MB NEWS-*⭕Maharashtra Lockdown : ... तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं वक्तव्य*

 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴



------------------------------------------ 

*⭕Maharashtra Lockdown : ... तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं वक्तव्य*

------------------------------------------ 



मुंबई :  राज्यातील ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी 700 मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown update) लावावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.  मुंबईतील खास बाल कोविड काळजी केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. 


उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की,  आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झालं आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे.  आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही, तरी आपण तयारी सर्व गोष्टींची ठेवत आहोत, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, त्याच अनुषंगाने लहान मुलांना कोविडची लागण झाली तर त्यांना रुग्णलयाचा भयावह वातावरण न वाटता चांगल्या वातावरण तयार करण्यासाठी हे सेंटर उभारले आहेत. 


मुख्यमंत्री म्हणाले की, आता सुद्धा मी गर्दी बघितली, ही गर्दी योग्य नाहीये.  आपण सर्व काळजी घेऊन अर्थचक्र सुरू राहावे. म्हणून काही निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे.  मी सर्वांना विनंती करतो, कोणतेही राजकीय स्वार्थ अथवा आपल्या स्वतःचे स्वार्थ यासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असा वर्तन करू नका, असं ते म्हणाले.  सर्व राजकीय पक्षांना , धार्मिक ,सामाजिक संघटनाना मी विनंती करतो आपल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येईल किंवा येतोय असं काही करू नका, असं आवाहन त्यांनी केलं. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार