MB NEWS-ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शहरातील अंगणवाड्यांना आज वजनकाटे भेट देण्यात येणार....!* *स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम*

 *ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शहरातील अंगणवाड्यांना आज वजनकाटे भेट देण्यात येणार....!*

*स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      स्वर्गीय माणिक बाजीराव धर्माधिकारी चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने शहरातील समाजोपयोगी बाबी लक्षात घेऊन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.या ट्रस्टच्या वतीने आता शहरातील

अंगणवाड्यांसाठी उपयुक्त असा उपक्रम राबविण्यात येणार असून ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज( दि.१६) सोमवारी शहरातील अंगणवाड्यांना वजन काटे भेट देण्यात येणार आहेत अशी माहिती माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी दिली आहे.


  परळी शहराच्या विविध क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने काही दिवसांपूर्वी सुसज्ज स्वर्गरथाचे लोकार्पण केलेले आहे. यापूर्वी मोफत पाणी पुरवठ्यासाठी टॅंकर,समृद्ध शिक्षण अभियान अंतर्गत शाळाना संगणक भेट,तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आदी उपक्रम राबविलेले आहेत.शहरातील अंगणवाड्यां साठी काही गरजा लक्षात घेऊन सामाजिक सहभागातून उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे लक्षात आले.गेल्या काही दिवसापासून अंगणवाड्यांचे वजन काटे नादुरुस्त अवस्थेत असल्याने अंगणवाड्यांना वजन काट्यांची नितांत गरज असल्याचे लक्षात आल्याने ट्रस्टच्या वतीने शहरातील 64 अंगणवाड्यांना वजन काटे भेट देण्यात येणार आहेत.राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते जगमित्र कार्यालयात सोमवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता स्वर्गीय माणिक बाजीराव धर्माधिकारी चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

🕳️ 

*मेस्मा कायदा रद्द केल्याबद्दल ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार*

           त्याचप्रमाणे राज्यातील नागरिकांना दिलासादायक असा निर्णय शासनाने घेतला आहे. मेस्मा कायदा रद्द केल्याबद्दल ना. धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !