MB NEWS-कु.मंजुश्री घोणे च्या संकल्पनेतून७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ कृतीयुक्त संकल्प

   कु.मंजुश्री घोणे च्या संकल्पनेतून७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ कृतीयुक्त संकल्प 

---------------------------------------------------------------------





                                                            दि. ११/०८/२१

प्रति,

भारत वर्षाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी 

नमस्कार, मी मंजुश्री सुर्यकांत घोणे महाराष्ट्रातील मराठवाडा येथील डिघोळ ता. सोनपेठ जि. परभणी ची रहिवासी. दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे बी.ए अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे.

जागतिक आपत्तीच्या कालखंडात आपण केलेले आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य आपल्या देशासाठी नव्हे तर जगासाठी दिशादर्शक ठरले यांचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान वाटतो. आपल्याकडे अगदीच तुटपुंजी व्यवस्था असताना या व्यवस्थेला कर्तव्यदक्ष करत. सर्वसामान्य माणसाच्या मदतीने, नोकरशाही वर्गाच्या माध्यमातून, प्रत्येकाच्या सहकार्यातून आलेल्या संकटाला मात देऊन. संकटाच्या लढाईला यशस्वितेकडे घेऊन जात आहेत. त्याबद्दल आपले मनस्वी आभार. 

या वर्षी आपल्या भारत वर्षाचे अमृत महोत्सवी वर्ष. अर्थातच देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष सुरू होणार आहे. याचा प्रत्येक भारतीयाला, भारतीय नागरिकाला, सर्वसामान्य माणसाला अभिमान आहे. आपल्यासाठी आनंदाचा, गौरवाचा क्षण आहे. आपल्या महान शहीदांनी, पूर्वजांनी केलेल्या अतुलनीय कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याचा हा एक क्षण आहे.

आजपर्यंत आपल्या देशामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय येथे स्वातंत्र्य उत्सव साजरा केला जायचा. परंतु मागील दीड वर्षापासून जगावर आणि भारत देशावर जे महामारीच संकट आलेला आहे. त्यामुळे सामूहिक ठिकाणी आपण हा आनंदोत्सव साजरा करू शकत नसलो तरीही मला असे वाटते की, ही आनंदाची गंगा आपण आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत आणावी. म्हणजे स्वातंत्र्यदिनी आपण आपल्या घरासमोर सडा-रांगोळी करून. आपल्याला ज्या महान वीरांच्या बलिदानाने हे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य उत्सव साजरा करता येत आहे. त्या क्रांतिकारी वीरांच्या प्रतिमेचे पूजन करून. वीरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. ७५ वे स्वातंत्र्य वर्ष असल्यामुळे सकाळी ठीक ७.५० ला आपल्या कुटुंबासमवेत देशाच्या राष्ट्रगीताने या आगळ्यावेगळ्या नयन दीपक सोहळ्याची सांगता करावी. असे मला वाटते. या आनंदाच्या सोहळ्यामध्ये माझ्यासमवेत आपण सर्व भारतवासीयांनी जर सहभाग घेतला तर हा जगातील सर्वात मोठा आणि आगळावेगळा स्वातंत्र्यदिन साजरा झाल्याशिवाय राहणार नाही. 

मा. मोदीजी आपण ज्या पद्धतीने देशाच्या विकासाची घोडदौड सुरू केली आहे. त्याकडे पाहून आम्हा तरुणांना देशाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची एक नवीन ऊर्जा आपल्याकडेच पाहून मिळते. आपला देश हा तरुणांचा देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो या तरुणांची प्रतिनिधी म्हणून या देशाच्या विकासासाठी, उत्कर्षासाठी, हातभार लावण्यासाठी व देशाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही तरुण मित्र-मैत्रिणींनी 'चला नवराष्ट्रनिर्माण यासाठी प्रयत्न करूया.' या आमच्या समूहाच्या माध्यमातून ७५ व्या 

स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ कृतीयुक्त संकल्प हाती घेत आहोत. 

या आमच्या कृतीयुक्त संकल्प कार्यासाठी आपले शुभ आशीर्वाद व आपले मोलाचे मार्गदर्शन लाभावे.

हीच अपेक्षा. 


        आपलीच भारतवासी 

    -कु.मंजुश्री सुर्यकांत घोणे

मु.पो. डिघोळ ता. सोनपेठ जि. परभणी - ४३१५१६



कृतीयुक्त संकल्प यादी

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही तरुणाईने हाती घेतलेल्या ७५ कृतीयुक्त संकल्पापैकी काही संकल्प प्रातिनिधिक स्वरुपात आपल्या समोर मांडत आहोत.

खालीलप्रमाणे...

1. सैनिक माझा व्हॅलेंटाईन 

2. स्वप्न स्वच्छ नगरीचे 

3. वृक्षाशी नाते जोडू या

4. सुवर्ण नीरज घडवूया 

5. तरुणांचा एकच विचार नष्ट करू भ्रष्टाचार

6. खूप झाल्या दुष्काळाच्या झळा आता फुलवू या हिरवळ मळा 

7. आई शिके लेकरू घडे

8. शिकल्या सावित्रीच्या लेकी तर घडतील जिजाऊंच्या वीर लेकी 

9. एकच ध्यास व्यसनमुक्त समाजाची आस 

10. आमचा जीवनदाता शेतकरी राजा आता 

11. तरुण उद्याचा अजिंक्यतारा 

12. विकास हमारी परिभाषा 

13. पर्यावरण वाचवणे कृतीतून दाखवणे 

14. आता बळकट करणार तरूण लोकशाही 

15. बालकांना पैशाचे दान नाही तर पुस्तके देऊन जगण्याचे भान देवू 

16. सन्मान करू त्या योद्ध्यांचा ज्यांच्या हाती आरोग्याची, रक्षणांची गाथा  

17. जपूया वारसा संस्कृती प्रतीकांचा 

18. तरुणांचे कार्य ग्रामीण विकासाला सहकार्य

19. मी सिग्नल पाळेल अपघात टाळेल 

20. पाणी जपून वापरू पुढच्या पिढीला साठा ठेवू

21. संवर्धन निसर्गाचे

22. राष्ट्र विकासात तरुणांचा सहभाग 

23. जागृतता आरोग्याची 

24. संवाद ग्रामस्थांशी

25. भारतीय संस्कृती हम अक्षुण रखेंगे

इत्यादी संकल्पना प्रतिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर मांडले आहेत.

धन्यवाद !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार