MB NEWS-परळीत काॕग्रेसला गतवैभव मिळवून देऊ - सय्यद हानिफ सय्यद करिम

 परळीत काॕग्रेसला गतवैभव मिळवून देऊ - सय्यद हानिफ सय्यद करिम


परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी शहर काॕग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी नुकतीच सय्यद हानिफ सय्यद करिम उर्फ बाहदुर भाई यांची निवड झाली आहे.बहादुर भाई यांनी शहराध्यक्ष पदाची जवाबदारी स्विकारताच शहर काॕग्रेस कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेतली.बैठक संपन्न होताच पञकार परिषद घेऊन पञकारांशी बहादुर भाई यांनी संवाद साधला.यावेळी काॕग्रेसचे जेष्ठनेते बाबुराव मुंडे,वसंत मुंडे ,प्रकाश देशमुख,अवस्थी,अॕड संजय रोडे अदी नेतेगन उपस्थित होते.


पञकारांशी संवाद साधतांना बहादुर भाई यांनी सांगितले कि,राज्यात आघाडी सरकार मध्ये असलो तरी राज्यात पुढे होऊ घातलेल्या निवडणुका काॕग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापुर्वीच जाहिर केल्याने परळी नगर परिषदेच्या निवडणुका कुढल्याही पक्षाची आघाडी न करता स्वबळावर लढवुन परळी नगर परिषदेवर काॕग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचे सांगितले.शहराच्या विविध नागरी प्रश्नावर लवकरच पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.काॕग्रेस पक्षच भाजपाला सत्तेपासुन दुर करु शकतो.पुन्हा एकदा काॕग्रेस परळी शहरात जोमाने जनतेचे कामे करुन गतवैभव आणल्या शिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास व्यक्त केला.


प्रत्येक वार्डात नव्याने शाखा,पदाधिकारी आणी कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.लोकशाहीवादी पक्ष म्हणून काॕग्रेसकड पाहिले जाते.दिन दुबळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणार असल्याचे ही बहादुरभाई यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष बहादुरभाई यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नागरिकांनी काॕग्रेस पक्षात प्रवेश केला.


दरम्यान सकाळी काॕग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांची शहराच्या विविध प्रश्नावर पुढे काय करायचे या विषयावर व्यापक बैठक संपन्न झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार