MB NEWS-खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान सभेचे धनंजय मुंडे यांना निवेदन

 खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान सभेचे धनंजय मुंडे यांना निवेदन



परळी वै. ता. १६ प्रतिनिधी*

२०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळउन देण्यासाठी सरकारकडे आग्रह करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिले. पिक विम्याच्या बाबतीत कृषीमंत्री व विमा कंपनीशी चर्चा करणार असल्याचे ना. मुंडे यांनी शिष्टमंडळाला सांगीतले असल्याची माहीती कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

    

     अखील भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी (ता.१६) परळी येथील चेमरी रेस्ट हाउस येथे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी चे निवेदन दिले. निवेदनात खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारमध्ये आग्रही भुमिका घ्यावी. विमा कंपनीस महसुल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरूण विमा मंजुर करूण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन पिक विमा मिळावा,पिक विमा योजना कंपनी धार्जीनी न रहाता शेतकऱ्यांच्या हिताची रहावी अशी आग्रही मागणी किसान सभेच्या शिसष्टमंडळाने ना. मुंडे यांच्याकडे केली. यावेळी ना. मुंडे यांनी विमा कंपनी व राज्याचे कृषी मंत्री यांच्या सोबत बैठक घेउन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करतो असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. मोहन लांब, जिल्हाध्यक्ष कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. दत्ता डाके, कॉ. संदिपान तेलगड, कॉ. सुभाष डाके, कॉ. माउली सुरवसे, कॉ. प्रकाश चव्हाण उपस्थीत होते अशी माहीती एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कॉ. अजय बुरांडे यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार