MB NEWS-सरस्वती गित्ते यांचे बी.एस. एल.एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश

 सरस्वती गित्ते यांचे बी.एस. एल.एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    

        येथील प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट लक्ष्मण गित्ते यांची मुलगी सरस्वती गित्ते हिने एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश संपादन केले आहे. गित्ते परिवारात वडीलांनंतर आता दुसरी वकील होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

     सरस्वती लक्ष्मण गित्ते यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत यश संपादन केले. दयानंद काॅलेज लातुर येथे त्यांनी लाॅ चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी बेलंबा येथे,जगमित्र विद्यालयात १०वी तर १२ वी पर्यंत चे शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालय परळी येथे झाले आहे. आपल्या वडिलांचा आदर्श समोर ठेवून सरस्वती यांनी अतिशय मेहनत घेत वकीलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिलकुमार गित्ते यांच्या त्या भगिनी आहेत. त्यांनी संपादन केलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !