवाड्यांना आज वजनकाटे भेट देण्यात येणार....!* *स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       स्वर्गीय माणिक बाजीराव धर्माधिकारी चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने शहरातील समाजोपयोगी बाबी लक्षात घेऊन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.या ट्रस्टच्या वतीने आता शहरातील अंगणवाड्यांसाठी उपयुक्त असा उपक्रम राबविण्यात येणार असून ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज( दि.१६) सोमवारी शहरातील अंगणवाड्यांना वजन काटे भेट देण्यात येणार आहेत अशी माहिती माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी दिली आहे.   परळी शहराच्या विविध क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने काही दिवसांपूर्वी सुसज्ज स्वर्गरथाचे लोकार्पण केलेले आहे. यापूर्वी मोफत पाणी पुरवठ्यासाठी टॅंकर,समृद्ध शिक्षण अभियान अंतर्गत शाळाना संगणक भेट,तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आदी उपक्रम राबविलेले आहेत.शहरातील अंगणवाड्यां साठी काही गरजा लक्षात घेऊन सा

MB NEWS-मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथला कोणतीही अडचण येऊ देणार नाही - पंकजाताई मुंडे यांनी दिला विश्वास* *वैद्यनाथ कारखाना येथे उत्साहात ध्वजारोहण*

इमेज
 * मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथला कोणतीही अडचण येऊ देणार नाही - पंकजाताई मुंडे यांनी दिला विश्वास*  *वैद्यनाथ कारखाना येथे उत्साहात ध्वजारोहण* परळी ।दिनांक १५ ।   मी आणि ऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत वैद्यनाथ साखर कारखान्याला कोणतीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन याहीवर्षी कारखाना पुर्ण क्षमतेने चालवणार असल्याचा शब्द कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी आज दिला.         भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर शेतकरी, सभासदांसमोर त्या बोलत होत्या. मागील काही काळात नैसर्गिक आणि आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता मात्र आपण अडचणीवर मात करून कारखाना यशस्वीपणे चालवला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याची उभारणी केली आहे. त्यांचा वसा आणि वारसा मी पुढे चालवणार असुन जोपर्यंत मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथ कारखान्याला कोणतीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतील सामुदायिक 'राष्ट्रगान' ठरले टर्निंग पाॅईट* *आगळ्या - वेगळ्या उपक्रमाला परळीकरांचा भरभरून प्रतिसाद ; आजी-माजी सैनिकांचाही केला गौरव*

इमेज
 * पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतील सामुदायिक 'राष्ट्रगान' ठरले टर्निंग पाॅईट*  *आगळ्या - वेगळ्या उपक्रमाला परळीकरांचा भरभरून प्रतिसाद ; आजी-माजी सैनिकांचाही केला गौरव* परळी ।दिनांक १५। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून शहरात पहिल्यांदाच पार पडलेल्या सामुदायिक राष्ट्रगान कार्यक्रमास शालेय विद्यार्थ्यांसह सर्व स्तरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा उपक्रम शहराच्या सांस्कृतिक चळवळीसाठी 'टर्निंग पाॅईट' ठरला.     स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सर्व सामान्य नागरिकांना सहभागी होता यावे आणि प्रत्येकांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यासाठी पंकजाताई मुंडे यांनी शहरात पहिल्यांदाच सामुदायिक राष्ट्रगान कार्यक्रमाची संकल्पना यशस्वीपणे रूजवली. आज सकाळी ८.३० वा. द टर्निंग पाॅईटच्या माध्यमातून वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर हा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. शहरातील व्यापारी, डाॅक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, वकील, शालेय विद्यार्थी, युवक तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन एका सुरात सामुदायिक राष्ट्रगान गायले. चिमुकल्या मुला म

MB NEWS-वंचितांचा लढा लढणे ; ज्यांचा कुणी वाली नाही त्यांची वाणी होणे ही माझी भूमिका : पंकजाताई मुंडे* *लातूर येथे पार पडला ओबीसींचा भव्य महामेळावा*

इमेज
 *ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत लढा सुरूच राहणार* * वंचितांचा लढा लढणे ; ज्यांचा कुणी वाली नाही त्यांची वाणी होणे ही माझी भूमिका : पंकजाताई मुंडे* *लातूर येथे पार पडला ओबीसींचा भव्य महामेळावा* लातूर । दिनांक १४ । स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू राहील,आरक्षण पूर्ववत झाल्यानंतरच राज्यात निवडणुका होतील अशी भूमिका भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मांडली.लातूर येथे पार पडलेल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्याला संबोधित करताना त्या बोलत होत्या.  यावेळी मंचावर माजी मंत्री राम शिंदे,आ.संभाजी पाटील निलंगेकर,आ.नरेंद्र पवार,आ.रमेश कराड,आ.अभिमन्यू पवार,खा.सुधाकर शृंगारे,योगेश टिळेकर,सुधाकर भालेराव,गोविंद केंद्रे, पाशा पटेल,राहुल केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.मेळाव्याच्या सुरुवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तदनंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी ओबीसी समाज बां

MB NEWS-राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात बेलंबा गावचे ग्रामविकास अधिकारी रणवीर यांचा सत्कार*

इमेज
  राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात बेलंबा गावचे ग्रामविकास अधिकारी रणवीर यांचा सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात बेलंबा गावचे ग्रामविकास अधिकारी रणवीर यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला.       बेलंबा येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी रणवीर यांची नुकतीच माजलगाव येथे बदली झाली आहे. त्याअनुषंगाने राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात रणवीर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्काराचे रणवीर कुटुंबिय भारावुन गेले.यावेळी राजेश गित्ते यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी शेतकरी, नागरिकांच्या जागोजागी थांबून जाणून घेतल्या व्यथा!* *पावसाअभावी पिकांचे नुकसान ; विमा मिळत नसल्याचेही मांडले गाऱ्हाणे*

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी शेतकरी, नागरिकांच्या जागोजागी थांबून जाणून घेतल्या व्यथा! पावसाअभावी पिकांचे नुकसान ; विमा मिळत नसल्याचेही मांडले गाऱ्हाणे परळी ।दिनांक १४।   ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी लातूर कडे जाताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी रस्त्यात जागोजागी थांबून परळी मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या, व्यथा जाणून घेतल्या. पावसा अभावी सध्या पिकांचे होत असलेले नुकसान आणि पीक विमा मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचेकडे गाऱ्हाणे मांडले.    पंकजाताई मुंडे हया आज सकाळी परळीहून लातूरकडे जाण्यासाठी निघाल्या असता रस्त्यात ठिकठिकाणी त्यांनी शेतकरी व नागरिकांच्या भेटी घेतल्या. वरवटी येथे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.पावसाअभावी हाताशी आलेले पीक जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी त्यांचेकडे चिंता व्यक्त केली. तसेच पीक विम्याबाबत ही यावेळी शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले.यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. वरवटी नंतर पिंपळा धायगुडा, शेपवाडी, अंबाजोगाई, वाघाळा, राडी, सायगांव, सुगांव, भारज, बर्दापू

MB NEWS-कु.मंजुश्री घोणे च्या संकल्पनेतून७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ कृतीयुक्त संकल्प

इमेज
   कु.मंजुश्री घोणे च्या संकल्पनेतून७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ कृतीयुक्त संकल्प  ---------------------------------------------------------------------                                                             दि. ११/०८/२१ प्रति, भारत वर्षाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी  नमस्कार, मी मंजुश्री सुर्यकांत घोणे महाराष्ट्रातील मराठवाडा येथील डिघोळ ता. सोनपेठ जि. परभणी ची रहिवासी. दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे बी.ए अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. जागतिक आपत्तीच्या कालखंडात आपण केलेले आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य आपल्या देशासाठी नव्हे तर जगासाठी दिशादर्शक ठरले यांचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान वाटतो. आपल्याकडे अगदीच तुटपुंजी व्यवस्था असताना या व्यवस्थेला कर्तव्यदक्ष करत. सर्वसामान्य माणसाच्या मदतीने, नोकरशाही वर्गाच्या माध्यमातून, प्रत्येकाच्या सहकार्यातून आलेल्या संकटाला मात देऊन. संकटाच्या लढाईला यशस्वितेकडे घेऊन जात आहेत. त्याबद्दल आपले मनस्वी आभार.  या वर्षी आपल्या भारत वर्षाचे अमृत महोत्सवी वर्ष. अर्थातच देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष सुरू होणार आहे. याचा प्रत्

MB NEWS-परळीत 585 कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक डिजिटल श्रवण यंत्राचे वितरण

इमेज
  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यात दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वाटपाची यशस्वी चळवळ सुरू - खा. सुप्रिया सुळे कायमस्वरूपी कर्णबधिर असलेल्या दिव्यांग बांधवांच्या कानात आवाज ऐकू येणे याचे समाधान फार मोठे - धनंजय मुंडे परळीत 585 कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक डिजिटल श्रवण यंत्राचे वितरण परळी (दि. 14) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकार, केंद्र सरकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा विविध माध्यमातून विविध सहाय्यक उपकरणे मिळवून देण्याची एक आगळी वेगळी यशस्वी चळवळ सुरू झाली असून, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या या कामाचा अभिमान असल्याचे मत खा. सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, बीड जिल्हा आरोग्य विभाग, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्वरूप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे 585 गरजू दिव्यांग व्यक्तींना सुमारे 25 हजार रुपये किमतीचे डिजिटल श्रवण यंत्र मोफत वाटप करण्यात आले, या कार्यक्रमात ख