पोस्ट्स

MB NEWS-सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती मुंडे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र

इमेज
  सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती  मुंडे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती  मुंडे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.       बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री आर.राजा स्वामी  यांनी  परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती  मुंडे यांच्या  2021 मधील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल व जिल्ह्यात कामाच्या बाबतीत १ नंबर ला पोलीस स्टेशन आणल्याबद्दल "प्रशस्तीपत्र "देऊन सन्मान केला आहे. बीड जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांमधुन क्रमांक १ चे पारितोषिक परळी ग्रामीण पोलीस ठाण्याला प्राप्त झाले आहे. भविष्यात अशाच प्रकारे कार्य करुन बीड जिल्हा पोलिस दलाचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी व्यक्त केली आहे.या यशाबद्दलपरळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती  मुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS-दादाहरी वडगाव येथील तरूणींची छेड काढल्या प्रकरणी आंबेडकरी समाजाची प्रचंड एकजूट उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील निदर्शनास मोर्चाचे स्वरूप १० दिवसात कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा

इमेज
  दादाहरी वडगाव येथील तरूणींची छेड काढल्या प्रकरणी आंबेडकरी समाजाची प्रचंड एकजूट उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील निदर्शनास मोर्चाचे स्वरूप १० दिवसात कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा परळी वै. (प्रतिनिधी) ःपरळी तुक्यातील दादाहरी वडगाव येथे दि.२६.०१.२०२२ रोजी तरूणीची छेड काढल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संबंधीत तरूणांवर छेडछाड व ऍट्रॉसीटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला पण दुसर्‍याच दिवशी संबंधीत प्रकरणात साक्षीदार असणार्‍या तरूणांवर ३२७ चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यामुळे बौध्द समाजाच्या विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकत्यांच्या वतीने आज दि.३१.०१.२०२२ रोजी उपजिल्हाधिकारी परळी यांच्या कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली व या निदर्शनाद्वारे खालील मागण्या करण्यात आल्या. १) दादाहरी वडगाव येथील बौध्द तरूणांवर ज्या खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत त्या तात्काळ मागे घेण्यात याव्यात. २) गुन्हेगाराला पाठीशी घालुन बौध्द तरूणांस अटक करणार्‍या ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारूती मुंडे यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे. या दोन प्रमुख मागण्या बौध्द स

MB NEWS- *राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे लिखाण सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* 🔸 *_मुकनायक पुरस्काराने पत्रकारांचा गौरव; परळीत मुकनायक दिन मोठ्या उत्साहात साजरा_*

इमेज
 *राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे लिखाण  सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे-  बाजीराव भैय्या धर्माधिकारी*  🔸 *_मुकनायक पुरस्काराने पत्रकारांचा गौरव; परळीत मुकनायक दिन मोठ्या उत्साहात साजरा_* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...  राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे लिखाण  सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. ते परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे 31 जानेवारी रोजी दैनिक सम्राट च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मूकनायक पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  बाजीराव भैय्या धर्माधिकारी म्हणाले की, राज्यकर्त्यांनी पत्रकारांच्या लिखाणाचा  सकारात्मक दृष्टीने विचार केला पाहिजे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मूकनायक या वर्तमानपत्राच्या नावाने दिला जाणारा मूकनायक पुरस्कार माझ्या दृष्टीने सर्वोच्च पुरस्कार असल्याचे ते म्हणाले.        परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव भैय्या धर्माधिकारी होते तर प्रमुख पा

MB NEWS- *युवकांनी नोकरी च्या मागे ना लागता व्यवसायाच्या माध्यमातून ध्येय साध्य करावे-राजेश गिते*

इमेज
 *युवकांनी नोकरी च्या मागे ना लागता व्यवसायाच्या माध्यमातून ध्येय साध्य करावे-राजेश गिते*         पुणे :- आज दि ३१/०१/२०२२रोजी परळी चे भुमिपुत्र अनिलकुमार गिते व प्रमोद ढाकणे(महाराष्ट्र पोलीस) यांनी नव्याने सुरू केलेल्या हॉटेल थायम(तमालपत्र)चे उद्घाटन भाजपा नेते राजेश गिते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.                   या प्रसंगी शुभेच्छा पर आपले विचार व्यक्त करताना राजेश गिते यांनी युवकांनी नोकरी च्या मागे ना लागता व्यवसायाच्या माध्यमातून आपले ध्येय साध्य करावे असे म्हटले.या काळात नौकरी च्या माध्यमातून ध्येय साध्य करता येते असे नाही.तुम्ही जिद्द आणि चिकाटी च्या माध्यमातून विविध क्षेत्रात व्यवसाय करुन यशस्वी होऊ शकता.आज अनिलकुमार यांनी परळी वैजनाथ सारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून येऊन पुण्यात नविन व्यवसायात पदार्पण करत आहे त्याचे मनापासून अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.ईतर युवकांनी ही कुठला ही न्युनगंड ना बाळगता अनिलचा आदर्श घ्यावा असे आवाहनही उपस्थित युवकांना राजेश गिते यांनी केले.                                 

MB NEWS-ग्रामीण भागात पत्रकारिता करण कठीण आसुन पत्रकार व वारकरी यांना कुठलीही जात असता कामा नये---* *ह भ प शाम सुंदर सोन्नर यांचे उदगार* *मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेला अंबाजोगाईचा पत्रकार कक्ष आदर्श घेण्या सारखा---* *एस एम देशमुख यांचे उदगार*

इमेज
  * ग्रामीण भागात पत्रकारिता करण कठीण आसुन पत्रकार व वारकरी यांना कुठलीही जात असता कामा नये---*  ह . भ. प. शामसुंदर सोन्नर यांचे उदगार* *मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेला अंबाजोगाईचा पत्रकार कक्ष आदर्श घेण्या सारखा--- एस. एम. देशमुख यांचे उदगार*   अंबाजोगाई (प्रतिनिधी)    मुंबई मध्ये पत्रकारिता करणं सोपं आहे मात्र ग्रामीण भागात पत्रकारांना पत्रकारिता करण कठीण आसुन पत्रकार व वारकरी यांना कुठलीही जात असता कामा नये असे उदगार ह भ प शाम सुंदर सोन्नर यांनी काढले तर मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेला पत्रकार कक्ष हा अन्य तालुका संघाने आदर्श घेण्या सारखा व कौतुकास्पद आहे असे उदगार मा एस एम देशमुख यांनी काढले.      दर्पण दिन व मुक नायक दिनानिमित्त आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षाच्या उदघाटन व पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्या निमित्य आयोजित कार्यक्रमात ह भ प सोन्नर व अध्यक्ष पदावरून एस एम देशमुख हे बोलत होते.     तर प्रमुख अतिथी म्हणून अंबासाखरचे चेअरमन रमेशराव आडसकर,

MB NEWS- *राजकिशोर (पापा) मोदी यांच्या निवासस्थानी प्रा. प्रविण फुटके यांचा सत्कार संपन्न*

इमेज
.  *राजकिशोर (पापा) मोदी यांच्या निवासस्थानी प्रा. प्रविण फुटके यांचा सत्कार संपन्न* अंबाजोगाई (प्रतिनिधी)...      मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई च्या वतीने दर्पणदिन आणि मूकनायक दिनानिमित्त स्व. मौलाना मुश्ताक हुसेन यांच्या स्मृतीपित्यर्थ दिल्या जाणाऱ्या  पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या परळी वै. येथील सकाळचे बातमीदार प्रा. प्रवीण फुटके  यांचा अंबाजोगाई चे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकिशोर पापा मोदी यांच्या निवास्थानी शाल श्रीफळ व वृक्षरोप देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.     मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई च्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजातील दुर्बल तथा वंचित घटकांना न्याय मिळवून देत त्यांचे कार्य आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना नेहमीच गौरविण्यात येते. आपल्या सडेतोड लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची उकल करणाऱ्या व समाजातील विविध उपेक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी आपली लेखणी झिजवणाऱ्या परळी वै. येथील पत्रकार प्रा.प्रविण फुटके यांना स्व. मौलाना मुश्ताक हुसैन यांच्या स्मृतीपित्यर्थ दिला जाणारा 

MB NEWS- *पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप 2021-22 साठी डीबीटी वर अर्ज करण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत - धनंजय मुंडे* *पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत*

इमेज
 *पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप 2021-22 साठी डीबीटी वर अर्ज करण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत - धनंजय मुंडे* *पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत* मुंबई (दि. 31) - : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी साठी अर्ज करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता आदींसाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची प्रक्रिया आहे.  उच्च शिक्षणातील काही विषयायील प्रवेश प्रक्रिया व राउंड अजूनही सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करता यावा, याचा विचार करून विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक साठी अर्ज करणे तसेच पूर्वीच्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले

MB NEWS-पीकविमा प्रश्नावर कृषीमंत्री भुसे यांच्यासोब आज ऑनलाईन बैठक - काॅ. अजय बुरांडे*

इमेज
  पीकविमा प्रश्नावर कृषीमंत्री भुसे यांच्यासोब आज ऑनलाईन बैठक - काॅ. अजय बुरांडे* परळी वै.ता.३१ प्रतिनिधी       प्रधानमंत्री पिकविमा योजना अंमलबजावणी व सद्यस्थिती या अनुषंगाने राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी नेत्यांच्या बैठकीचे  नियोजन मंगळवारी (ता.१) करण्यात आले आहे या बैठकीत सहभागी होण्या संदर्भात अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ अशोक ढवळे, कॉ अजित नवले व पिक विमा प्रश्नावर सातत्याने 2018 पासून अभ्यासपूर्ण मांडणी व आंदोलने करणारे कॉ अजय बुरांडे यांच्यासह कॉ मुरलीधर नागरगोजे आदी प्रतिनिधी मंडळाला सहभागी होण्याचे निमंत्रण पत्र महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रालयाकडून किसान सभेस प्राप्त झाले आहे. या धोरणातील त्रुटी काय? व अंमलबजावणी कशी असावी? सोबतच पीकविम्याची सद्यस्थिती काय आहे? यासंदर्भात सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी मंगळवार (ता.१) रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी ऑनलाइन स्वरूपात बैठकिचे आयोजन केले आहे. यात किसान सभेचे प्रतिनिधी मंडळ सहभागी होऊन पीकविमा धोरण शेतकरी हिताचे कसे करता येईल याबाबत आपल्या सुचना करूण हा प्रश्न सोडविण्या

MB NEWS-श्रीक्षेत्र उखळी बु. येथे संतश्रेष्ठ केदारी महाराज संजीवन समाधी सोहळा भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  श्रीक्षेत्र उखळी बु. येथे संतश्रेष्ठ केदारी महाराज संजीवन समाधी सोहळा  भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       पंचक्रोशीतील थोर संतश्रेष्ठ केदारी महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा मंगळवार दि.१ फेब्रुवारी रोजी आहे.यानिमित्ताने पारंपारिक पद्धतीने गेल्या सात दिवसापासून संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन पुजेचे मानकरी हभप श्रीनिवास महाराज उखळीकर,हभप गणेश महाराज उखळीकर यांनी केले आहे.         परळी वैजनाथ पंचक्रोशीतील थोर संतश्रेष्ठ केदारी महाराज हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.संतश्रेष्ठ केदारी महाराज यांची श्रीक्षेत्र उखळी बु. येथे संजीवन समाधी आहे.गेल्या दिडशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून ची वारकरी परंपरा जतन करणारे सांप्रदायातील श्रीक्षेत्र उखळी बु. हे संतश्रेष्ठ केदारी महाराज यांच्या पावन वास्तव्याने पुनित झालेली भूमी आहे.संतश्रेष्ठ केदारी महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा मंगळवार दि.१ फेब्रुवारी रोजी आहे.यानिमित्ताने पारंपारिक पद्धतीने गेल्या सात दिवसापासून केदारी महाराज संजीवन समाधी मंदिर येथे सोहळा सुरू आहे.या सोहळ्यात

MB NEWS-महिला व बाल विकास परीक्षा सरळ सेवेतूनच घ्या - मधुकर गित्ते

इमेज
  महिला व बाल विकास परीक्षा सरळ सेवेतूनच  घ्या - मधुकर गित्ते परळी वैजनाथ, प्रतिनिधी महिला व बाल विकास विभागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहाय्यक परिवेक्षा अधीक्षक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गट अ पदाचे शासनाकडून नियम बदलण्यात आले आहेत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून अचानक केलेल्या बदलामुळे दोन लाख विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. शासनाने हा निर्णय मागे घेत महिला व बाल विकास परीक्षा सरळ सेवेतून घ्यावी अशी मागणी मधुकर गीते यांनी केली आहे. या पदाकरीता कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र ठरणार आहेत. 2014 नंतर गट अ, सन 2018 नंतर गट ब बाबत कोणतीही जाहिरात आलेली नाही. मात्र जाहिरात येण्यापूर्वीच त्यात अचानक पणे बदल केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. परीक्षेची सर्व तयारी झालेली असताना. वयोमर्यादा च्या अंतिमटप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांचे. मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. याबाबत लवकरच परीक्षार्थी विद्यार्थी तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनाभेटणार  असल्याचे मधुकर गीते यांनी सांगितले.

MB NEWS-रोखुया आजार, वापरूया मस्क -सौ.शामल माणिकराव पौळ अभिनव हळदी-कुंकू कार्यक्रमाचे पौळ पिंपरीत आयोजन

इमेज
  रोखुया आजार, वापरूया मस्क -सौ.शामल माणिकराव पौळ  अभिनव हळदी-कुंकू कार्यक्रमाचे पौळ पिंपरीत आयोजन  परळी (प्रतिनिधी) वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क आणि स्यानिटायझर वापरणे ही काळाची गरज असून, प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पौळ पिंपरीच्या सरपंच सौ.शामलताई माणिकराव पौळ यांनी केले. खास महिलांसाठी आयोजित एका विशेष कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका यांच्या वतीने तालुक्यातील मौजे पौळ पिंपरीत हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच सौ.शामल माणिकराव पौळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या कार्यक्रमात मास्क आणि स्यानिटायझर वाटप करण्यात आले. हा उपक्रम महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सौ.रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.  पौळ पिंपरी येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका यांनी गावातील महिलांसाठी हळदी-कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वाण म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच शामलताई पौळ, परळीच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी बि.य

MB NEWS- *महिला व बाल विकास विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित; हजारो विद्यार्थ्यांची मागणी* 🕳️ _परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर_

इमेज
 *महिला व बाल विकास विभागाची पदे  राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित; हजारो विद्यार्थ्यांची मागणी* 🕳️ _परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) सरळसेवा परीक्षेतून भरण्यात येणारी महिला व बाल विकास विभागाची पदे आता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे परिक्षेची पूर्वतयारी करणार्यांना मानसिक कुचंबणा सहन करावी लागत आहे. विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षाधीन अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) ही पदे आता सरळसेवा परीक्षा पद्धतीने न भरता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार आहेत.ही पदे  राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित अशी हजारो विद्यार्थ्यांची मागणी आहे. अन्यथा परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर आहेत.       ‘एमपीएससी’च्या या निर्णयावर परीक्षेच्या विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाची कोणतीही पूर्व कल्पना दिलेली नाह

MB NEWS-टीईटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे पोहचले परळीपर्यंत; आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक

इमेज
  टीईटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे पोहचले परळीपर्यंत; आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...             शिक्षक पात्रत परिक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने तात्कालिन भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेत एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.टीईटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे परळीपर्यंत पोहचले आहेत.; अटक करण्यात आलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर हे मुळ परळी तालुक्यातील आहेत.          खोडवेकर हे २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत शिक्षण विभागात कार्यरत होते. त्यांनी सावरीकर यांच्याकडून पैसे घेतले असल्याचे तपासात समोर आल्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. खोडवेकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते कृषी विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (TET) अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यां

MB NEWS- पांगरी चे उपसरपंच अॅड.श्रीनिवास मुंडे यांनी लिहिलेला वाचनिय लेख :- ♂मी पाहिलेले आणि अनुभवलेले आण्णा..अनभिषिक्त बादशहा♂

इमेज
 ♂मी पाहिलेले आणि अनुभवलेले आण्णा..अनभिषिक्त बादशहा♂ आज वाल्मिक अण्णा कराड यांचा 53 वा वाढदिवस. वाढदिवस साजरा करणं ही पाश्चात्य संस्कृती आहे.प्रत्येक वाढदिवस आयुष्यतील एक वर्ष कमी झाल्याची जाणीव करून देत असतो.पण सोशल मीडिया च्या प्रभावामुळे कधी स्वप्नात सुद्धा वाढदिवस माहिती नसणारे महाभागही बॅनरबाजी,होर्डिंग्ज लावून वाढदिवस साजरे करताना आपण हल्ली पाहतोय.आम्ही ज्ञानदान, अन्नदान आणि रक्तदान करून अण्णांचा वाढदिवस साजरा करतोय.जरी आयुष्यातलं एक वर्ष  कमी झाल्याच दुःख असलं तरी ते वर्ष चांगल्या कामासाठी खर्च झालं याचं समाधान ज्यांच्या जीवनात प्राप्त असतं अशाच व्यक्ती विशेषांचे 'वाढदिवस' सार्थकी ठरतात, अन्यथा 'येड्या गबाळ्यानी' एक वर्ष आयुष्यातून निघून गेल्याचं दुःख पाळायला हरकत नाही. प्रत्येक व्यक्तीने आयुष्याचं सिंहावलोकन करावं आणि खर्च झालेल्या आयुष्यात ."कौतुक वाटे झालिया वेचाची"..या न्यायाने आतापर्यंत खर्च झालेल्या आयुष्याच कौतुक आणि समाधान वाटतअसेल तर त्यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा व्हायलाच हवा...एखादा व्यक्ती हेलिकॉप्टर ने  हिमालयाच्या शिखरावर गेला  तर

MB NEWS- *वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त पवन फुटके यांच्या वतीने श्री.शनैश्वरास अभिषेक, आरती*

इमेज
 *वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त  पवन फुटके यांच्या वतीने श्री.शनैश्वरास अभिषेक, आरती* परळी वैजनाथ दि.२९ (प्रतिनिधी)            राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांचे अर्जुन,दिलेली मोहीम फत्ते करणारे नेतृत्व परळी मतदार संघातील कर्तृत्ववान नेते नगर परिषदेचे गटनेते श्री. वाल्मिकअण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.शनैश्वरास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पवन फुटके व मित्रमंडळाच्या वतीने अभिषेक करण्यात आला.             राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिरात श्री.शनैश्वरास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पवन फुटके व मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी (दि.२९) सकाळी अभिषेक, आरती करण्यात आली. यावेळी वाल्मिक आण्णां कराड यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.  यावेळी पवन फुटके, वैजनाथ भाऊ कोल्हे,  शनैश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर जठार, महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा विभागीय कार्याध्यक्षअतुल

MB NEWS-प्रासंगिक लेख:अण्णा!

इमेज
  अण्णा!......... ग्रामीण व शहरीभागात आपल्या घरातील ,कुटुंबातील ,गल्लीतील,गावातील आदरणीय किंवा जेष्ट व्यक्तीला अण्णा म्हणुन आदराने बोलतात. परळी व पंचक्रोशीत अण्णा हे नाव गेली अनेक वर्ष  राजकीय पटलावर उदगारलं जातं आज स्वर्गीय पंडीतअण्णा ह्यात नाही त्यांची ओळख ही संबंध बीड जिल्ह्यात अण्णा म्हणुनच होती.यशस्वी माणसं तयार करण्यासाठी जेष्टांचा साथ व आशिर्वाद असणे आवश्यक असते.अगदी त्याचप्रमाणे राजकारणातील लोकनेत्याला पाठबळ देण्यासाठी स्वर्गीय पंडीतअण्णा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले व मुंडे साहेबांना संबंध महाराष्ट्र व देशभर फिरण्यासाठी तत्पर ठेवले व मतदार संघात स्वर्गीय पंडीतअण्णा व ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी उत्तराधिकारी म्हणुन मतदार संघातील व जिल्हयातील जनतेची कामे केली व राज्याच्या राजकारणाला गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखा नेता दिला. आज बहुतांशी तीच पुनरावृत्ती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेबांच्या बाबतीत होत आहे. ज्याप्रमाणं राज्याच्या राजकारणात साहेब सक्रीय झाले व राजकारणात एक स्वतंत्र ठसा निर्माण केला त्यामागे मतदार संघातील व ज

MB NEWS-*बीड जिल्ह्यातील 103 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार* *पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून 103 गावांमध्ये जलजीवन मिशनमधून 87 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता*

इमेज
. *बीड जिल्ह्यातील 103 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार*    *पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून 103 गावांमध्ये जलजीवन मिशनमधून 87 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता*   *माता-माऊलींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरेल व दारात नळाला पाणी येईल, यात मोठे समाधान - धनंजय मुंडे*  बीड (दि. 29) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 103 गावांमध्ये सुमारे 87 कोटी रुपये खर्चून जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, लवकरच या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच पाणी पुरवठा योजनेपासून वंचित राहिलेल्या 100 गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, गावांतील माता - माऊलींच्या डोक्यावरील हंडा उतरेल व प्रत्येकाच्या दारात नळाने पाणी जाईल, याचे मोठे समाधान असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील एकूण 1364 गावांचे प्रस्ताव जलजीवन मिशन अंतर्गत मागविण्यात आले असून पहिल्या टप्प्यात

MB NEWS- प्रासंगिक लेख:- ना.धनंजय मुंडे यांच्यासाठी 'सर्वस्व' पणाला लावून लढणारा 'सच्चा साथी' : वाल्मिकअण्णा कराड*

इमेज
 *ना.धनंजय मुंडे यांच्यासाठी 'सर्वस्व' पणाला लावून लढणारा 'सच्चा साथी' :  वाल्मिकअण्णा कराड*         ना.धनंजय मुंडे यांच्यासाठी 'सर्वस्व' पणाला लावून लढणारा 'सच्चा साथी' म्हणून संबंध महाराष्ट्रात वाल्मिकअण्णा कराड यांची ओळख आहे. नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या कामाचा आवाका खुप विस्तीर्ण आहे व कार्याची व्याप्ती खुप मोठी आहे.आश्चर्य वाटेल एवढी एनर्जी व हजारो कामांचा डोक्यात विचार तरीही प्रत्येक काम यशस्वीपणे पार पाडण्याची हतोटी ही असामान्य आहे. राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक, अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील लोकांशी असलेला स्नेहभाव जपताना प्रसंगी व्यावसायिक दृष्टिकोन बाजुला सारुन ते स्नेहभाव दृढ करतात ही त्यांची कामाची शैली आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभाग व प्रभागातील प्रत्येक नागरीकांचा विचार करून नियोजन करणे त्यासोबत अंतर्गत राजकारण सांभाळून घेत नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते , कार्यकर्ते या प्रत्येकाचे समाधान करून सर्व सामान्य माणसाचे हीत जपणे हे शिवधनुष्य पेलणारा ना.धनंजय मुंडे साहेबांचा खराखुरा शिलेदार म्हणून वाल्मिकअण्णा कराड यांचे

MB NEWS- *तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्यच ; जनता, कार्यकर्त्यांच्या पाठिशी आधीही होते, पुढेही राहील - पंकजाताई मुंडे*

इमेज
 *तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्यच ; जनता, कार्यकर्त्यांच्या पाठिशी आधीही होते, पुढेही राहील - पंकजाताई मुंडे* *'मेरा बुथ सबसे मजबूत' अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड, घरकुल प्रमाणपत्र वाटप* *महिलांनी पुढे आल्याशिवाय   परळीत बदल घडणार नाही* परळी । दि. २८ । तुमचे माझ्यावर कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड म्हणजे तुमची सेवा करणं आहे अशी भावना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे व्यक्त केली. महिलांनी पदर खोचल्याशिवाय परळीत बदल घडणार नाही असे सांगतानाच जनता व कार्यकर्त्यांच्या पाठिशी मी आधीही  होते, आताही आहे आणि पुढेही राहील असे सांगितले.  शहरातील प्रभाग क्रमांक चार गणेशपार भागात आयुष्यमान भारत योजना कार्ड, घरकुल प्रमाणपत्र वाटप आणि कमल सखी मंच नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थिताना संबोधित करताना त्या  बोलत होत्या.राजकारणाची दिशा जो बदलतो तोच नेता असतो. लोकनेते मुंडे साहेबांसारखे नेतृत्व आपण दिले, त्यांनी राजकारणात कधी कुणाला त्रास दिला नाही. राजकारण हे मतदानापुरते असावे. आम्ही जनता आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत,त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा व

MB NEWS- *31 जानेवारी रोजी परळीत मूकनायक दिनाचे आयोजन, मूकनायक पुरस्कार जाहीर*

इमेज
 *31 जानेवारी रोजी परळीत मूकनायक दिनाचे आयोजन, मूकनायक पुरस्कार जाहीर* परळी ( प्रतिनिधी ) हजारो वर्षे वंचित, उपेक्षित समाजाचा आवाज बनून नवी क्रांती करणाऱ्या महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक वृतपञाचा मूकनायक दिन परळी येथे  31  जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने देण्यात येणारे मूकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.        परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पञकार भवन येथे  31 जानेवारी सकाळी अकरा वाजता सुरु होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आवाड हे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, सिरसाळा सरपंच रामदादा किरवले, माजी उपनगराध्यक्ष अयुबखाॅ पठाण, ग्रामीण पोलीस स्टेशन पो. नि. मारोती मुंडे, वैद्यकीय आधिक्षक डाॅ. अरुण गुट्टे, प्रा. डाॅ. विनोद जगतकर, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे आदि उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मूकनायक पुरस्कार देऊन पञकारांचा गौरव करण्यात येणार आहे.       मूकनायक प

MB NEWS-गोपाळ आंधळे यांच्याकडुन वाल्मीकअण्णा कराड यांचा तुळजाभवानीची प्रतिमा देवुन सत्कार

इमेज
  गोपाळ आंधळे यांच्याकडुन वाल्मीकअण्णा कराड यांचा तुळजाभवानीची प्रतिमा देवुन सत्कार परळी (प्रतिनीधी) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे साहेब यांचे खंदे शिलेदार न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त येडशी ते तुळजापुर पायी दिंडी काढत ही दिंडी परळीत आल्यानंतर शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी वाल्मीकअण्णांचा वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला दि.27 रोजी तुळजाभवानीची प्रतिमा भेट देत तुळजापुर येथील प्रसाद देवुन सत्कार केला यावेळी दिंडीतील सहकार्यासह कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.   न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी येडशी ते तुळजापुर अशी पायी दिंडी काढत वाल्मीकअण्णांच्या उदंड आयुष्यासाठी तुळजाभवानीची  पुजा व गोंधळ कार्यक्रम करत साकडे घातल्यानंतर तुळजाभवानीच्या दरबारातुन घेतलेली प्रतिमा तसेच प्रसाद वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला गुरुवार दि.27 रोजी जगमित्र कार्यालयात शाल,श्रीफळ,फेटा बांधून तुळजाभवानीची प्रतिमा व महाप्रसाद देत सत्कार करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पायी दिंडीत सहभागी हनुमान आगरकर,अर्जुन साखरे,सोमनाथ आ

MB NEWS-*विकास कामं करताना मी कधी भेदभाव केला नाही, आताच्या पालकमंत्र्याकडून मात्र भेदभाव - पंकजाताई मुंडे*

इमेज
  *विकास कामं करताना मी कधी भेदभाव केला नाही, आताच्या पालकमंत्र्याकडून मात्र भेदभाव - पंकजाताई मुंडे* *लक्ष्मी हरवलीय म्हणून बीड जिल्हयाला वाईट दिवस आले* *तुमच्या कामासाठी मला सत्तेची गरज नाही ; तुमचा आशीर्वाद हाच   मंत्रीपदापेक्षा खूप मोठा* *केज पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे थाटात लोकार्पण* केज ।दिनांक २५।  विकास काम करताना कोणतं गांव कोणत्या पक्षाचं हे पाहिलं नाही, मी कामे करताना भेदभाव केला नाही. मात्र, आताचे पालकमंत्री भेदभाव करतात. आम्ही शुन्याने गुणणारी कामं करणारी नाहीत असा घणाघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केला. लक्ष्मी हरवलीय म्हणून बीड जिल्हयाला वाईट दिवस आलेत असं सांगतानाच मला तुमची कामे करण्यासाठी  सत्तेची गरज नाही तुमचा आशीर्वाद हा मला मंत्रीपदापेक्षा खूप मोठा आहे असेही त्या म्हणाल्या.   केज पंचायत समितीच्या आठ कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व कर्मचारी निवासस्थानाचे लोकार्पण पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज कोरोनाचे सर्व नियम पाळून मोठया थाटात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामविकास मंत्री असताना पंकज

MB NEWS-पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक परळी येथे काही वर्षांपूर्वी पो.नि.म्हणून बजावली सेवा

इमेज
   पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक  परळी येथे काही वर्षांपूर्वी पो.नि.म्हणून बजावली सेवा नवी दिल्ली..,.           प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज (ता.२५) पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये ४ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ ७ ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेसाठी ४० ‘पोलीस पदक’ जाहीर झाली. यामध्ये लातुर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक  जाहीर झाले आहे.भातलंवडे यांनी परळी येथेही सेवा बजावली होती.      प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण ९३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीपीएम), १८९ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महा

MB NEWS-संत वामनभाऊंनी समाजाच्या उद्धारासाठी देह झिजविला- ॲड दत्तात्रय महाराज आंधळे

इमेज
 .् संत वामनभाऊंनी समाजाच्या उद्धारासाठी देह झिजविला- ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे ------------------ भोगलवाडी(प्रतिनिधि) संत वामनभाऊ यांचे वारकरी संप्रदायात मोठे योगदान होते ,त्यांनी अत्यंत तळमळीने बालाघाटाच्या डोंगरदऱ्यात वसलेल्या समाजावर  वारकरी संप्रदायाचे संस्कार केले असे प्रतिपादन संतवाङ्मयाचे संशोधक तथा कीर्तनकार ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.                धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात वैराग्यमूर्ती वैकुंठवासी संत वामनभाऊ यांचे पुण्यतिथी निमित्त दिनांक २५जानेवारी २०२२रोजी  धन्य ते संसारी |दयावंत जे अंतरी||१|| या संत तुकाराम महाराजांचे अभंगावर कीर्तन निरुपण ह.भ.प ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.यावेळी प्राचार्य डाँ पांडुरंग महाराज तिडके, प्राचार्य डॉ.तेजस तिडके,प्रा.पांचाळ सर, गायनाचार्य राजा  महाराज गोसावी ,मछिंद्र महाराज मुंडे, नागोराव महाराज पांचाळ,मृदंगाचार्य बाबुराव महाराज कारीकर,तसेच भजनी मंडळीची भरपूर उपस्थित होती.या कार्यक्रमाचे यजमान ह.भ.प.श्रीमंत माणिकराव तिकडे हे होते..यावेळी भोगलवाडी पंचक्रोशीतील भाविकांची उल्लेखनीय गर्दी कीर्तनास होत

MB NEWS-राज्य कोरोनामुक्त व्हावे, शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी काम करण्याचे आम्हाला बळ मिळो - धनंजय मुंडे यांची गहिनीनाथगडावर प्रार्थना*

इमेज
.  * राज्य कोरोनामुक्त व्हावे, शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी काम करण्याचे आम्हाला बळ मिळो - धनंजय मुंडे यांची गहिनीनाथगडावर प्रार्थना* *संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त ना. धनंजय मुंडे, ह. भ. प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या हस्ते महापूजा संपन्न* *आ. बाळासाहेब आजबे, आ. रोहितदादा पवार आदींची उपस्थिती* गहिनीनाथगड ता. पाटोदा (दि. 25) ---- : प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री. क्षेत्र गहिनीनाथगड येथील पारंपरिक महापूजेस उपस्थित राराहणे हे भाग्याचे असून याप्रसंगी राज्य कोरोनामुक्त व्हावे, इथला शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आम्हाला काम करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केली.  संत वामनभाऊ यांच्या 46 व्या पुण्यतिथी निमित्त पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील वामनभाऊ यांच्या स्मृतिस्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, गडाचे महंत ह. भ. प. विठ्ठल महाराज शास्त्री यांचे हस्ते पारंपरिक पद्धतीने महापूजा व महा आरती करण्यात आली. यावेळी प्रथमच आ. रोहित दादा पवार