दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS- *ग्रामीण पोलीसांची दारुबंदी मोहीम;सपोनि एम.एस.मुंडे यांच्या धाडी टाकून दारु अड्ड्यांवर बेधडक कारवाया*

 ग्रामीण पोलीसांची दारुबंदी मोहीम;सपोनि एम.एस.मुंडे यांच्या धाडी टाकून दारु अड्ड्यांवर बेधडक कारवाया

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......

          ग्रामीण पोलीसांची दारुबंदी मोहीम जोरदार सुरू झाली आहे.सपोनि एम.एस. मुंडे यांच्या धाडी टाकून दारु अड्ड्यांवर बेधडक कारवाया करण्यात आल्या आहेत. आज दि.१ रोजी तालुक्यातील धारावती तंडा येथे धाडी टाकून 59800 रुपये चा मुद्देमाल जप्त करुन रसायने व द्रव्ये नाहीसे केले.या धडक कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

            आज दि.१ रोजी सकाळी 09:00 ते 11:00 वा. दरम्यान धारावती तंडा येथे सपोनि एम एस मुंडे, फौजदार तोटेवाड व ग्रामीण पो स्टे चे इतर 15 अंमलदार यांनी मिळून दारुबंदी मोहीमचे अनुषंगाने अख्खा गाव पिंजून काढून धाडी टाकल्या.यामध्ये एकूण 5 आरोपी नामे शेषबाई भगवान पवार,धुराबाई बाबुराव राठोड,अनिता बळीराम जाधव,वामन राम पवार,शामराव प्रभू पवार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. या धाडीमध्ये 59800 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच गुळ मिश्रित फसफसते रसायन,गावठी हातभट्टी ची तयार दारू, लोखंडी टंकी, प्लास्टिकचे हंडे व इतर साहित्य मिळून आले.योग्य सॅम्पल घेऊन इतर साहित्य पंचासमक्ष नष्ट करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....