MB NEWS-जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा.

 जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेला जागतिक छायाचित्र दिन सर्व फोटोग्राफर एकत्र येवून उत्साहात साजरा केला.


जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. चंदुलाल बियाणी यांच्या शुभहस्ते श्री वैद्यनाथची प्रतिमा व फोटोग्राफरसाठी प्रकाशाचा एकमेव मार्ग असणारा सूर्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच प्रमुख पाहुणे बाजीरावजी भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आला.

प्रसंगी चंदुलाल बियाणी यांनी छायाचित्रकारांसाठी छायाचित्र भवन साठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल व संघटितपणे काम करून परळीचे नावलौकिक करावे अशा शुभेच्छा दिल्या.

बाजीराव भैया यांनी मी परळीतील विविध छायाचित्रकारांचे कौतुक करून छायाचित्र भवन व आर्ट गॅलरी उभारण्यासाठी आपण सदैव असोसिएशन च्या पाठीशी राहू व सदैव मदत करत राहूत‌. पण काम करणाऱ्या व्यक्तींना इतरांनी सहकार्य करावे कार्य करणाऱ्यांना खोडा घालू नये "जयचंद" होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.व सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या .

याप्रसंगी उपस्थित प्रमुख वक्ते मार्गदर्शक रामकृष्ण सुर्वे नांदेड यांची ही सखोल मार्गदर्शन पर भाषण झाले. मान्यवरांचे सत्कार शाल श्रीफळ व फोटो कॅमेऱ्याच्या प्रतिमा देऊन करण्यात आले यावेळी आवर्जून उपस्थित असणारे नगरसेवक अनिल अष्टेकर यांचाही असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी अजित गौरशेटे, गणेश घोडके सोमनाथ वळसे, राहुल कुरकुट, सुधीर मोदाणी, जयराम गौंडे, हरिप्रसादजी मोदाणी ,व सभासद उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सुत्र संचलन असोसिएशनचे सचिव ,सुनील फुलारी यांनी तर आभार प्रदर्शन असोशियनचे अध्यक्ष यशवंत चव्हाण यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार