पोस्ट्स

MB NEWS- *स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ किर्तन महोत्सवाचे परळीत गटनेते अजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन !*

इमेज
 *स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ किर्तन महोत्सवाचे परळीत गटनेते अजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन !* अध्यात्ममाने मनशुद्धी होते,सामाजिक सलोखा जपण्यास कीर्तन व कीर्तनकार समाजासाठी मार्गदर्शक - अजय मुंडे _नामवंत किर्तनकारांची परळीत मांदियाळी_ परळी......ता. २ - शेमारो मराठी बाणा व नाथ प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित स्व. पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ परळी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री. बाळासाहेब देशमुख, जेष्ठ नेते श्री. माऊली गडदे, नगरसेवक गोपाळराव आंधळे, प्रा. अतुल दुबे, संयोजक ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, गोविंद महाराज मुंडे, सूर्यकांत मुंडे उपस्थित होते.अध्यात्ममाने मनशुद्धी होते व सर्व धर्म सम भाव आणि सामाजिक सलोखा जपण्यास कीर्तन व कीर्तनकार समाजासाठी मार्गदर्शकच आहेत असे यावेळी श्री. मुंडे म्हणाले.परळी व पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

MB NEWS-सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा;स्थगितीची मुदत संपली

इमेज
  सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; स्थगितीची मुदत संपली पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत दिलेली स्थगितीची मुदत संपली आहे. राज्य सरकारने या निवडणुकांना पुन्हा स्थगिती देण्याबाबत अद्याप कोणताही आदेश दिला नसल्याने २५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसह, सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कर्मचारी पतसंस्था अशा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू के ली जाईल. राज्यातील विविध ६७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्य सरकारने यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुका  सहा वेळा पुढे ढकलल्या होत्या. एप्रिल महिन्यात काढलेल्या आदेशानुसार या संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. राज्यात सध्या १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अन्य कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत उपमु

MB NEWS-नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही-ना. धनजंय मुंडे*

इमेज
 * बीड जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून पालकमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधांवर* *नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही-ना. धनजंय मुंडे*  *आष्टी तालुक्यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीस प्रारंभ, पीकविमा कंपनी सह संयुक्त पंचनाम्यांचे निर्देश*     बीड, ( जिमाका) दि. २:- बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असुन आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे आज सकाळपासून बीड जिल्ह्यात पाहणी दौरा करत आहेत. आष्टी तालुक्यातील मराठवाडी या जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून दौऱ्याला सुरुवात झाली असून, नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास ना. मुंडेंनी मराठवाडी गावकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.  आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावाचा पाहणी करताना शेतातून पिके वाहुन गेलेल्या बाजरी, सोयाबीन आदी पिक

MB NEWS-परळी तालुक्यातील कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला*(VIDEO

इमेज
  परळी तालुक्यातील कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के  भरला जलसाठे भरत असल्याने  समाधानाचे वातावरण परळी वैजनाथ | प्रतिनिधी. .........         परळी तालुक्यातील  कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प  १०० टक्के  भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात यापुर्वीच १०० पाण्याचा साठा झालेला आहे व सध्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे.                   परळी तालुक्यात चांगला  पाऊस सुरू  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे.     बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित ....                  *        दरम्यान परळी पासून जवळच असलेल्या कासारवाडी येथील बोरणा तलावात 100 टक्के  प

MB NEWS-नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही-कृषी मंत्री दादा भुसे* _किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन_

इमेज
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही-कृषी मंत्री दादा भुसे  _किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन_ *परळी वै.दि.१ प्रतिनिधी*      नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही. किसान सभेच्या शिष्टमंडळाला राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आश्वासन दिले असल्याची माहीती किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.      २०२० चा खरीप पिक विमा मिळावा यासाठी मुंबई येथे मंत्रालयात कृषीमंत्री दादा भुसे यांची अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळानी बुधवारी (ता.१) सकाळी दहा वाजता भेट घेतली. सरकारच्या वतीने कृषी मंत्री भुसे यांच्यासह, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विमा कंपनीचे अधिकारी व किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. अजित नवले, कॉ. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. ३० ऑगस्ट रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालयावर किसान सभेनी मोर्चा काढुन दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याअनुषांगाने ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषीमंत्र्यांनी किसान सभेच्या

MB NEWS- *बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर

इमेज
बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर 🕳️  _परळी प्रखंड कार्यकारीणी जाहीर;दहा जणांना नियुक्त्या_  🕳️ परळी वैजनाथ, प्रतिनिधी........            विश्व हिंदू परिषदे अंतर्गत परळी प्रखंडाच्या कार्यकारीणी ची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.          श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या शुभ मुहूर्तावर (दि.   ३०।०८।२०२१-२२ सोमवार) रोजी विश्व हिंदू परिषद चा ५७ वा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी परळी-वैद्यनाथ प्रखंड समिती कार्यकारिणीतील  नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा अध्यक्ष डॉक्टर श्री मुरलीजी जयस्वानी, श्री. प्रा. कवी, जिल्हा उपाध्यक्ष बीड श्री. संभाजी भणगे या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत  परळी प्रखंड कार्यकारिणीच्या दहा पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे. नितीन बालासाहेब राजूरकर (बजरंगदल शहर संयोजक), श्री मिरकिले साहेब (प्रखंड धर्मचार्य प्रमुख),श्री वैभव धोंड  (परळी शहर मंत्री), श्री रविंद्र  दुर्गादास वेताळ(

MB NEWS- बीड:जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे दुःखद निधन*

इमेज
  जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे दुःखद निधन बीड : दि 1 प्रतिनिधी बीड येथील प्रसिद्ध कापड व्यापारी तथा भावसार समाजाचे सर्वपरिचित व्यक्तिमत्व असलेले जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे बुधवार दि 1 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भावसार समाजाचे सर्वपरिचित असे व्यक्तिमत्त्व तथा शहरातील मे.नारायणराव पतंगे क्लाथ सेंटर चे मालक श्री.जगन्नाथ पतंगे यांचे सकाळी 7 वाजता त्यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.मृत्यू समयी त्यांचे वय 62 होते.त्यांच्या पश्चात पत्नी,1 मुलगा,2 विवाहित मुली,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  बीड शहरातील जुन्या पिढीतील मनमिळवू,शांत व्यक्तीमत्व म्हणून व्यापारीवर्गात व भावसार समाजात त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

MB NEWS- *ग्रामीण पोलीसांची दारुबंदी मोहीम;सपोनि एम.एस.मुंडे यांच्या धाडी टाकून दारु अड्ड्यांवर बेधडक कारवाया*

इमेज
 ग्रामीण पोलीसांची दारुबंदी मोहीम;सपोनि एम.एस.मुंडे यांच्या धाडी टाकून दारु अड्ड्यांवर बेधडक कारवाया परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......           ग्रामीण पोलीसांची दारुबंदी मोहीम जोरदार सुरू झाली आहे.सपोनि एम.एस. मुंडे यांच्या धाडी टाकून दारु अड्ड्यांवर बेधडक कारवाया करण्यात आल्या आहेत. आज दि.१ रोजी तालुक्यातील धारावती तंडा येथे धाडी टाकून 59800 रुपये चा मुद्देमाल जप्त करुन रसायने व द्रव्ये नाहीसे केले.या धडक कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.             आज दि.१ रोजी सकाळी 09:00 ते 11:00 वा. दरम्यान धारावती तंडा येथे सपोनि एम एस मुंडे, फौजदार तोटेवाड व ग्रामीण पो स्टे चे इतर 15 अंमलदार यांनी मिळून दारुबंदी मोहीमचे अनुषंगाने अख्खा गाव पिंजून काढून धाडी टाकल्या.यामध्ये एकूण 5 आरोपी नामे शेषबाई भगवान पवार,धुराबाई बाबुराव राठोड,अनिता बळीराम जाधव,वामन राम पवार,शामराव प्रभू पवार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. या धाडीमध्ये 59800 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच गुळ मिश्रित फसफसते रसायन,गावठी हातभट्टी ची तयार दारू, लोखंडी टंकी, प्लास्टिकचे हंडे व इतर साहित्य मिळून आले.योग्य सॅम्पल घेऊन इतर

MB NEWS-सरस्वती गित्ते यांचे बी.एस. एल.एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश

इमेज
  सरस्वती गित्ते यांचे बी.एस. एल.एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...             येथील प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट लक्ष्मण गित्ते यांची मुलगी सरस्वती गित्ते हिने एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश संपादन केले आहे. गित्ते परिवारात वडीलांनंतर आता दुसरी वकील होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.      सरस्वती लक्ष्मण गित्ते यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत यश संपादन केले. दयानंद काॅलेज लातुर येथे त्यांनी लाॅ चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी बेलंबा येथे,जगमित्र विद्यालयात १०वी तर १२ वी पर्यंत चे शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालय परळी येथे झाले आहे. आपल्या वडिलांचा आदर्श समोर ठेवून सरस्वती यांनी अतिशय मेहनत घेत वकीलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिलकुमार गित्ते यांच्या त्या भगिनी आहेत. त्यांनी संपादन केलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS-वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांच्या निवडीबद्दल मित्र परिवाराकडून सत्कार संपन्न

इमेज
  वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांच्या निवडीबद्दल मित्र परिवाराकडून सत्कार संपन्न परळी वैजनाथ - ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान अंतर्गत वेद पाठशाळा,वारकरी शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल परळी चे भूमिपुत्र वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांचा सत्कार करण्यात आला.मित्र परिवाराच्या वतीने या छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रज्ञाचक्षु प.पु. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान अंतर्गत वेद पाठशाळा व वारकरी शिक्षण संस्था पाथर्डी जि.अहमदनगर या संस्थेवर संचालक म्हणून वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल चिक्षे यांचा पुष्पगुच्छ देऊन राजेंद्र दगडगुंडे,मनोज रामदासी,मुरलीधर धर्माधिकारी, स्वानंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.चिक्षे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०२ तर जिल्ह्यात ९५पाॅझिटिव्ह_

इमेज
 * आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०२ तर जिल्ह्यात ९५पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०२ आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या ९५ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-*ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत शुभारंभ*(VIDEO) 🕳️ _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळा_

इमेज
  *ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत शुभारंभ* 🕳️ _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळा_  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ द्वारा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे.आज दि.२७ रोजी सकाळच्या सत्रात धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे.वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत प्राणप्रतिष्ठापुर्व पुजा संपन्न होत आहेत. सकाळ व दुपार अशा दोन सत्रात चार दिवस हा सोहळा होणार आहे.समारोपदिनी दि.३० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.प.पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.          परळी ब्राह्मण सभेद्वारा श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृह हे काम हाती घेण्यात आले होते. मंदिर व सभागृहाचे काम पूर्ण झाले असून या प

MB NEWS-राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम - पंकजाताई मुंडे

इमेज
  राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम - पंकजाताई मुंडे संत भगवानबाबांच्या विचाराला समर्पक कार्य करण्यासाठी सदैव कार्यरत राहु - खा.डाॅ.प्रितमताई मुंडे   🕳️ जयंतीनिमित्त पंकजाताई व प्रितमताईंनी केलं परळीतील निवासस्थानी अभिवादन 🕳️    परळी वैजनाथ, प्रतिनिधी......            राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम असल्याचे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले.तर राष्ट्रसंतश्रेष्ठ भगवानबाबांच्या विचाराला समर्पक कार्य करण्यासाठी सदैव कार्यरत राहु असा विश्वास खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला आहे.            राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी अभिवादन केले. पंकजाताई मुंडे यांनी ट्विटरवर "महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम असलेले राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन !!" अशा शब

MB NEWS- *ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण !*

इमेज
 ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण ! 🕳️   _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळयाचे आयोजन_  🕳️  *प.पु.सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची राहणार प्रमुख उपस्थिती* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ द्वारा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण होणार आहे.या अनुषंगाने परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३० आॅगस्ट या कालावधीत चार दिवसीय सोहळयाचे आयोजन केले आहे.वेदोक्त पद्धतीने विधिवत मुर्ती प्राणप्रतिष्ठा व समारोपदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.प.पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.           परळी ब्राह्मण सभेद्वारा श्री.विठ्ठल-रुक्मि

MB NEWS- *दोन आरोपींकडून सिरसाळा पोलीसांनी केल्या २४ चोरी गेलेल्या मोटारसायकली जप्त*

इमेज
 *दोन आरोपींकडून सिरसाळा पोलीसांनी केल्या २४ चोरी गेलेल्या मोटार सायकली जप्त* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        गेल्या अनेक दिवसांपासून परळी व तालुक्यातील अनेक ठिकाणी अनेक मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद होत होती.या घटनांचा तपास पोलिस करीत असतांना सिरसाळा पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले व तपासादरम्यान दोन आरोपींकडून तब्बल २४ चोरी गेलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या आरोपींकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.        परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीसांत दाखल करण्यात आलेल्या एका मोटारसायकल चोरी प्रकरणी अधिक तपास करताना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सय्यद अमीर सय्यद नोमान वय ३० वर्षे रा.पेठमोहल्ला, परळी वैजनाथ व अशोक रमेश गायकवाड वय २० रा.सिरसाळा या दोघांना चौकशी साठी ताब्यात घेतले.अधिक तपासात या दोन आरोपींकडून तब्बल २४  मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.ही कामगिरी सपोनि पी.बी.एकशिंगे, पोउपनि. एम.जे.विघ्ने,पोकाॅ.मिसाळ,पोना अंकुश मेंढके,जेटेवाड, सय्यद, देशमुख यांनी केली.

MB NEWS-*⭕Maharashtra Lockdown : ... तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं वक्तव्य*

इमेज
 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 ------------------------------------------  *⭕Maharashtra Lockdown : ... तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं वक्तव्य* ------------------------------------------  मुंबई :  राज्यातील ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी 700 मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown update) लावावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.  मुंबईतील खास बाल कोविड काळजी केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की,  आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झालं आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे.  आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही, तरी आपण तयारी सर्व गोष्टींची ठेवत आहोत, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, त्याच अनुषंगाने लहान मुलांना कोविडची लागण झाली तर त्यांना रुग्णलयाचा भयावह वातावरण न वा

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०१ तर जिल्ह्यात ११५पाॅझिटिव्ह_

इमेज
 * आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०१ तर जिल्ह्यात ११५पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०१ आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या ११५ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री ष. ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सुरू

इमेज
  धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध  मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री ष.  ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सुरू परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        तालुक्यातील धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री श्री ष. ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ यांचे विसावे श्रावणमास तपोनुष्ठान रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021पासून सुरू झाले आहे .या तपोनुष्ठान ची सांगता बुधवार दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.            श्रावणमास तपोनुष्ठाना मध्ये रोज इष्टलिंग, महापूजा व तीर्थप्रसाद सकाळी 9 ते 12 दरम्यान तर दुपारी 12 ते 2 दरम्यान महाप्रसाद व दुपारी 4 ते 6च्या दरम्यान जप ,भजन व अध्यात्म चिंतन होत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून श्रावणमास तपोनुष्ठान सुरू आहे . याचा भाविक, भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळ व श्री नंदिकेश्वर विचारमंच सदस्य यांनी केले आहे . या अनुष्ठान सोहळ्यास श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्

MB NEWS-परळीत काॕग्रेसला गतवैभव मिळवून देऊ - सय्यद हानिफ सय्यद करिम

इमेज
  परळीत काॕग्रेसला गतवैभव मिळवून देऊ - सय्यद हानिफ सय्यद करिम परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी शहर काॕग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी नुकतीच सय्यद हानिफ सय्यद करिम उर्फ बाहदुर भाई यांची निवड झाली आहे.बहादुर भाई यांनी शहराध्यक्ष पदाची जवाबदारी स्विकारताच शहर काॕग्रेस कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेतली.बैठक संपन्न होताच पञकार परिषद घेऊन पञकारांशी बहादुर भाई यांनी संवाद साधला.यावेळी काॕग्रेसचे जेष्ठनेते बाबुराव मुंडे,वसंत मुंडे ,प्रकाश देशमुख,अवस्थी,अॕड संजय रोडे अदी नेतेगन उपस्थित होते. पञकारांशी संवाद साधतांना बहादुर भाई यांनी सांगितले कि,राज्यात आघाडी सरकार मध्ये असलो तरी राज्यात पुढे होऊ घातलेल्या निवडणुका काॕग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापुर्वीच जाहिर केल्याने परळी नगर परिषदेच्या निवडणुका कुढल्याही पक्षाची आघाडी न करता स्वबळावर लढवुन परळी नगर परिषदेवर काॕग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचे सांगितले.शहराच्या विविध नागरी प्रश्नावर लवकरच पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.काॕग्रेस पक्षच भाजपाला सत्तेपासुन दुर करु शकतो.पुन्हा एकदा का

MB NEWS-जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा.

इमेज
  जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा परळी वैजनाथ, प्रतिनिधी... फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेला जागतिक छायाचित्र दिन सर्व फोटोग्राफर एकत्र येवून उत्साहात साजरा केला. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. चंदुलाल बियाणी यांच्या शुभहस्ते श्री वैद्यनाथची प्रतिमा व फोटोग्राफरसाठी प्रकाशाचा एकमेव मार्ग असणारा सूर्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच प्रमुख पाहुणे बाजीरावजी भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आला. प्रसंगी चंदुलाल बियाणी यांनी छायाचित्रकारांसाठी छायाचित्र भवन साठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल व संघटितपणे काम करून परळीचे नावलौकिक करावे अशा शुभेच्छा दिल्या. बाजीराव भैया यांनी मी परळीतील विविध छायाचित्रकारांचे कौतुक करून छायाचित्र भवन व आर्ट गॅलरी उभारण्यासाठी आपण सदैव असोसिएशन च्या पाठीशी राहू व सदैव मदत करत राहूत‌. पण काम करणाऱ्या व्यक्तींना इतरांनी सहकार्य करावे कार्य करणाऱ्यांना खोडा घालू नये "जयचंद" होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.व सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छ

"हमारी छोरियां भी छोरो से कम नही" -पंकजा मुंडे

इमेज
  "हमारी छोरियां भी छोरो से कम नही" -पंकजा मुंडे पाथर्डी च्या आयुषी खेडकरची वायु सेनेत वैमानिकपदी निवड;पंकजा मुंडे यांनी केले अभिनंदन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       पाथर्डी च्या आयुषी खेडकरची वायुसेनेत वैमानिकपदी निवड झाली आहे.या निवडीबद्दल पंकजा मुंडे यांनी खास शब्दांत तिचे अभिनंदन केले आहे."हमारी छोरियां भी छोरो से कम नही" असे म्हणत पंकजा यांनी कौतुक केले आहे.        पाथर्डी चे  डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या कु. आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक (FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE) म्हणून निवड झाली आहे. त्या बद्दल तिचे अभिनंदन करुन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आयुषी तुझा आम्हाला अभिमान आहे. असे म्हणत सोशल मीडियामध्ये पोस्ट केली आहे. 🕳️ अशी आहे पंकजा मुंडे यांची फेसबुक व ट्विटरवर पोस्ट.......           "हमारी छोरियां भी छोरो से कम नही" पाथर्डी चे आमचे डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या कु. आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE म्हणून निवड झाली आहे त्या बद्दल ति

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा नि‌रंक तर जिल्ह्यात १४३ पाॅझिटिव्ह_

इमेज
 * आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा नि‌रंक तर जिल्ह्यात १४३ पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०० आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या १४३ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-परळी नप वर उर्दू भाषेतील बोर्ड लावल्यास उपोषणाचा इशारा ; मराठी भाषिकांचे निवेदन*

इमेज
 * परळी नप वर उर्दू भाषेतील बोर्ड लावल्यास उपोषणाचा इशारा ; मराठी भाषिकांचे निवेदन* परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.१८ - परळी नगरपरिषदेवर मराठी भाषेत फलक असून यासोबत उर्दू भाषेतील नाम फलक लावण्याच्या मागणीला आता विरोध होताना दिसत आहे. आज परळी शहरातील मराठी भाषिकांनी याबाबत परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून हा फलक जर नगर पालिकेने लावला तर आमरण उपोषण करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.  निवेदकांनी निवेदनात म्हटले आहे की नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ही कोण्या धर्माशी संबंधित नाही त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषा ही मातृभाषा असून याच भाषेत सरकारी कार्यालयातील फलकावर नाव असणे अपेक्षित आहे. इतर कोणत्याही भाषेत कार्यालयावर फलक यावण्यात येऊ नये .मात्र परळी नगर परिषदे समोर काही दिवसांपूर्वी नगर पालिकेवर उर्दू भाषेत फलक लावण्याबाबद काही जणांकडून सलग ४ दिवस आमरण उपोषण केले होते तर काल हे उपोषण मागणी पूर्ण करू म्हणून सोडण्यात आले होते. या विरोधात आज मराठी भाषिकांनी जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाला विरोध केला आहे.हे निवेदन देण्यासाठी अनेक युवक नगर परिषदेत गेले अस

MB NEWS-खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान सभेचे धनंजय मुंडे यांना निवेदन

इमेज
  खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान सभेचे धनंजय मुंडे यांना निवेदन परळी वै. ता. १६ प्रतिनिधी* २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळउन देण्यासाठी सरकारकडे आग्रह करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिले. पिक विम्याच्या बाबतीत कृषीमंत्री व विमा कंपनीशी चर्चा करणार असल्याचे ना. मुंडे यांनी शिष्टमंडळाला सांगीतले असल्याची माहीती कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.           अखील भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी (ता.१६) परळी येथील चेमरी रेस्ट हाउस येथे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी चे निवेदन दिले. निवेदनात खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारमध्ये आग्रही भुमिका घ्यावी. विमा कंपनीस महसुल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरूण विमा मंजुर करूण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन पिक विमा मिळावा,पिक विमा योजना कंपनी धार्जीनी न रहाता शेतकऱ्यांच्या हिताची रहावी अशी आग्रही मागणी किसान सभेच्या शिसष्टमंडळाने ना. मुंडे यांच्याक

MB NEWS-मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हार तर ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही* *येणारा काळ निवडणूकांचा ; स्वतःसाठी नाही तर विजयासाठी वज्रमुठ करा*

इमेज
 * मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हार तर ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही* *येणारा काळ निवडणूकांचा ; स्वतःसाठी नाही तर विजयासाठी वज्रमुठ करा* *पंकजाताई मुंडेंनी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत दिला कानमंत्र* बीड । दिनांक १६। मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हार तर ओबीसींचे आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा ठाम निश्चय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केला.राज्यात भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, येणारा  काळ निवडणुकीचा आहे. स्वतःसाठी नाही तर पक्षासाठी वज्रमुठ करा. मेहनत घ्या,संघटन मजबूत करा व निष्ठा ढळू न देता उत्तम काम करा असा कानमंत्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना दिला.  माँ वैष्णो पॅलेस येथे भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठक आणि समर्थ बूथ अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी खा. डाॅ. प्रितमताई मुंडे,  संघटन मंत्री भाऊराव देशमुख, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, आ.नमिता मुंदडा, आर. टी. देशमुख, रमेश