MB NEWS- *दोन आरोपींकडून सिरसाळा पोलीसांनी केल्या २४ चोरी गेलेल्या मोटारसायकली जप्त*

 *दोन आरोपींकडून सिरसाळा पोलीसांनी केल्या २४ चोरी गेलेल्या मोटार सायकली जप्त*


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       गेल्या अनेक दिवसांपासून परळी व तालुक्यातील अनेक ठिकाणी अनेक मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद होत होती.या घटनांचा तपास पोलिस करीत असतांना सिरसाळा पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले व तपासादरम्यान दोन आरोपींकडून तब्बल २४ चोरी गेलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या आरोपींकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

       परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीसांत दाखल करण्यात आलेल्या एका मोटारसायकल चोरी प्रकरणी अधिक तपास करताना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सय्यद अमीर सय्यद नोमान वय ३० वर्षे रा.पेठमोहल्ला, परळी वैजनाथ व अशोक रमेश गायकवाड वय २० रा.सिरसाळा या दोघांना चौकशी साठी ताब्यात घेतले.अधिक तपासात या दोन आरोपींकडून तब्बल २४  मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.ही कामगिरी सपोनि पी.बी.एकशिंगे, पोउपनि. एम.जे.विघ्ने,पोकाॅ.मिसाळ,पोना अंकुश मेंढके,जेटेवाड, सय्यद, देशमुख यांनी केली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!