MB NEWS-नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही-कृषी मंत्री दादा भुसे* _किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन_


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही-कृषी मंत्री दादा भुसे



 _किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन_

*परळी वै.दि.१ प्रतिनिधी*

     नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही. किसान सभेच्या शिष्टमंडळाला राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आश्वासन दिले असल्याची माहीती किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.

     २०२० चा खरीप पिक विमा मिळावा यासाठी मुंबई येथे मंत्रालयात कृषीमंत्री दादा भुसे यांची अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळानी बुधवारी (ता.१) सकाळी दहा वाजता भेट घेतली. सरकारच्या वतीने कृषी मंत्री भुसे यांच्यासह, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विमा कंपनीचे अधिकारी व किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. अजित नवले, कॉ. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. ३० ऑगस्ट रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालयावर किसान सभेनी मोर्चा काढुन दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याअनुषांगाने ही बैठक घेण्यात आली.


या बैठकीत कृषीमंत्र्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त करतांना विमा कंपन्यांना निर्देश दिले की एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे सरसकट शेतकऱ्यांना पिकविमा परतावा रक्कम नियमाप्रमाणे वाटप करा. आणि जोपर्यंत विमा कंपन्या शेतकऱ्यांना ही रक्कम वाटप करणार नाही तोपर्यंत राज्य शासन स्वतःच्या हिश्शाची दुसऱ्या टप्प्यातील प्रिमियमची रक्कम विमा कंपन्यांना देणार नाही. अशी भूमिका राज्य सरकारने घेतली असल्याची ग्वाही कृषिमंत्र्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला दिली.  


शेतकऱ्यांनी त्यांच्या अपरिहार्य कारणांमुळे नुकसानीची माहिती दिलेल्या मुदतीत कळवली नाही हा त्यांचा दोष नाही. समजा जर तो नियम भंग असेल तर विमा कंपनीन्यांनी देखिल कराराप्रमाणे सर्व जिल्ह्यामध्ये ऑफिस व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत, कंपनीचा पुरेसा कर्मचारी तिथे कार्यरत नाही हा देखील नियम भंगच आहे. ही किसान सभेचे आणि शेतकऱ्यांची भुमिका कृषी मंत्र्यांनी उचलून धरली. शेतकऱ्यांकडे चुकीचे बोट दाखवण्याचा कोणताही अधिकार कंपनीस उरत नाही अशी कृषी मंत्री महोदयांनी कंपन्यांची कानउघाडणी केली.


   *विमा कम्पन्या शेतकऱ्यांना यथायोग्य विमा परतावा देतील अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. असे असले तरी हे आंदोलन अजून संपलेले नाही. जो पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर विमा रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत किसान सभा स्वस्थ बसणार नाही हे आंदोलन केवळ 2020 चा पिक विमा मिळवण्या पुरतेच मार्यदित नसून पीक विमा कायम शेतकऱ्यांना आधार देणारा, शेतकरी धार्जिना असावा यासाठी आहे असे किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार