MB NEWS-धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री ष. ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सुरू

 धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध  मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री ष.  ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सुरू

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       तालुक्यातील धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री श्री ष. ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ यांचे विसावे श्रावणमास तपोनुष्ठान रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021पासून सुरू झाले आहे .या तपोनुष्ठान ची सांगता बुधवार दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.            श्रावणमास तपोनुष्ठाना मध्ये रोज इष्टलिंग, महापूजा व तीर्थप्रसाद सकाळी 9 ते 12 दरम्यान तर दुपारी 12 ते 2 दरम्यान महाप्रसाद व दुपारी 4 ते 6च्या दरम्यान जप ,भजन व अध्यात्म चिंतन होत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून श्रावणमास तपोनुष्ठान सुरू आहे . याचा भाविक, भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळ व श्री नंदिकेश्वर विचारमंच सदस्य यांनी केले आहे . या अनुष्ठान सोहळ्यास श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे ,परळीचे माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे ,श्री गुरुलिंग स्वामी मठ संस्थान चे विश्वस्त शिवकुमार व्यवहारे , वैद्यनाथ बँकेचे संचालक नारायण सातपुते,माणिकअप्पा हालगे , परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंद फड व इतरांनी भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले आहे. 

    अनुष्ठान सोहळ्या च्या यशस्वी ते साठी धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान कमिटी चे आध्यक्ष एडवोकेट गोविंद फड,कोषाध्यक्ष कैलास बाघमारे ,वैजनाथअप्पा दामा, चंद्रशेखर कोळगावे, राधाकिशन रानबावरे ,उद्धव गिराम , उमाशंकर कोळगावे व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार