इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण !*

 ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण !



🕳️   _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळयाचे आयोजन_ 


🕳️  *प.पु.सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची राहणार प्रमुख उपस्थिती*


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

        शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ द्वारा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण होणार आहे.या अनुषंगाने परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३० आॅगस्ट या कालावधीत चार दिवसीय सोहळयाचे आयोजन केले आहे.वेदोक्त पद्धतीने विधिवत मुर्ती प्राणप्रतिष्ठा व समारोपदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.प.पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

          परळी ब्राह्मण सभेद्वारा श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृह हे काम हाती घेण्यात आले होते. मंदिर व सभागृहाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पाकरिता अनेक ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर महानुभाव व्यक्तींनी आर्थिक सहाय्य केलेले आहे. पवित्र श्रावणमास पर्वातील शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट ते सोमवार दिनांक 30 ऑगस्ट पर्यंत मुर्ती प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण असा चार दिवसीय सोहळा होणार आहे.30 ऑगस्ट सोमवारी गोकुळ अष्टमी दिनी मुख्य सोहळा होणार आहे.बहुसोमयाजी प.पु.यज्ञेश्वर दीक्षित सेलुकर महाराज यांच्या शुभहस्ते मूर्तीन्यास व लोकार्पण होणार आहे.या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणुन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,माजी ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे,बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

         या सोहळ्याच्या सुसुत्र आयोजनासाठी ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळीच्या वतीने तयारी करण्यात येत असुन विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. २७ ते ३० आॅगस्ट या कालावधीत चार दिवसीय सोहळयात वेदोक्त पद्धतीने मुर्ती प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न होणार आहेत. यासाठी वेदशास्त्रसंपन्न, ब्रह्मवृंद, पुरोहित समिती संपूर्ण याज्ञिक विधी पार पाडणार आहेत. परळीच्या धार्मिक व ऐतिहासिक परंपरेतील  श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या माध्यमातून जुन्या एका मंदिराचा जीर्णोद्धार होऊन हा अध्यात्मिक ठेवा नव्या रुपात जतन केला जाणार आहे. त्यामुळे सर्वांसाठी हा सोहळा स्वप्नपूर्तीचा आनंद सोहळा ठरणार आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या