MB NEWS-*बीड जिल्ह्यातील 103 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार* *पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून 103 गावांमध्ये जलजीवन मिशनमधून 87 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता*

. *बीड जिल्ह्यातील 103 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार*
 

 *पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून 103 गावांमध्ये जलजीवन मिशनमधून 87 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता* 
 *माता-माऊलींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरेल व दारात नळाला पाणी येईल, यात मोठे समाधान - धनंजय मुंडे*
 बीड (दि. 29) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 103 गावांमध्ये सुमारे 87 कोटी रुपये खर्चून जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, लवकरच या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच पाणी पुरवठा योजनेपासून वंचित राहिलेल्या 100 गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, गावांतील माता - माऊलींच्या डोक्यावरील हंडा उतरेल व प्रत्येकाच्या दारात नळाने पाणी जाईल, याचे मोठे समाधान असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील एकूण 1364 गावांचे प्रस्ताव जलजीवन मिशन अंतर्गत मागविण्यात आले असून पहिल्या टप्प्यात यांपैकी 103 गावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार यांनी दिली आहे. सर्व 11 तालुक्यातील आलेल्या प्रस्तावांची छाननी करून पहिल्या टप्प्यात 103 गावे निवडली असून, प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी नळाद्वारे देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गावागावात स्वच्छ पेयजल नळाद्वारे पोहचून टंचाईच्या काळात देखील पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था 1364 गावात निर्माण करणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, यासाठी संबंधित यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहेत, असे मत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार