इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-*ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत शुभारंभ*(VIDEO) 🕳️ _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळा_

 *ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत शुभारंभ*

🕳️ _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळा_ 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

         शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ द्वारा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे.आज दि.२७ रोजी सकाळच्या सत्रात धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे.वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत प्राणप्रतिष्ठापुर्व पुजा संपन्न होत आहेत. सकाळ व दुपार अशा दोन सत्रात चार दिवस हा सोहळा होणार आहे.समारोपदिनी दि.३० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.प.पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

         परळी ब्राह्मण सभेद्वारा श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृह हे काम हाती घेण्यात आले होते. मंदिर व सभागृहाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पाकरिता अनेक ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर महानुभाव व्यक्तींनी आर्थिक सहाय्य केलेले आहे. पवित्र श्रावणमास पर्वातील आज शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट पासुन या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.30 ऑगस्ट सोमवारी गोकुळ अष्टमी दिनी मुख्य सोहळा होणार आहे.२७ ते ३० आॅगस्ट या कालावधीत चार दिवसीय सोहळयात वेदोक्त पद्धतीने मुर्ती प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न होणार आहेत. वेदशास्त्रसंपन्न, ब्रह्मवृंद, पुरोहित समिती संपूर्ण याज्ञिक विधी पार पाडत आहेत. 

          आज दि.२७ सकाळच्या सत्रात प्रसिद्ध शांतीपाठ, प्रधान संकल्प, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, आयुष्य मंत्रजप नांदीश्राद्ध ,मंडप प्रवेश ,आचार्यादी, ऋत्विकवरणम्, दिग्रक्षणम या पूजा विधी संपन्न झाल्या तर दुपारच्या सत्रात कुंडपूजन, वास्तु योगिनी, क्षेत्रपाल- प्रधान मंडल स्थापन, अग्नी स्थापन, ग्रह स्थापन ग्रहहोम, कुटीर होम, मूर्ती जलाधिवास, सायंपुजन व आरती असा दिवस भरातील पुजा विधि संपन्न झाला. सलग चार दिवस हे प्राण प्रतिष्ठेचे विधि चालणार आहेत. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ च्या वतीने करण्यात आले आहे.

-------------------------- VIDEO---------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!