MB NEWS-संत वामनभाऊंनी समाजाच्या उद्धारासाठी देह झिजविला- ॲड दत्तात्रय महाराज आंधळे

 .् संत वामनभाऊंनी समाजाच्या उद्धारासाठी देह झिजविला-ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे



------------------

भोगलवाडी(प्रतिनिधि) संत वामनभाऊ यांचे वारकरी संप्रदायात मोठे योगदान होते ,त्यांनी अत्यंत तळमळीने बालाघाटाच्या डोंगरदऱ्यात वसलेल्या समाजावर  वारकरी संप्रदायाचे संस्कार केले असे प्रतिपादन संतवाङ्मयाचे संशोधक तथा कीर्तनकार ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.


               धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात वैराग्यमूर्ती वैकुंठवासी संत वामनभाऊ यांचे पुण्यतिथी निमित्त दिनांक २५जानेवारी २०२२रोजी 

धन्य ते संसारी |दयावंत जे अंतरी||१||

या संत तुकाराम महाराजांचे अभंगावर कीर्तन निरुपण ह.भ.प ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.यावेळी प्राचार्य डाँ पांडुरंग महाराज तिडके, प्राचार्य डॉ.तेजस तिडके,प्रा.पांचाळ सर, गायनाचार्य राजा  महाराज गोसावी ,मछिंद्र महाराज मुंडे, नागोराव महाराज पांचाळ,मृदंगाचार्य बाबुराव महाराज कारीकर,तसेच भजनी मंडळीची भरपूर उपस्थित होती.या कार्यक्रमाचे यजमान ह.भ.प.श्रीमंत माणिकराव तिकडे हे होते..यावेळी भोगलवाडी पंचक्रोशीतील भाविकांची उल्लेखनीय गर्दी कीर्तनास होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !