MB NEWS-परळी नप वर उर्दू भाषेतील बोर्ड लावल्यास उपोषणाचा इशारा ; मराठी भाषिकांचे निवेदन*

 *परळी नप वर उर्दू भाषेतील बोर्ड लावल्यास उपोषणाचा इशारा ; मराठी भाषिकांचे निवेदन*




परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.१८ - परळी नगरपरिषदेवर मराठी भाषेत फलक असून यासोबत उर्दू भाषेतील नाम फलक लावण्याच्या मागणीला आता विरोध होताना दिसत आहे. आज परळी शहरातील मराठी भाषिकांनी याबाबत परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून हा फलक जर नगर पालिकेने लावला तर आमरण उपोषण करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे. 


निवेदकांनी निवेदनात म्हटले आहे की नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ही कोण्या धर्माशी संबंधित नाही त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषा ही मातृभाषा असून याच भाषेत सरकारी कार्यालयातील फलकावर नाव असणे अपेक्षित आहे. इतर कोणत्याही भाषेत कार्यालयावर फलक यावण्यात येऊ नये .मात्र परळी नगर परिषदे समोर काही दिवसांपूर्वी नगर पालिकेवर उर्दू भाषेत फलक लावण्याबाबद काही जणांकडून सलग ४ दिवस आमरण उपोषण केले होते तर काल हे उपोषण मागणी पूर्ण करू म्हणून सोडण्यात आले होते.


या विरोधात आज मराठी भाषिकांनी जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाला विरोध केला आहे.हे निवेदन देण्यासाठी अनेक युवक नगर परिषदेत गेले असून नगरपालिका अधीक्षक संतोष रोडे यांनी हे निवेदन स्वीकारले आहे.योगेश पांडकर,ऍड.अरुण पाठक, नितीन राजूरकर, रघुवीर राडीकर,वैजनाथ रेकने,महेश देशमुख,शिवाजी फड ,गोविंद सारस्वत,सचिन येवतेकर,दीपक जोशी,राजू जाधव,दिलीप नेहरकर,सुशील येळाये ,प्रविण तोताड़े यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार