MB NEWS-वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांच्या निवडीबद्दल मित्र परिवाराकडून सत्कार संपन्न

 वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांच्या निवडीबद्दल मित्र परिवाराकडून सत्कार संपन्न



परळी वैजनाथ - ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान अंतर्गत वेद पाठशाळा,वारकरी शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल परळी चे भूमिपुत्र वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांचा सत्कार करण्यात आला.मित्र परिवाराच्या वतीने या छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रज्ञाचक्षु प.पु. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान अंतर्गत वेद पाठशाळा व वारकरी शिक्षण संस्था पाथर्डी जि.अहमदनगर या संस्थेवर संचालक म्हणून वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल चिक्षे यांचा पुष्पगुच्छ देऊन राजेंद्र दगडगुंडे,मनोज रामदासी,मुरलीधर धर्माधिकारी, स्वानंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.चिक्षे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !