MB NEWS-मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथला कोणतीही अडचण येऊ देणार नाही - पंकजाताई मुंडे यांनी दिला विश्वास* *वैद्यनाथ कारखाना येथे उत्साहात ध्वजारोहण*

 *मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथला कोणतीही अडचण येऊ देणार नाही - पंकजाताई मुंडे यांनी दिला विश्वास* 



*वैद्यनाथ कारखाना येथे उत्साहात ध्वजारोहण*


परळी ।दिनांक १५ ।  

मी आणि ऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत वैद्यनाथ साखर कारखान्याला कोणतीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन याहीवर्षी कारखाना पुर्ण क्षमतेने चालवणार असल्याचा शब्द कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी आज दिला. 



       भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर शेतकरी, सभासदांसमोर त्या बोलत होत्या. मागील काही काळात नैसर्गिक आणि आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता मात्र आपण अडचणीवर मात करून कारखाना यशस्वीपणे चालवला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याची उभारणी केली आहे. त्यांचा वसा आणि वारसा मी पुढे चालवणार असुन जोपर्यंत मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथ कारखान्याला कोणतीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस फक्त वैद्यनाथ कारखान्याला गाळपास द्यावा आणि कर्मचारी यांनीही सहकार्य करावे असे आवाहन केले. 

 ••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !