MB NEWS-राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम - पंकजाताई मुंडे

 राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम - पंकजाताई मुंडे

संत भगवानबाबांच्या विचाराला समर्पक कार्य करण्यासाठी सदैव कार्यरत राहु - खा.डाॅ.प्रितमताई मुंडे 

 🕳️ जयंतीनिमित्त पंकजाताई व प्रितमताईंनी केलं परळीतील निवासस्थानी अभिवादन 🕳️

 

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

           राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम असल्याचे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले.तर राष्ट्रसंतश्रेष्ठ भगवानबाबांच्या विचाराला समर्पक कार्य करण्यासाठी सदैव कार्यरत राहु असा विश्वास खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

           राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी अभिवादन केले. पंकजाताई मुंडे यांनी ट्विटरवर "महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम असलेले राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन !!" अशा शब्दांत अभिवादन केले आहे. तर खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी परळी वैजनाथ येथील यश:श्री निवासस्थानी संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांनी दिलेली शिकवण व मौलिक संदेश केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या विचारांना समर्पक कार्य करत राहु असा विश्वास खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार