MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतील सामुदायिक 'राष्ट्रगान' ठरले टर्निंग पाॅईट* *आगळ्या - वेगळ्या उपक्रमाला परळीकरांचा भरभरून प्रतिसाद ; आजी-माजी सैनिकांचाही केला गौरव*

 *पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतील सामुदायिक 'राष्ट्रगान' ठरले टर्निंग पाॅईट* 



*आगळ्या - वेगळ्या उपक्रमाला परळीकरांचा भरभरून प्रतिसाद ; आजी-माजी सैनिकांचाही केला गौरव*



परळी ।दिनांक १५।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून शहरात पहिल्यांदाच पार पडलेल्या सामुदायिक राष्ट्रगान कार्यक्रमास शालेय विद्यार्थ्यांसह सर्व स्तरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा उपक्रम शहराच्या सांस्कृतिक चळवळीसाठी 'टर्निंग पाॅईट' ठरला.  




  स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सर्व सामान्य नागरिकांना सहभागी होता यावे आणि प्रत्येकांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यासाठी पंकजाताई मुंडे यांनी शहरात पहिल्यांदाच सामुदायिक राष्ट्रगान कार्यक्रमाची संकल्पना यशस्वीपणे रूजवली. आज सकाळी ८.३० वा. द टर्निंग पाॅईटच्या माध्यमातून वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर हा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. शहरातील व्यापारी, डाॅक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, वकील, शालेय विद्यार्थी, युवक तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन एका सुरात सामुदायिक राष्ट्रगान गायले. चिमुकल्या मुला मुलींनी भारतमाता, ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू, विविध महापुरुषांची साकारलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ही मुलं आपली महान संस्कृती आणि विविधतेतील एकतेचे दर्शन घडवत होते. वैद्यनाथ महाविद्यालयाचे एनसीसी पथकही यावेळी उपस्थित होते. राष्ट्रगीतानंतर तिरंगी रंगाचे फुगे हवेत सोडण्यात आले. 



*अन् पंकजाताईमुळे वाढला उत्साह*

------------------------------'

सामुदायिक राष्ट्रगीतानंतर पंकजाताई मुंडे यांनी आजी- माजी सैनिकांचा सन्मान केला व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच सर्व नागरिकांमध्ये मिसळून त्यांचेशी संवाद साधला. महिला, मुली व विद्यार्थ्यांची त्यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी एकच झुंबड उडाली होती, त्यांच्या या कार्यक्रमातून सर्वांचाच उत्साह वाढल्याचे दिसून आले.

••••

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार